Sunday, April 15, 2007

शह आणि काटशह!

ही एक सत्य कथा आहे..
वैद्यकीय प्रवेशांमधे होणार्‍या गोंधळांची..
हे गोंधळ करणारे प्रशासन...
आणि त्याविरुध्द आवाज उठवणारे विद्यार्थी..
यांच्यातील लढ्याची..
आणि या लढ्याच्या पंचांची भूमिका बजावणार्‍या ..
जिच्याकडून सर्वांना निष्पक्ष निकाल हवा असतो..
अशा न्याययंत्रणेची..
आणि तिच्यावर अंकुश ठेवणार्‍या वृत्तपत्रांची..
एकमेकांना दिलेल्या शह.. आणि काटशहाची..

बी. जे. वैद्यकीय महाविद्याल्याचा कॉरिडॉर..
आज पदव्युत्तर प्रवेशाची यादी लागणार..
कॉरिडॉरमधे नोटीसची वाट पाहणार्‍या विद्यार्थ्यांची गर्दी..
सर्वांची उत्कंठा ताणलेली....
एव्हड्यात कोणीतरी बाहेर येऊन सांगते..
प्रवेश यादी लागणार नाही..
प्रवेश प्रक्रियेवर कोर्टाने स्टे दिला..

सगळीकडे एकच गोंधळ ....
या गोंधळात भरडले गेलेल्या सर्वांना . . अर्पण !


७ जानेवारी १९८७, रात्री ११:३० वाजता!

ट्रिंग ट्रिंग,

हॅलो, डॉ जोशी बोलतोय..

हॅलो, मी स्वाती बोलत्येय..

अरे, इतक्या रात्री? एनी प्रॉब्लेम?

आर. डी. आम्ही ६-७ जण अत्ता तुझ्या घरी आलो तर चालेल का? जरा काम होत .. अर्जंट!

अं..या ना.. पण लवकर या हं!

न.. नाही, अजून अर्धा तास तरी लागेल.

मग उद्या सकाळीच याल का?

नाही नाही..उद्या सकाळच्या आत! बरच काही सांगायचय.

ओ.के. या तुम्ही..मी वाचत बसतो. तेव्हडाच कधीतरी अभ्यास होईल. किंवा गिरिजावर येता का? म्हणजे कॉफी पिऊयात..

अरे कॉफी कसली पितोस..इथे आमचा जीव जायची पाळी आलीय. त्या डीन सरांच्या मुलान..कोर्टात.. आम्ही घरीच येतो.

बर..या. मी वाट बघतो.

अरे आमचे सगळ्यांचे..

रिलॅक्स स्वाती.. आय विल ट्राय टू हेल्प यू..ओके?

थॅंक्स..

८ जानेवारी १९८७.. ०:३० वाजता!

डिंग डॉंग!

हॅलो स्वाती.. हॅलो एव्हरीबडी..

काय भानगड केली तुम्ही लोकांनी?

अरे फारच गोची झालीय..त्या डीन सरांच्या मुलानी आमच्या प्रवेशप्रक्रियेवर स्टे आणलाय..त्याच्या केसचा उद्या निकाल आहे.. आणि आम्हाला आज संध्याकाळी कळल..

डीन चा मुलगा? पण आपल्या कॉलेजात कुठ डीन चा मुलगा होता?

नाही नाही .. तो अंबेजोगाईचा आहे.

मग त्याला आपल्या कॉलेजात कसा प्रवेश घेता येईल?

अरे त्याने त्याविरुद्ध तर केस लावली आहे हायकोर्टात.

पण यावर्षी बाहेरच्यांना प्रवेश देता येणार नाही अस सुप्रीम कोर्टाच जजमेंट आहे. तुम्हाला त्याची केस माहीत आहे का नीट?

हे बघ. ही त्याची केस, ही कॉलेजातील नोटीस .. त्यासाठीच वेळ लागला..

बघू बर. काय मागतोय तो याचिकेत? एम डी ला प्रवेश द्या. किंवा प्रवेश प्रक्रियेवर स्टे द्या.. प्रतिवादी कोण आहेत?..महाराष्ट्र सरकार, डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन.. डीन बी जे मेडिकल कॉलेज.. पुणे विद्यापीठ..

अरे यात तर तुमचं कोणाचच नाव नाही.. मग तुम्ही?

आर. डी. नीट आइक, जर त्याला प्रवेश मिळाला तर त्याच्या बरोबर बाहेरचे सगळे प्रवेश मागतील..त्यांना सर्वांना भरमसाठ मार्कस आहेत. आणि अशा ११७ मुलांनी अर्ज केलेत.. आपल्या कॉलेजातील एकालाही प्रवेश मिळणार नाही.. ऑल शॅल बी ऑन द रोड्स..!

व्हाय? मग तुम्हालाही इतर कॉलेजांमधे प्रवेश मिळेल.

नाही, बाकीच्या सर्व कॉलेजांनी त्यांच्या त्यांच्या मुलांना प्रवेश दिलाय. आताच्या नियमांप्रमाणे..

मग त्याच नियमांप्रमाणे तुम्हालाही प्रवेश मिळेल.. आपल्या कॉलेजातही बाहेरच्यांना प्रवेश मिळणार नाही..

अरे बाबा, ते नियमच तो चॅलेंज करतोय ना?

मग सरकारी वकील.. म्हणजे कॉलेजचा..देईल ना काय ते उत्तर..तुम्ही कशाला टेंशन घेताय?

अरे भाऊ, डीन चा मुलगा आहे तो.. कॉलेजच्या तर्फे काहीही एफिडेव्हिटच दाखल केल नाहीये..

चायला! थांबा थांबा, मला वाचूदे ती सगळी केस..

Writ Petition 25/87

Dr Sanjay Rishikumar Shrivastava Vs Dean B J Medical College & others

To the honourable Chief Justice, High Court of Judicature at Bombay..
the petitioner is meritorious student from ambejogai..
his admission in ambejogai was doubtful..
he could not apply to any other college than Pune..
his form was refused at Pune college so he sent it by registered post..
kindly grant him admission in B J Medical College for M D Paediatrics course

शाबास! पोरगा विरुध्द बाप!
अरे .. यात तर काहीच दम नाही! नॉन्सेन्स! का म्हणून याला बी जे मेडिकल मधे प्रवेश? अरे..सुप्रीम कोर्टान तर स्पष्टच सांगीतलय..की बाहेरच्या विद्यार्थ्यांना या वर्षी प्रवेश नाही..
हॅ!.. या याचिकेत काहीच दम नाही.. रिलॅक्स! .. हायकोर्टात ही याचिका निश्चितपणे फेटाळली जाईल.. काळजी करू नका!.. रिलॅक्स!

अरे! हायकोर्टात तर स्टे दिलाय.. आणि तू म्हणतो रिलॅक्स? आम्ही सगळ्यांनी काय करायच? आणि तू सुप्रीम कोर्टाचं काय म्हणत होतास? मंदार म्हणाला..

अरे राजा.. सुप्रीम कोर्टानी दिलेल्या निकालानुसार जानेवारी १९८७ चे प्रवेश त्या त्या कॉलेजातील मुलांनाच द्यायचे आहेत. बाहेरच्यांना नाहीत. ते एन्ट्रन्स एक्सॅमिनेशन वगैरे १९८८ सालापासून आहे.. तुम्हाला काहीही होत नाही.. हायकोर्ट ही केस फेटाळून लावेल.

अरे पण तो गोल्ड मेडॅलिस्ट आहे म्हणे!

सो व्हॉट? सुप्रीम कोर्टाने सांगीतलय..की दोन कॉलेजचे मार्कस कंपेअर करता येणार नाहीत.. त्यासाठीच तर पुढील वर्षापासून एन्ट्रन्स एक्सॅम आहे ना?

कंपेअर करता येणार नाहीत.. म्हणजे?

उदाहरणच द्यायचं झाल तर पी टी उषानं एशियाड मधे सुवर्ण पदक मिळवल म्हणजे ती जगज्जेती झाली का? त्यासाठी तिला ऑलिंपिकमध्येच जाऊन जिंकायला हवे.. कळलं? एन्ट्रन्स शिवाय त्याचं मेरिट जास्त म्हणता येणार नाही.

अरे पण कोर्टाने उद्या त्याच्या बाजून निकाल दिला तर? आमचे हाल होतील ना!

त्यासाठी तुम्हाला या केसमध्ये इंटरव्हीन व्हायला लागेल.. उद्याच!

म्हणजे?

हा तुमच्या वर अन्याय आहे.. तुम्ही सगळे मिळून त्याच्या विरुद्ध कोर्टात जायच ..
काय?

थांबा.. आयडिया.. नंदूला फोन करू.. त्याला विचारू.. राईट..परफेक्ट!

नंदू? म्हणजे कोण?

माझा वकील मित्र..माझ्या केसमधला..एम डी च्या प्रवेशाच्यावेळचा..

आठ जानेवारी १९८७..पहाटे १:३० वाजता!

हॅलो.. थत्ते का? सॉरी हं.. एवड्या रात्री त्रास दिला.. मी डॉ.जोशी बोलतोय.. जरा तुमच्या शेजारच्या नंदू सातवळेकरांना बोलावता का? प्लीज..!
. . . .

हॅलो, सातवळेकर..

नंदू, आर डी बोलतोय..

काय रे.. इतक्या रात्री?..कुठून बोलतोयस?..काही मारामारी ?

नाही रे बाबा .. जरा प्रॉब्लेम आहे..सिरियस..!

कोण?

कोणी नाही रे..प्रॉब्लेम सीरियस आहे..

रिगार्डिंग?

मेडिकल प्रवेशासंबंधीच्या एका केसमधे आपल्याला उद्याच इंटरव्हीन व्हायला लागेल असं वाटतय..

उद्या?

होय..उद्याच!

तुला? तुझा काय संबंध?

नाही, माझा काहीच संबंध नाही..लफड वेगळचं आहे..तू अत्ता माझ्या कडे येतोस की मी येऊ? मॅटर इज रियली अर्जंट.. नाहीतर मी तुला या वेळी त्रास दिला नसता!

अरे! नो प्रॉब्लेम! ये तू आत्ता! किंवा अस करू.. मी उद्या सकाळी ५ वाजता तुझ्या घरी येतो.. आपण सिंहगडनी मुंबईला जाऊ..वाटेत बोलू.. ही कल्पना कशी वाटते?

गुड आयडिया..वकीलसाहेब झोपा शांतपणे आता!

आणि हे बघ..ज्यांचा केसशी प्रत्यक्ष संबंध आहे त्यांना ही बरोबर यायला लागेल.. कळंल?

समजल..मी अत्ता ससूनला चाललोय..उद्या ट्रेनमधेच भेटू... आपली डी २ बोगी.. दारात .. नक्की.. !

आठ जानेवारी १९८७..पहाटे २ वाजता!

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय.. कॉमन रूम..सगळे प्रवेशेच्छुक एकत्र जमलेत..उद्याची चिंता सर्वांच्या चेहर्‍यावर!आम्ही पोचतच स्तब्धता..

अजितने पुढचा प्लॅन सर्वांना सांगीतला..

सर्वांनी एकजुटीनं विरोधास उभे रहायची तयारी दाखवली
एकाला खजिनदार नेमून त्याच्याकडे पैसे गोळा होऊ लागले..
उद्याच्या ट्रिप साठी किमान हजार रुपये जवळ असण आवश्यक होतं..

डीन च्या मुलामुळे कोणाची सीट जात आहे याचा शोध सुरु झाला..
मेरीट लिस्ट तयार करता ध्यानात आलं की कापरेचा बालरोगशस्त्रातील एम. डी. चा प्रवेश जाणार..
पण कापरे सभेत नव्हताच !

अरे कापरेला बोलवा.. कापरेला बोलवा..

आर. डी. .. आम्हाला नाही वाटत .. कापरे तयार होईल..

का?

पण तोच कशाला पाहिजे?..मी वकीलपत्रावर सही करीन.. शिवा म्हणाला.

नाही रे बाबा.. प्रत्यक्ष नुकसान होणारी मुलं पाहीजेत ..

कशासाठी?

अरे.. आपण सर्वांनी आमच नुकसान होऊ शकेल अस म्हणण्याबरोबरच.. माझ नुकसान होतय अस कापरे म्हणाला .. तर न्यायालयात आपली बाजू मजबूत होईल..

पण आपल्या सर्वांसाठी कापरेनं का आपलं करियर बरबाद करून घ्याव?..

त्याचं करियर बरबाद होण्याचा प्रश्न कुठे येतो?..

हे बघ.. जर का निकाल आपल्या बाजून लागला तर त्याला एम. डी. ला प्रवेश मिळेल आणि विरुद्ध लागला तर डिप्लोमाला.. दोन्ही बालरोगशास्त्र विभागातच. आणि त्या विभागाच्या मॅडमना आपल्या विरुद्धच निकाल लागावा अस वाटणार.. कापरे विरोधात उभा राहिला तर त्या त्याला त्रास देतील.. त्या डीनच्या बाजूने आहेत असं कॉलेजात कळलं. त्यांनी पुढे कापरेला त्रास दिला तर कोण मदत करेल? म्हणजे त्याच्या दृष्टीनं गप्प बसून सहन करणं जास्ती हिताचं नाहीका? कोर्टात जिंकला तर आगीतून फुफाट्यात.. संजयच म्हणणं..

पण मॅडम का डीनच्या बाजूनं जातील? आपण सगळे मिळून..

आर. डी. मॅडम कशा आहेत ते तुला माहीत आहे.. त्यांना डीन चा मुलगा त्यांच्या डिपार्टमेंटमधे यायला हवाच असणार .. त्याच्यात त्यांचा फायदाच आहे..

शट अप.. उगाच मॅडम बद्दल वाट्टेल ते बोलू नको.. त्या माझ्या टीचर आहेत .. अन्यायाविरुद्ध भांडावं असंच त्यांच मत आहे.. माझ्या कोर्ट केसच्या वेळीही त्यांनी मला मदत केली होती..

त्यावेळच्या डीन बरोबर त्यांची खुन्नस होती..म्हणून त्यांनी तुला मदत केली.. आता डीन बदललेत.. टाईम्स हॅव चेंज्ड..

गप्प बस.. मूर्खासारख बरळू नको.. माझा त्यांच्यावर विश्वास आहे..त्या तशा नाहीत....आणि हा निर्णय कापरेन घ्यायचाय..

आठ जानेवारी १९८७, सकाळी ५.३०

कडाक्याची थंडी!पुणे स्टेशन. सिंहगड एक्सप्रेस. डी २ बोगी. दारात!
गरम चहाचे घुटके घेत नंदूची वाट पाहतायत; मी, कापरे आणि इतर चार!

५:३५ अरे नंदू अजून नाही आला?

५:४० हुश्श! देअर ही इज.हॅलो वकीलसाहेब..या.. चहा घ्या!

करा..टिंगल करा. अरे वकील म्हणजे काय डॉक्टर वाटला की काय? कधीही रात्री अपरात्री फोन करायला? काय भानगड काय आहे?

अरे इथं अनेक डॉक्टरांचे प्राण कंठाशी आलेत.. आणि एक वकीलच त्यांना वाचवू शकेल..!

बरं तुझी ओळख करून देतो.. हा.. सॉरी हे.. आपले वकील .. नंदू सातवळेकर.. आणि हे माझे मित्र.. डॉ कापरे.. डॉ करंबळेकर .. पाटील.. अगरवाल..मंदार..सर्वजण अंडर जादा टेंशन!

काय प्रॉब्लेम काय आहे?

हे बघ. थोडक्यात सांगतो. आमच्या कॉलेजच्या डीन चा मुलगा अंबेजोगाईमधून एम.बी.बी.एस झाला. आणि तो पुण्यात एम. डी. साठी प्रवेश मागतोय. विच इज अगेन्स्ट रुल ऑफ इन्स्टिट्युशनल प्रेफरन्स. पण त्यानं तो नियमच चॅलेंज केलाय! आणि हायकोर्टानं स्टे दिलाय सगळ्या प्रवेश प्रक्रियेवर..

काय? हायकोर्टानं स्टे दिला? आश्चर्य आहे!.. प्रदीप जैन च्या केसमध्ये तर सुप्रीम कोर्टान एन्ट्र्न्स एक्सामिनेशन घ्यायला सांगीतली आहे. आणि त्यानंतर दिनेश जैन केसमधे १९८७ साली इन्स्टिट्युशनल प्रेफरन्स नीच प्रवेश द्यायला सांगीतलय. एन्ट्र्न्स एक्सामिनेशन विल बी फ़्रॉम १९८८..

येस.. करेक्ट.. आणि एन्ट्र्न्स एक्सामिनेशन शिवाय त्याला पुण्यात प्रवेश घेताच येणार नाही..

मग हायकोर्टान कसा स्टे दिला? ही दोन्ही जजमेंटस तर त्याच्या विरुद्ध आहेत! नंदूची शंका..

पण त्याने ती दोन्हीही जजमेंटस सप्रेस केल्यैत! आणि या बेसिसवर आम्हाला या केसला विरोध करायचाय!

बरं..मग ही सीट कोणाला मिळायला पाहिजे?

बी जे मेडिकलच्या मेरिट लिस्ट प्रमाणे..कापरेला.

ऑल राईट. त्याला इंटरव्हीन करता येईल.

हे बघ. एकट्या कापरेचा प्रश्न नाहीये.. जर निकाल त्याच्या बाजूने लागला तर बाहेरचे ११७ विद्यार्थी पुण्यात येतील..आणि पुण्यातल्या कोणालाच प्रवेश मिळणार नाही.. इतर सर्व कॉलेजमधे प्रवेश इन्स्टिट्युशनल प्रेफरन्स रुल प्रमाणे देऊन झालेत.

सो यु मीन टु से दॅट देअर विल बी वन वे ट्रॅफिक?

येस!

हाऊ कॅन दॅट बी डन? आय गॉट द पॉइंट!

if this writ petition is allowed
all students from B J will suffer
two supreme court judgements are against him
high court can not give him anything
no problem.. everything will be alright!

८ जानेवारी १९८७, सकाळी ६.००

प्लॅट्फॉर्म नंबर १ की गाडी सिंहगड एक्सप्रेस है! यह गाडी ६ बजकर १० मिनिट मुंबई के लिये रवाना होगी यात्रियोंको निवेदन है कि ...

अरेच्चा! हे फालतू रिट पिटिशन वाचता वाचता ६ कधी वाजले ते कळलेच नाही! चला आत बसू!

चल.. चला रे मित्रांनो..

हे बघ.. तू यायची गरज नाही. आय विल मॅनेज. आणि हे चौघे आहेत बरोबर.. तू सूट..मी आल्यावर फोन करतो..

आर यु शुअर?

आर. डी. तू जा खरचं! आता आमची ओळख झाली आहे, आणि आम्ही चौघे मिळून सातवळेकरांना जी माहिती लागेल ती देऊ. आणि अगदी लागल्यास तुला साडेदहाला फोन करतो..पेडियाट्रिक डिपार्टमेंटमधे.. तू तेंव्हा तिथे थांब म्हणजे झालं..

खरंच जाऊ? माझ खर तर आज केस प्रेझेंटेशन आहे बॉस समोर.. दांडी मारली तर मास्तर काही जिवंत ठेवणार नाही..

जा रे बाबा, मी करतो सगळ व्यवस्थित!

चालेल.. पोचलात मुंबईला की लगेच फोन करा १०:३० ला.. म्हणजे मी बाकीच्या सगळ्यांना सांगतो..

ओ.के. बाय.

नंदू... थॅंक्स अ लॉट! ....

८ जानेवारी १९८७ :

सुदैवान हायकोर्टात सुनावणीच झाली नाही. सरकारी वकीलानं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागीतला. न्यायाधिशांनी एक आठवड्यानंतरची तारीख दिली. नंदूनही फक्त वकीलपत्र दाखल करून इंटरव्हेंशन अर्ज दाखल करण्याची परवानगी मागीतली. त्यान सरकारी वकिलाच्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करून मगच आपले प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला, कारण घाई करण्याची काही गरज नव्हती. सर्व मंडळी पुण्यात परतली. त्या रात्रीचं टेन्शन मात्र कुणीही विसरू शकल नाही!

९ जानेवारी १९८७ :

कॉलेजात त्या बॅचच्या सर्व मुलांची सभा झाली..

सर्वांनी एकजुटीने विरोधात सामील व्हायचं ठरवल..
भराभर पैसे गोळा झाले.. प्रेस कॉन्फरन्स झाली..

पुढच्या २ दिवसांत सर्व वृत्तपत्रांमधे सविस्तर बातम्या छापून येतील याची काळजी घेण्यात आली..

डीन च्या मुलाविरुद्ध वेगाने वातावरण पेटल..

सारे एक झाले..

कॉलेजमधे एकच चर्चा..
या मुलांवरचा अन्याय दूर झालाच पाहीजे..
कापरे तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है!

१० जानेवारी १९८७

नंदूला फोन केला. गेले ३-४ दिवस अंगात ताप असल्याचे त्याच्या आईने सांगीतले. मुंबईला सुद्धा क्रोसिन घेऊनच गेलावता! बघायला घरी गेलो तर महाराज प्रतिज्ञापत्राचा मसुदा करत बसलेले. अंगात २ ताप. तपासल्यावर टायफॉईडची शक्यता वाटली. रक्ताची तपासणी केली.

१२ जानेवारी १९८७

टायफॉईडची चाचणी पॉझिटिव्ह होती! औषध चालू केली आणि १५ दिवस विश्रांती घ्यायला सांगीतली! याचाच अर्थ पुढच्या हियरिंगला नंदू हजर राहू शकणार नव्हता. म्हणजे दुसर्‍या वकिलाचा शोध घ्यायला हवा..परत एकदा टेन्शन!

संगीताचा मेहुणा मुंबईत वकीली करत होता. त्याला फोन केल्यावर मदत करीन म्हणाला. मग नंदूची परवानगी घेऊन त्यानं केलेला कच्चा मसुदा मुंबईला पाठवला. त्याच्यात त्यांनी आवश्यक ते फेरफार करून चौघांच्या तर्फे प्रतिज्ञापत्र तयार केलं. चौघांनी वकीलपत्रावर सह्या केल्या आणि आपल्या मनावरचं ओझ वकिलांच्या खांद्यावर दिलं.


१५ जानेवारी १९८७

पुढच्या सुनावणीच्या वेळी चौघा इंटरव्हीनर्स तर्फे मुंबईच्या सुप्रसिद्ध 'गगराट आणि कंपनी' चे नाव पाहून डीनपुत्राच्या वकिलाचे पाय क्षणभर थरथरल्यासारखे वाटले. न्यायमूर्ती सी. डी. आणि एस. डी यांच्या खंडपीठापुढे याचिका सुनावणीसाठी होती. सरकारी वकील श्री एम. एस. यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केल.

२२ जनेवारी १९८७

डीनपुत्राचे वकील श्री. बीएच यांनी परतीचे प्रतिज्ञपत्र दाखल केलं. आमच्या बाजूनं उभं रहाणार्‍या वकिलांना बोलण्याची गरजच नव्हती!

२७ जानेवारी १९८७

डीनपुत्राच्या वकिलांनी आपला जोरदार युक्तीवाद मांडला. न्यायाधीशही गोंधळात पडल्यासारखे वाटले. सरकारी वकीलाचा गुळमुळीत युक्तीवाद ऐकून न्यायाचा तराजू थोडासा डीन पुत्राच्याबाजूला झुकल्यासारखा वाटला..क्षणभर पोटात गोळाच उभा राहिला. एव्हड्यात गगराट आणि कंपनी तर्फे आलेले सिनियर कौन्सेल श्री ए. उभे राहिले आणि त्यानी त्यांचा युक्तीवाद चालू केला. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण ओजस्वी वाणीने व मुद्देसूद प्रतिपादनाने न्यायदेवतेचा तराजू पुन्हा आमच्या बाजूला झुकल्यासारखा वाटू लागला. शंकेचे काळे ढग बाजूला गेले. डीनपुत्राच्या याचिकेतील चुकीच्या मुद्यांवर स्वच्छ प्रकाश पडला. न्यायाधीश महाराज याचिका फेटाळणार असे वाटते तोच त्यांनी स्टेनोला पाचारण केले..

त्यानी प्रवेशप्रक्रियेवरचा स्टे उठवला..
बीजे तील सर्व मुलांना प्रवेश देण्यास सांगीतले
डीनपुत्राला प्रवेश दिला नाही..
पण याचिकेची अंतीम सुनावणी घेण्यासाठी २३ मार्च ही तारीख मुक्रर केली, आणि याचिका दाखल करून घेतली !

सर्व मंडळींनी सुटकेचा निश्वास सोडला. सिनियर कौन्सेल श्री ए. यांचे मनापासून आभार मानले. पण याचिका दाखल करून घेण्यावर ते नाराज दिसले!

न्यायमूर्तींची ऑर्डर अशी होती...

Corum C.D & A.A JJ
Rule, Since we are informed that the contraversy involved in this writ petition is likely to have a chain of consequences this petition will have to be treated as being filed in a representative capacity so far as the respondants and the persons who are likely tobe affected are concerned. Therefore the Dean of the medical college as well as the D. M. E. R. are directed to notify on the notice board that all the candidates who are likely to be adversely affected by any decision given in this petition are at liberty to apply as either to be joined as party for filing an application allowing them to intervene in this matter. Admissions to be complete without prejudice to the result of this petition. If ultimately the w.p. is allowed some equities will have to be adjusted. We are entertaining this w.p. since it was filed immediately and we would like to make it very clear that if it was not filed immediately after the declaration of admission, we would not have intervened with them on that short ground alone viz. the ground of delay. Rule returnable on 23rd march 1987. Int orders vacated. 27.1.1987 for additional registrar, oral order passed.

फेब्रुवारी ते जून १९८७

त्यानंतर काही दिवसांत बी. जे. मधील सर्व मंडळींना त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळाला. सर्वजण आपापल्या विषयाच्या विभागात रुजू झाले. काही कनिष्ठ निवासी म्हणून तर काही पदव्युत्तर विद्यार्थी म्हणून. हळूहळू सर्वांवरच्या जबाबदार्‍या वाढल्या. चहाच्या टेबलावर या केसच्या ऐवजी वॉर्डातल्या केसेस..पेशंट्ससंबंधी चर्चा होऊ लागली.. वातावरण परत नॉर्मलला आल. डीनपुत्राला सर्वजण विसरले..कामात रमले.

दरम्यान माझाही अभ्यास चालू होता. मे मध्ये एम. डी. ची परिक्षा होती. जसजसे दिवस जवळ येत गेले तसे अभ्यासाचे तास वाढू लागले. फक्त मी आणि पुस्तक, पेशंट्सबद्द्लच्या चर्चा आणि परिक्षा!

परिक्षा झाली!..एक वेगळाच अनुभव देऊन गेली. निकालाची वाट बघत आणि गेल्या ३ वर्षांतल्या कडू गोड आठवणींना उजाळा देत कट्टे परत जमू लागले. एकमेकांना धीर देत काढलेले ते महाविद्यालयातील शेवटचे दिवस अजून आठवतायत!

होय! शेवटचेच!

कारण मी एम. डी. पास झालो!..बालरोगतज्ञ!..मी!

केव्हडा आनंद झाला होता! कोर्टात भांडून प्रवेश मिळवला होता.. तेंव्हाच्या आणि नंतरच्या कष्टांच चीज झालं होतं. नंदूला पेढे द्यायला गेलो तेंव्हा आम्ही दोघांनी लढवलेल्या माझ्या प्रवेशासंबंधीच्या केसच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या!

लगेचच जूनमध्ये मी माझ्या सहाय्यक संशोधकाच्या जागेवर रुजू झालो. माझ्या एम. डी. साठीच्या संशोधनावर आधारीत मतिमंद मुलांच्या पालकांविषयी आय सी एम आर कडून मिळवलेल्या आणि मॅडमच्या हाताखाली करायच्या या संशोधनाचं काम सुरु झालं खर..

पण माझ्या हातून दुसरचं संशोधन घडायचं होत!

१५ जून १९८७

बालरोगशास्त्राच्या विभागात एक नवीनच चेहरा दिसला..

कोण रे हा? मी विचारल.

संजय श्रीवास्तव..मित्राचं उत्तर.

म्हणजे? डीनचा मुलगा?

होय! तोच हा!

पण इथं?

एम. डी. करणारे.

पण मग..?

आजच जॉईन झालाय!

पण कसा काय?

काय माहीत!..

२० जून १९८७ सकाळी ६ वाजता!सिंहगड एक्सप्रेस..

मी माझ्या कामासाठी मुंबईला..

गाडीत बघतो तो कापरे आणि अगरवाल.

काय रे जाड्या! काय म्हणतो?

ओ! आर. डी.! हॅलो! कुठं निघालयस?

डिपार्टमेंटच्या खर्चान जिवाची मुंबई करायला! तुम्ही?

कॉन्फिडेन्शियल कामासाठी!

चायला..

पण तुला सांगायला हरकत नाही!

मलाही सांगायचं नसेल तर आग्रह नाही!

नाही, तुला सांगायलाच पाहिजे. पण इतर कोणालाही..

काय कटकट आहे?

आम्ही 'गगराट' कडे चाललोय! आपले वकील..श्रीवास्तव केस मधील.

पण त्या श्रीवास्तवला प्रवेश दिलाय ना?

होना! कसा काय दिला हेच समजत नाहीये! म्हणूनच आपल्या वकिलांना विचारायला चाललोय की कोर्टात काय झाल म्हणून!

म्हणजे? कापरे? तुम्ही केसच्या वेळी गेलाच नव्हतात?

नाही. अरे वॉर्डातलं काम.. अभ्यास.. आणि आम्हाला प्रवेश मिळाल्यावर खरं सांगायचं तरे इंटरेस्टच गेला सगळ्या प्रकरणातला.

मग आता कशाला जाताय?

अगरवालसाठी. श्रीवास्तवला कोणत्या बेसिसवर प्रवेश दिला ते कळलं तरे अगरवाललाही प्रयत्न करता येतील.

आय डोंट थिंक!

अरे, प्रयत्न करायला काय हरकत आहे?

ऑफ कोर्स. बाय ऑल मीन्स. यू मस्ट ट्राय. एनी वे. बेस्ट ऑफ लक. तुमचा प्रोग्रॅम काय आजचा?
संध्याकाळी परत?

होय. तुझा?

माझं काम १ - १ पर्यंत आटोपेल. जेवायला बरोबर जाऊया!

चालेल. कुठं भेटायचं?

तुम्ही २ वाजता गगराट आणि कंपनीच्या दारापाशी थांबा. मी तिथं येतो.

ओ.के. बाय!

बाय!

सी यू ! दोन वाजता भेटू.

२० जून १९८७, दुपारी २ वाजता

मुंबईची पावसाळी दमट घाण हवा..

अंगातून घामाच्या धारा वाहतायत.

माझ काम आटोपून मी ठरलेल्याजागी पोचतो तो कापरे आणि अगरवाल आईस्क्रीम खात उभे.

कायरे, झालं का काम?

नाही.

का?

गगराट आणि कंपनीचे वकीलही नंतर केससाठी गेलेच नाहीत.

त्यांच बरोबर आहे. तुम्ही सम्पर्क साधला नसेल.

पण कोर्टातही काहीही समजल नाही. केससंबंधी कागदपत्र नाहीयेत म्हणे.

असं कसं होईल? कुणाला भेटालात?

रिट सेक्शनमधे गेलो होतो.

अरे! तिथं कागद नाहीत?

नाही ना. आणि ते तिथले कारकून .. सरळ पैसे मागतात रे..बिनधास्त! ५० रुपये दिलेत तर काम होऊ शकेल म्हणे! असलं टाळक सटकलं होतं!

म्हणून आईस्क्रीम खाताय होय! डोक थंड करायला?

गप ए! आधीच चिडचिड झालीय! तुला हवंय?

आधी जेवू .. मग.

अरे जेवणानंतर परत घेऊच..घे.. एक केशरपिस्ता द्या हो यांना.

पण तुमची ट्रिप फुकटच गेली.

होना.. चल जेवायला जाऊ.....

हे बघा. माझं काम झालय. तुम्हाला हव तर मी परत एकदा ट्राय करतो. माझ्या ओळखीचा एक मॅन आहे रिट सेक्शनमधे.

हे आधी नाही का सांगायचं?

मग तुमची चिडचिड एन्जॉय कशी करता आली असती?

बरं चल आता.

नाही. तुम्ही स्टेशनला जा. डेक्कनक्वीनची तिकिटे काढा. ही बॅग पण न्या. आणि घड्याळाखाली थांबा. मी
येतो वेळेवर.

ओ.के. बाय

......

हॅलो डॉक्टर! इकडे कुठं?

जरा छोटंस काम होत.

करून टाकू.. काय पाहिजे?

अहो एक केस आहे. २५/८७. त्याचं काय झालं ते बघायचय.

एवढच ना? ते रजिस्टर बघा... हां तेच.. त्यात पहा.

२५/८७ .. हां.. सापडलं.. अं.. पण काही समजत नाही.

आणा इकडं. हं. . अहो डॉक्टर ही केस विड्रॉ झालीय.. कुणाची केस आहे?

विड्रॉ म्हणजे? श्रीवास्तव म्हणून मुलाची..

हां..संजय श्रीवास्तव.. त्यानं केस काढून घेतली. हे बघा. अलाऊड टुबी विड्रॉन.. पण इथं सगळी ऑर्डर नाही
दिसत. तुम्ही असं करा.. डिक्री सेक्शनला जा.. त्याची कागदपत्र तिकडे असतील.

जरा तुम्हीच सांगाना फोन करून तिथल्या लोकांना..

बरं.. तुम्ही जा .. त्या मागच्या बिल्डिंगमधे.. मी फोन करतो

बरं..थॅंक्स..येतो.

या.
.....

२० जून दुपारचे ३: ४५

मी डॉक्टर राजीव जोशी.. पुण्याहून आलोय..

हं.. अत्ताच फोन आलावता..

मग दाखवताना ते मॅटर २५/८७

हो.. हे पहा.. संजय श्रीवास्तव विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र.

हां.. तेच तर पाहीजे

काय लिहिलय?..

हं.. ही ऑर्डर आमच्या वेळची म्हणजे २७/१/८७ त्यानंतर २७/३/८७ ला एस.ओ. विथ कन्सेंट.. म्हणजे काय हो?

म्हणजे दोन्ही वकिलांच्या संमतीन पुढची तारीख पडली.

अच्छा.. अरे.. परत.. एस.ओ. विथ कन्सेंट.. म्हणजे दोनदा केस पुढे ढकलली?

हो.

आणि हे शेवटचं दिसतय. अलाउड टु बी विड्रॉनबघू.. बघू हीच ऑर्डर पहायचीय!...

सी. डी. आणि एस. यु जे.जे.
इन व्ह्यु ऑफ द अश्युअरन्सेस दॅटद पिटिशनर इज बिईंग एडमिटेड
सिन्स द सीट हॅज बिकम व्हेकंट
एन्ड ही इज अदरवाईज एलिजिबल
एन्ड देअर आर नो क्लेमंट्स
रिट पिटिशन अलाउड टु बी विड्रॉन
नो कॉस्टस..
१०/६/१९८७

अरे! हे काही कळत नाही.. हा काय प्रकार आहे?

न कळायला काय झालयं.. हे पहा ही १० जून ची ऑर्डर आहे

सी.ड़ी. आणि एस. यु या दोन जजेसच्या खंडपीठाची..

त्याचा अर्थ असा की..

अश्वासनांमुळे, की अर्जदाराला प्रवेश दिला जातोय
कारण एक जागा मोकळी झाली आहे,
आणि तो अन्यथा पात्र आहे
आणि या जागेवर इतर कोणाचा क्लेम नाही..
याचिका काढून घेण्यास परवानगी आहे..
खर्चाची किंमत मिळणार नाही...
काय अवघड आहे यात?..

थांबा थांबा..मी लिहून घेतो.

अहो असं लिहून घेता येत नाही..साहेब आमचा गळा धरतील!

बरं परत एकदा वाचतो.. म्हणजे लक्षात तरी राहील..

बर घ्या लिहून, पण पटकन.. साहेब यायच्या आत हं.
. . . .
अहो हे फार मोठं काम झाल.. चलतो मी.. ४:३० वाजले. ५:१० ची डेक्कन क्वीन गाठायला पळायला
हवं..बरयं..

जाण्यापूर्वी चहा पाठवा बरका ५/६ कप आतमधे ..

हो.. पाठवतो.. पाठवतो.. धन्यवाद हं.. फारच मोठ काम केल तुम्ही.

बाहेरच्या चहावाल्याला आत चहा पाठवायला सांगीतल आणि टॅक्सी गाठली.

२० जून १९८७.. दुपारचे ४:४५

कोर्टापासून व्ही टी पर्यंत १०-१५ मिनिटांचा टॅक्सीचा प्रवास.

सुन्न डोकं. मनात विचारांची प्रचंड खळबळ.

ऑर्डर मिळाली होती..

पण काहीच कळत नव्हतं काय वाचंल आपण?

एक जागा मोकळी..
आणि त्याच्यावर कोणाचा क्लेम नाही?
एम. डी. पेडियाट्रिक्स मधे.. आणि आपल्या कॉलेजात?
शक्यच नाही..
भंग्याच्या पोस्ट साठीही ५६ अर्ज असतील..
ट्रॅफिक जाम
......

विचार परत सुरु!

एम. डी. पेडियाट्रिक्स साठी अर्ज नाहीत?

मग अगरवाल काय म्हणतो.. की त्याला मिळू शकेल म्हणून..

अर्ज न करता?.. हॅ.. इतका मूर्ख तो निश्चितच नाही..

पण मग त्याला न देता श्रीवास्तवला कशी दिली?

कोणास ठाऊक..

अगरवाललाच विचारायला पाहिजे.
. . . . .

टॅक्सी थांबली. घड्याळात ५.००.. खाली जाड्या .. रड्या!

काय रे? मिळाली का जागा?

हो. एस सी ५.. चल पटकन

जाड्या पळ.. नाहीतर गाडी सुटेल..

माझ्याशी खुन्नस? फेकून देऊ का तुझी बॅग?

बर भाऊ.. चल.. दे ती बॅग इकडे..

तुम्ही व्हा पुढं..

आम्ही पुढेच आहोत अगरवाल.. तुला आता पळायलाचं हव!!!
. . . . .

गाडीत बसलो आणि शिट्टी वाजली..विचारांनी वेग घेतला!
. . . . .

का रे आर. ड्या? गप्प का? कोर्टात काय झालं?

तू एम. डी. ला अर्ज केला होतास का?

ऑफ कोर्स! का?.. काय झालं?

काही तरी भानगड आहे. त्या ऑर्डरमधे तर लिहिलय की कोणीही क्लेमंट नव्हता म्हणून.

क्लेमंट? कसला क्लेमंट?

एक जागा मोकळी झाली.. त्या जागेला क्लेमंट नव्हता.

जागा मोकळी झाली? एम. डी. पेडियाट्रिक्समधे? कधी?

ते तुम्हालाच माहीत.

जागा कुठं मोकळी झाली? आम्हाला तर माहीत नाही!

पण ऑर्डरमधे तर लिहिलयना तस!

पण तशी नोटीस कुठे लावली होती.. जागा मोकळी असल्याची?

असणारच. त्याच्याशिवाय का कोर्टात सांगतील असं?

अरे .. नाही रे! रोज नोटीस बोर्ड बघतोय आम्ही.

तू बघितली नसशील ती नोटीस..

हॅ.. काहीही.. पाहिजे तर कापरेला विचार.. काय कापरे?

नाही.. नोटीस नव्हती लावली..

बघू ती ऑर्डर..

थांब आधी कॉफी पिउया.. का सूप हवयं !
. . . . .

19 जून १९८७ रात्री ८.३०

पुणे स्टेशन वर उतरलो.संपूर्ण प्रवासात झालेल्या चर्चेचे सार असे, की एम. डी. ला प्रवेश दिलेल्या ७ जणांपैकी कोणीही राजीनामा दिलेला नव्हता. त्यामुळे जागा मोकळी होण्याचा प्रश्नच नव्हता! थोडक्यात एक जागा वाढवली आणि ती डीनच्या मुलाला दिली. किंवा कोर्टाच्या ऑर्डरचा अर्थ आपल्याला नीट कळला नाही. त्यासाठी नंदूलाच भेटायला लागेल. रात्री घरी जाण्यापूर्वी मी नंदूला भेटायचं आणि दुसर्‍या दिवशी कॉलेजात कुणालाही काहीही न सांगता जेवणाच्या वेळी भेटायचं ठरल. त्याप्रमाणे स्टेशनवरूनच नंदूच्या घरी फोन केला तर तो आठ दिवसांसाठी गावाला गेल्याचं कळलं..

मग आता?

हे बघ काहीतरी गेम निश्चित आहे. आपण एक आयडीया करू. तुम्ही श्रीवास्तवलाच विचारा, तुला प्रवेश मिळाला म्हणून. तुम्हाला काहीही माहीत नाही अस दाखवा. बघा तर खर काय म्हणतोय ते!

चालेल! उद्याच विचारतो. उद्या ए युनिटची पिकनिक आहे. तेंव्हा विचारतो.

तो ए युनिटला आहे का?

हो. मॅडमचा स्टुडंट.

मग मी मॅडमनाच विचारतो. तुम्ही त्याला विचारा!

२० जून १९८७ सकाळी ९ वाजता.

गुड मॉर्निंग मॅडम.

हॅलो राजू. हाउ आर यू?

फाईन मॅडम. काल त्या रेफरन्सेस साठी मुंबईला गेलो होतो.

मग? मिळाले का?

हो. हे घ्या. झेरॉक्स आणल्यायत.

फर्स्ट क्लास!.. मला खात्रीच होती.. वाचलस का?

हो. कालच वाचलं. या नोट्स.

गुड. कुठं मिळालं रे शेवटी?

त्या कॅन्सर रिसर्च सेंटर च्या लायब्ररी मधे. मॅडम तिथल्या लायब्ररियन बाईंनी फार मदत केली. त्यांना थॅंक्सच पत्रं पाठवूयात का तुमच्या सहीचं. बरं दिसेल!

येस. तू लगेच ड्राफ्ट कर.. हसीनाला टाईप करायला सांग.. आणि सहीसाठी घेऊन ये म्हणाव. आणि तू स्वत: ते पोस्टात टाक.

मी ड्राफ्ट तुम्हाला दाखवतो. तुम्ही सुधारणा करून..

काही गरज नाही. मी डोळे झाकून सही करीन. जा.

आणि मॅडम.. मुंबईहून बरच सामान आणलय. ही बिलं. तुम्ही एकदा बघून घुमेकडे द्याल का? जवळजवळ १२०० रुपयांची आहेत.

मग तूच दे घुमेकडे. आणि लगेच पैसे ही घे. आणि ट्रिपचेसुद्धा पैसे घे. तुझ्या खिशातले खर्च करायची गरज नाही.

तो हिशोब लिहून तुम्हाला दाखवू का?

नको रे. तू खर्च झाले तेव्हडे घे घुमेकडून. थांब. हसीना.. एक कोरा कागद आण.. हं.. हे घे. मी लिहिलय सॅंक्शन म्हणून आणि सही सुद्धा केलीय. त्याच्यावर तू खर्च लिही.. आणि पैसे घे.

थॅंक्यू मॅडम..

वेलकम. आय नो दॅट यू वोंट चीट.

आणि मॅडम.. अजून एक काम होत. तुम्ही खूप बीझी अहात का?

अं.. बोल.. काय रे?

मॅडम.. संजय श्रीवास्तव तुमचा स्टुडंट आहे का?

का रे?

नाही..त्यानं कोर्टात केस केली होती..

अरे हो. त्यानं पण तुझ्यासारखीच कोर्टात भांडून सीट मिळवली.. आणि गंमत बघ. माझ्या वाट्याला सगळे
भांडखोर स्टुडंट्सच येतात. गंभीर.. तू.. आणि सगळेच चांगले असतात. डीन सरांचा मुलगाही फारच चांगला आहे..

मॅडम.. त्याच्या केसमधलं जजमेंट वाचलयं का तुम्ही?

मी.. नाही. का रे?

नाही.. मला हवं होतं. म्हणजे माझ्याकडे बरीच जजमेंटस आहेत आता.. गेल्या ३-४ वर्षांतली. बरीच मुलं विचारायला येतात.. म्हणून म्हटलं .. तुमच्याकडे असेल तर माझ्या रेकॉर्डला राहील..

नाही रे. माझ्या कडे नाही.

मग तुम्ही मागून घ्याल का डीनच्या ऑफीस मधून..?

जाऊ दे रे. आपल्याला काय करायचयं.. हॅलो सर!

एव्हड्यात आमचे सिनियर 'बॉस' मॅडमना भेटायला आले आणि मी सटकलो..!

२० जून १९८७ सकाळचे ११:३०

वॉर्डातल सकाळच काम संपवून कॅन्टीनकडे निघालो तोच अनिता भेटली.

हाय आर. डी.!

हॅलो अनिता, हाऊ आर यू?

ए माझ तुझ्याकडे काम होतं. आर यू बीझी?

येस. आय एम ऑलवेज बीझी..बट इफ यू हॅव द इन्क्लिनेशन, आय हॅव द टाईम!

चल कॅन्टीनला..

नो. काम तुझ आहे. कॉफी हाउसला ट्रीट!

ओ.के. डू यू हॅव अ बाईक?

येस..कम
. . . . .

अरे तुला माहीत आहे का?

काय?

त्या श्रीवास्तवला कशी एडमिशन मिळाली ते?

न.. नाही..का ग?

अरे, तो नीट काहीच सांगत नाहीये.

काल त्याच्या बरोबर कॉफी हाउसला आली होतीस का? बर चाललय हं.

ए..गप..त्याला काल जनरल विचारल.. तर तो म्हणाला कोर्टाचं जजमेंट झालं..१० तारखेला.

काय म्हणून?

की बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या म्हणून.. आणि निघून गेला....मग मला मिळेल का? मुंबईला वगैरे? आता आपल्या कॉलेजात मीच पहिली आहे वेटिंग लिस्ट मधे.

आणि अगरवाल?

तो माझ्या नंतर..मला त्याच्यापेक्षा एक मार्क जास्ती आहे.

बरं चल..बघू मग.. मॅडम बोंब मारतील माझ्या नावानं!

नो, शी वोंट. आय नो यू आर हर पेट!

थॅंक्स.. पैसे पाहिजे तर मी देतो.. पण उगाच बोअर मारू नकोस. म्हणे यू आर हर पेट!

ऑफ कोर्स. शी टेल्स एव्हरीवन.. यू आर हर ब्लू आईड बॉय.

ए बाई.. गप ना आता.. का जाऊ मी? तू ये रिक्षान मागून.

बर. चल. एव्हड चिडायला काय झालं?

२३ जून १९८७

सकाळी डिपार्टमेंटला गेलो तोच..

राजू..

येस मॅडम.

अरे.. तू परवा काय म्हणत होतास संजयबद्दल?

मॅडम, त्याच्या एडमिशनबद्दल काहीतरी भानगड आहे असं म्हणतात.

भानगड? अरे त्याने तर कोर्टातून सीट मिळवलीय.. त्यात भानगड काय असणार? कोर्टाचं जजमेंटच आहे ..

पण मॅडम, तुम्ही तर जजमेंट वाचलच नाहीये ना?

पण मी विचारल काल डीन सरांना. त्यांनी सांगीतलं. आणि त्यांनी युनिव्हर्सिटीलाही तस कळवलय.. आणि मलाही लेखी कळवणारेत.. एक दोन दिवसात.

मॅडम, काहीतरी भानगड आहे खास!

मला नाही वाटत.

माझी तर खात्रीच आहे. बघा तुम्ही. मी चार दिवसांत तुम्हाला सांगतो. पण मॅडम एक सांगतो. या एडमिशनच्या बाबतीत तुम्ही निश्चित सावध रहा.

कशावरून?

आणि प्लीज कशावरही सही करण्यापूर्वी नीट वाचा. तुम्ही माझ्यासारखा विश्वास इतरांवर टाकाल.. आणि कुठेतरी अडकाल..

जाऊ दे रे राजू.. तुला काय करायचय? आपल्याला कोणी काही करू शकत नाही. मी काही कोणाला लेखी दिलं नाही आणि देणारही नाही. यू डोंट वरी. आणि हे बघ. तुला इथं रिसर्च करायचाय .. तू कशाला इतर बाबतीत लक्ष देतोस? आणि दुसरं. डीन सरांचा मुलगा आपल्या डिपार्टमेंटला आला यात आपलं हितच आहे. आपले प्रॉजेक्टस.. आणि डीन सर फारच चांगले आहेत.. आत्तापर्यंतच्या सर्व डीन्स पेक्षा..तुला माहीत नाही. माझी ट्रान्स्फर कॅन्सल करण्यासाठी त्यांनी रेकमेंड केलं होत.. त्यांच्यामुळेच तर आपले प्रॉजेक्टस नीट चालू शकतील. आणि हे बघ. यू लुक आफ्टर युवर इंटरेस्ट.. तुला काय फरक पडतो त्यांनी भानगड केली असेल तर? तुझं काही नुकसान तर नाही ना? तू एखाद्या गोष्टीत लक्ष घातलस की उगाच इनव्हॉलव्ह होतोस.. म्हणून आपल्या डिपार्टमेन्टच्या हितासाठी.. प्लीज डोंट पोक यूअर नोज इंटू धिस..!
. . . . . . . . . .

माझा मेंदू सुन्न झालावता.. तसाच घरी गेलो. चहा होतोय तोच अगरवालचा फोन.

आर. ड्या. चायला तू यायला पाहिजे होत सिंहगडला. काय मजा आली!

तू त्या श्रीवास्तवचं बोल...

त्यानं उडवाउडवीची उत्तर दिली. त्याला प्रवेश द्यायला सांगीतलय अस म्हणाला.. म्हणे जजमेंटची कॉपीच
नाहीये.

बरं.. उद्या भेटू.. ये कॉलेजात.

२४ जून १९८७

सकाळी सकाळीच नंदूचा फोन आला.

हॅलो. अरे तू फोन केलावतासका?

हो.. अरे एक गंमत दाखवायची होती.

गंमत?

अरे कोर्टाची ऑर्डर आहे..त्याचा अर्थच समजत नाही.

कधीची ऑर्डर आहे?

१० जून.

म्हणजे अत्ता अत्ताची? कुठल्या केस संबंधी?

आपल्या त्या श्रीवास्तव केस संबंधी..

काय झाल रे पुढे?

अरे, त्याला प्रवेश दिलाय.. पण ऑर्डर विचित्र आहे.

मग ये ना आत्ता. ब्रेकफास्टलाच ये. मी वाट पहातो.

ओ.के
. . . . .

ही बघ ऑर्डर..

हॅ, यात काय विचित्र आहे?

अरे, पण सीटच व्हेकंट नाहीये?

काय?

आणि किमान २-३ जण आहेत वेटिंगलिस्टमध्ये.

मग परत नोटीस लावली असेल.

नाही ना. कुणालाच माहीत नाही. नोटीसच नव्हती.

पण मग कशी दिली त्याला? आपण तर तो पात्रच नाही याच्यावरच अर्ग्युमेन्ट केलं होतं.

हो ना. म्हणूनच म्हणतो..ऑर्डर विचित्र आहे! त्यातील प्रत्येक ओळ खोटी आहे!

तुला कुठे मिळाली?मी मुंबईला जाऊन हायकोर्टात स्वत: पाहून आलोय.

मग सरकारी वकिलानी काही स्टेटमेंट फाईल केलयका?

नाही.. ते नाही मी बघितल.

बर. मग आता काय ह्याचं?

अरे जागा वाढली हे नक्की. मग ती आपल्याच कॉलेजातील मुलाला नको का मिळायला?

पण त्यांनी लगेचच केस फाईल करायला पाहिजे. कोणी इन्टरेस्टेड आहे का?

पण तुला नाही वाटत.. डीनच्या वकीलाने कोर्टात खोटं स्टेटमेन्ट केलय असं?

शक्यता आहे. पण नीट काय ते बघायला पाहिजे.

मग तू मुंबईला जाशील तेंव्हा ते बघशील का?

पण कोणी केस करणार असेल तर उपयोग!

ते मी पहातो.

मग मी उद्या संध्याकाळी मुंबईहून आलो की फोन करीन. तोपर्यंत तू कोणी केस करायला तयार आहे का ते पहा
. . . . . .

जाड्या.. नंदू भेटला. अत्ता त्याच्याकडूनच येतोय.

मग काय म्हणाला?

कोणी इन्टरेस्टेड असेल तर लगेच केस करायला लागेल.

मग मी करतो.

दोन तीन गोष्टी आहेत. अनिता तुझ्या वर आहे मेरिट लिस्टमध्ये.

मग तिला करु दे.. आणि मी ही करतो.

काय उपयोग?

जर डीनच्या मुलासाठी एक जागा वाढवता येत असेल तर आमच्यासाठी अजून दोन वाढवा म्हणावं.

ते नंदूला विचारू. तो उद्या मुंबईला जाणार आहे तेंव्हा कागदपत्र बघेल.तोपर्यंत आपण अनिताला विचारु.

चल. मला वाटतं ती वॉर्डात आहे
. . . . .

ए अनिता.. चलं कॅन्टीनला..

नो. काम तुझं आहे. कॉफी हाऊस!

सॉरी.. काम तुझचं आहे.. पण कॅन्टीन चालेल.

चल..

काही कळलं का?

हो. जाड्या तूच सांग
. . . . .

आणि अजून एक .. मी मॅडमशी बोललो.

मग ? काय म्हणाल्या?

हे बघा. कुणाला सांगू नका.. पण त्या म्हणाल्या.. डिपार्टमेंट च्या हितासाठी डोंट पोक युअर नोज इन्टु धिस..

चायला.. प्रॉब्लेमच आहे!

आर डी.. उगाच तुझी रिलेशन्स स्पॉईल होतील..

म्हणूनच मी गुपचूप मदत करीन.

यापुढे आपण कॉलेजात भेटायचं नाही. आणि धिस शुड बी सिक्रेट!
. . . . .

मी घरी विचारते.. वडिलांना

ठीक आहे.. आणि मला घरी फोन कर..

ओ. के. बाय. साधारण किती खर्च येईल रे?

येईल ३-४ हजार रुपये.. अच्छा!

२३ जून १९८७ रात्री १०

हॅलो, मी अनिता बोलतेय..

बोल अनिता, वडिल काय म्हणाले?

आर डी, प्रॉब्लेम आहे. मी मेरिट..सॉरी..वेटिंग लिस्ट मधे दुसरी आहे. पहिली संगीता!

पण ती तर रेडिऑलॉजी करत्यैय ना?

तिनी राजीनामा दिलाय तिथला.. आणि एम. डी. पेडियाट्रिक्सस तिचा वरचा चॉईस आहे. आणि तिला माझ्यापेक्षा एक मार्क जास्ती आहे!

तुला कसं कळल?

ती भेटली होती कॅन्टीनमधे. तुलाच शोधत होती.

मग ती केस करायला तयार आहे का?

नाही ना. ती म्हणते मी नाही केस करणार. आणि मी केस केली तरी सीट तिलाच मिळायला पाहिजे. मग मी कशाला केस करू?

तस तिचं बरोबर आहे, तिला मार्क जास्त असतील तर. पण ती का नाही केस करणार?

ती म्हणते मॅडमशी रिलेशन्स स्पॉईल होतील.

मग तू कर.. आपण नंदूला विचारू.

अरे पण मॅडम त्याच्या बाजूने असतील तर मी डीसीएच सुद्धा होणार नाही आणि केस जिंकले तरी एम. डी. मिळायचे चान्सेस नाहीत. मग मी कशाला या फंदात पडू? माझे वडिल म्हणाले..तेलही जायचं आणि तूपही! उगाच मॅडमशी खुन्नस निर्माण होईल.

येस, देअर इज सेन्स इन व्हॉट यू आर सेइंग. पण हे बघ. अगरवाल, तू आणि संगीता अशी तिघांनी मिळून केस केली तर.. मी तिच्याशी बोलतो.

अरे पण ३-४ हजार..

हे बघ, आपण खर्चाचा प्रश्न सोडवू. आपण मागे जमवलेले असतील थोडे शिल्लक. मी मंदारशी बोलतो. आणि नंदूशी ही बोलतो.. किती चान्स आहे जिंकायचा ते विचारतो. मला संगीताचा फोन नंबर दे.

ओ.के. ४७३२६९.

गुड नाईट!

२३ जून १९८७ रात्री १०:१५

हॅलो, संगीता आहे?

मीच बोलत्यैय..कोण?

मी. आर. डी. तू कॉलेजात शोधत होतीस मला?

हो. अनिता भेटली होती कॅन्टीन मधे.

तुला ते श्रीवास्तव प्रकरण कळलयना?

हो. पण मी नाही केस करणार.

का ग?

अरे.. उगाच मॅडमशी खुन्नस.. आणि माझ्या घरचेही नको म्हणतात केस करायला.

अग, मग अनिताला करु दे ना! तू सीट क्लेम नको करु..

पण मला तिच्या पेक्षा एक मार्क जास्ती आहे..

मग तुम्ही तिघांनीही केस करा ना..

पण माझा नवरा..

ओ.के. गुड नाईट!

२५ जून १९८७ सकाळी ७:३०

नंदूच्या घरी गेलो सकाळी सकाळीच!

या!काय रे! काय सापडलं?

हे बघ आर. डी. धिस इज अ स्कॅन्डल!

व्हॉट?

मी सगळे कागद पाहिले. त्यांनी काहीच फाईल केलं नाहीये! नुसतचं तोंडी स्टेटमेंट केलय!

म्हणजे? कोर्टात थापा मारल्या आहेत?

होय. धडधडीत खोट स्टेटमेंट केलय.

म्हणजे डीनच्या आणि मुलाच्या वकिलांनी मिळून..

होय. क्लीन कॉन्स्पिरसी.

धिस इज सीरीयस!

त्यांनी सॉलीड डोकं वापरलय.

म्हणजे?अरे कोर्ट विल नेव्हर इमॅजिन दॅट द पिटिशनर एन्ड द रिस्पॉन्डन्टस आर कॉन्स्पिरेटिंग!

म्हणजे? यांनी केलं तरी काय?

कोर्टात खोटं स्टेटमेंट करून केस काढून घेतली. कोर्टाच काय जातय? त्यांना बरंच आहे.

अरे पण हे पचलं तर उद्या अजून एखाद्या मुलाला असाच प्रवेश देतील की हे चोर.

पॉसिबल. कोर्ट कुठं जातय बघायला की व्हेकन्सी आहे की नाही? कोणी अर्ज केलाय की नाही? त्यांच्या समोर दोन्ही पक्ष जे ठेवतील त्याच्यावर ते ऑर्डर पास करणार.

मग हे तर फारच सिरीयस आहे. बाहेर हे लोक पसरवतात की कोर्टाचं जजमेंट झालं म्हणून.

समवन हॅज टू फाईट अगेन्स्ट धिस.. कोणी तयार झाल का?

नाही ना! मोठीच गोची आहे. अगरवाल तिसरा आहे, तो केस करायला एका पायावर तयार आहे. त्याच्यावर अनिता आहे. ती म्हणते मी केस करीन पण सीट संगीताला मिळेल कारण ती पहिली आहे. आणि संगीता म्हणते माझा नवरा म्हणतो केस करू नको म्हणून..

मग तिला म्हणावं अंडरटेकिंग दे की मी माझा क्लेम सोडीन.

नाही ना. ती म्हणते अनिता केस जिंकली तर सीट ती क्लेम करणार.

चायला! मग?

अगरवाल म्हणतो की श्रीवास्तवसाठी एक जागा वाढवता येत असेल तर आमच्यासाठी आणखी दोन/तीन वाढवा. त्याचं लॉजिक बरोबर आहे..

पण कोर्टाला ते पटणार नाही ना. त्यांनी फक्त संगीताला सीट दिली तर अगरवाल मला फाडून खाईल!

ठीक आहे. मी परत तिघांशी बोलतो. किमान तीन क्लेमंट्स आहेत हे तर नक्की..मीच केस करू का? या केसमधे कोर्टाची फसवणूक केली आहे म्हणून?

तुझा काय संबंध? कोणीतरी अफेक्टेड पार्टी पाहीजे!
. . . . . . . . . . . . . . .

मी परत तिघांशी बोललो. ३-४ वेळा. पण तिढा काही सुटत नव्हता. माझी रात्रीची झोप उडाली होती. अन्याय सहन होत नव्हता. आणि वेळ जाऊनही उपयोग नव्हता. माझा संबंध नसल्यामुळे नंदू मी केस करायच्या विरुद्ध होता. मग आम्ही ठरवलं सरळ हायकोर्टाच्या चीफ जस्टीसना पत्र लिहायचं. डीनने कोर्टाला फसवल्याबद्दल. त्यांना त्याचं सोयरसुतक असेल तर ते करतील काहीतरी या बाबतीत!

६ जुलै १९८७

टु द ऑनरेबल चीफ जस्टीस
हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ऑफ बॉम्बे
बॉम्बे ४००००१
रिस्पेक्टेड सर,
............
युवर्स फेथफुली,
डॉ. राजीव जोशी.

२९ जुलै १९८७

सकाळी सकाळीच पत्र हातात मिळालं
.......
यू ऑर अदर अफेक्टेड पर्सनस मे इन्स्टिट्युट लीगल प्रोसिडिंग्ज एज मे बी एडव्हाईस्ड....
फॉर चीफ जस्टीस
हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ऑफ बॉम्बे

म्हणजे चीफ जस्टीसनी मलाच केस करायला परवानगी दिली होती!

आता?..


२९ जुलै १९८७

आज नाईट ड्युटी असल्यामुळे दिवसभर वेळ होता. तेंव्हा ठरवलं की आजच युनिव्हर्सिटीत जावे. या लोकांनी कोर्टाला फसवलय. त्यानी युनिव्हर्सिटीला काय कळवलय ते कळलं तर बर होईल.

नमस्कार! मी डॉक्टर राजीव जोशी.

हो. अहो मी ओळखतो तुम्हाला. तुम्हीच मागे एडमिशनसाठी केस लावली होती ना?

होय.

मग आता काय विशेष?

अहो, त्या संजय श्रीवास्तवने कोर्टात केस केली होती.. तरी त्याला अजून रजिस्ट्रेशनचं पत्र मिळालं नाहीये. मी इकडे दुसर्‍या कामासाठी आलो होतो. तेंव्हा मला म्हणाला की असल तर घेऊन ये. झालय का तयार?

अहो.. मीच तर पाठवलं होत. डीनच पत्र आल्यावर लगेच!

पण त्याला मिळालं नाहीये. तुमच्याकडेच चुकून राहिलं नसेल ना?

छे हो. मीच पाठवलय. एक मिनिट. ही त्याची फाईल.

पण डीनने कळवल होतं ना तुम्हाला की त्याला प्रवेश द्या..

हो. हे काय. हे डीनचं पत्र आणि ही आम्ही पाठवलेल्या पत्राची कार्बन कॉपी. आणि हा इतर कॉरसपॉन्डन्स.
अरे. तुम्ही तर पाठवलय की! एक मिनिट. मी त्या पत्राचा क्रमांक लिहून घेऊ का? म्हणजे आमच्या कॉलेजात शोधता येईल.

घ्या.. आम्हाला काय? आम्ही पाठवलय.

जरा एक कोरा कागद देता का?

जरूर!

त्यांनी शेजारच्या खोलीतून कागद आणेपर्यंत मी चटकन फाईल चाळली.

त्यात एक मॅडमच्या सहीचं पत्र होतं
एक डीनच्या वकीलाची नोट होती,
एक मुलाच्या वकीलाचं पत्र होतं,
आणि युनिव्हर्सिटीचं रजिस्ट्रेशनचं पत्र होतं.

हं. हा घ्या कागद.युनिव्हर्सिटी लेटर क्रमांक
. . . . .

आणि डीनच्या पत्राचा नंबरही घेतो.

अहो. कशाला?

त्याला सांगतो की हे पत्र मिळाल्याबरोबर तुम्ही रजिस्ट्रेशन दिलय..

त्याची काही गरज नाही हो.

बघू हो. परत परत खेपा नकोत. हं. कॉलेज लेटर क्रमांक..

भराभर पत्र वाचल.. मजकूर वाचताच डोळे गरागर फिरले..पण चेहर्‍यावरचे भाव जराही न बदलून देता फाईल परत देताना म्हटल,

थॅंक्स.. फारच महत्वाचं काम झालं. ....

चटकन बाहेर पडलो आणि बाहेरच्या टेबलावर तो कागद ठेऊन वाचलेला मजकूर लिहून काढला
......
द ऑनरेबल कोर्ट वॉज प्लीज्ड टु पास द ऑर्डर दॅट डॉ संजय श्रीवास्तव बी एडमिटेड टु द एम. डी. पेडियाट्रिक्स कोर्स....

डीननं धडधडीत खोटं लिहिलवत की कोर्टान संजय श्रीवास्तवला प्रवेश द्या अशी आज्ञा केली
.....

प्रत्यक्षात घडलं वेगळच होतं!..

आणि पुढे बरचं काही घडणार होत.

कारण मी केस करायचं मनात पक्क केलवतं!

२९ जुलै १९८७ रात्री १०.३०

नाईट ड्युटीतील माझा जोडीदार जेवून आल्यनंतर मी गिरीश बरोबर जेवायला गेलो. माझं मन ताळ्यावरचं नव्हतं. त्याला सगळी गोष्ट सांगीतली. त्याला म्हणालो,

" गिरिश, माझा भयंकर संताप झालाय. अरे, काय समजतात हे लोक स्वत:ला? त्यांनी कोर्टाला फसवलय. आणि युनिव्हर्सिटीलाही! मधल्यामधे स्वत:चा फायदा! सर्व नियम कोर्ट, कायदा या सगळ्याना धाब्यावर बसवून बिनधास्त स्वत:ला पाहिजे ते करतात. आणि आमच्या प्रवेशांच्या वेळी मात्र नियमांचा चुकीचा अर्थ लावून कायदेशीर प्रवेश नाकारायचा .. आणि पैसे खाऊन आपल्या पित्यांना द्यायचा. माजखोर लेकाचे. माझ्या प्रवेशाच्या वेळी मी ९ महिनी भांडलो, एवढे पैसे खर्च केले .. यांना काहीच शिक्षा नाही. नंतर घैसास, जाजू, प्रसाद, कुकडे माझ्या आधी वाघमारे, तासवाला, गंभीर .. अरे काय चाललय काय? आपल्या कॉलेजातून गेल्या ५ वर्षात ४० केसेस झाल्या. बेकायदेशीर प्रवेश देण्याविरुद्ध! आणि प्रत्येक वेळी एक एक सीट वाढवली. काय मोगलाई आहे काय? आमच्यावर अन्याय करताना लाजा नाही वाटत?

"आर. ड्या. एकदा तरी कोर्टानं बेकायदेशीर सीट रद्द केली आहे का?"

गिरीश, त्याला कारण आहे. माझ्या प्रवेशाच्या वेळी मला सीट देतायत म्हटल्यावर माझा वकील गप्प बसला. त्या मुलीला जास्तीची जागा मिळाली. माझ्या वकीलाच्या दृष्टीने काहीच बिघडल नाही. पण आता मात्र कहर झाला.

तेच म्हणतोय मी. कोर्ट बेकायदेशीर सीट रद्द करत नाहीत याचा हे फायदा घेतात. आणि कोर्टानं सीट रद्द करेस्तोपर्यंत असच चालणार.

येस. आय एग्री. कोर्टाला हे कुणीतरी सांगायलाच हव. आणि ही संधी छान आहे. मला काहीच नकोय. फक्त त्याची सीट रद्द करा.. बेकायदेशीर आहे म्हणून.. कोर्टाला फसवलय म्हणून. एवढचं म्हणायच माझ्या केसमधे.

आपल्या केस मधे. आय एम विथ यू!


३० जुलै १९८७

नाईट ड्युटी संपवून घरी जाण्यापूर्वी नंदूच्या घरी गेलो.

नंदू.. हे बघ! चीफ जस्टीसच! पत्र!

ऑं! उत्तर आलं? चक्क? काय सांगतोस? बघू..

हे घे.

यू ऑर अदर अफेक्टेड पर्सनस .. छान. नाऊ द बॉल इज इन युवर कोर्ट.

आणि युनिव्हर्सिटीलाही डीन ने खोटंच कळवलयं! हे बघ.

ऑं! बी एडमिटेड! अरे काय बिनधास्त आहेत हे लोक? क्लास! पण संपूर्ण पत्र लागेल.

पूर्ण पत्र मिळण अवघड आहे. आणि अजून बराच पत्रव्यवहार आहे. मॅडमचं ही एक पत्र आहे. पण वाचायला नाही मिळाल. मग करायची का केस?

तू ठरव. आय एम रेडी!

. . . . . . . .

घरी गेलो आणि सर्वप्रथम माझ्या धाकट्या भावाला सांगीतलं. त्यानं एल एल बी केल्यानंतर वडिलांच्या व्यवसायात विस्तार करणे पसंत केल्यामुळे वकीलीचा मार्ग सोडला होता. सर्व इतिहास ऐकून तो म्हणाला,

तुमच्या कॉलेजच्या डीनने कोर्टाला फसवलं? पॉश!

एवढ्यात बेल वाजली आणि मी दार उघडल!

नमस्कार, मी वैदेही. रवी आहे?

तिचा आवाज ऐकून रवी सुद्धा बाहेर आला.

हॅल्लो! कधी आलीस इंग्लंडहून?

परवाच.

एल एल एम झाल?

येस!

एव्हड्यात?

अरे आपण इथे एव्हडी घासतो. तिथे माझा १८ महिन्यांचा अभ्यासक्रम ९ महिन्यात संपला. मग मी परिक्षेला बसायला परवानगी मागीतली आणि चक्क पास झाले.. विथ फ्लाईंग कलर्स!

कॉंग्रॅट्स! मानला!थांब. तुझी ओळख करून देतो. राजू ही वैदेही. वैदेही हा माझा भाऊ, राजू. बालरोगतज्ञ. आता जेनेटिक्स मधे रिसर्च करतोय.

हॅलो एन्ड कॉन्ग्रॅटस!

वैदेही, राजू हायकोर्टात केस करायचं म्हणतोय. पी आय एल!

पी आय एल? कशाबद्दल?

डीन्स सन्स एडमिशन स्कॅन्डल! आणि त्याने सर्व केस वैदेहीला २ मिनिटात सांगीतली, आणि मला कळल.. पी आय एल म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन!

अरे, सॉलीडच लफड आहे हे! यू हॅव अ वॉटरटाईट केस!

राजू तू केस केलीस तर वैदेहीला पण घे वकील म्हणून. तिने अजून कोर्टात अर्ग्युमेन्ट केल नाहीये. पण कॉलेजच्या मूट कोर्ट मधे बक्षिसं मिळवली आहेत.

ओ.के. डन. नंदू आणि वैदेही. नंदूशी बोलतो मी. तू ओळखतेस?

नाही. पण आता होईलच.

वैदेही.. कॉफी पाहीजे.. पहिली केस मिळाली, आणि ती ही पी आय एल!

तुझ्याकडे ते ओरिजिनल पिटीशन आहे?

आहे ना. हे बघ.

मी नेऊ वाचायला?

ने ना. पण कॉफीचं काय? इती रवी!

चला.

"अग आज घरी आलीयस तर कॉफी इथेच प्या. "
एवढा वेळ आमच्या गप्पांकडे लक्ष असलेली माझी आई म्हणाली!

३० जुलै संध्याकाळ

झोप काढून उठलो आणि नंदूच्या घरी गेलो.

नंदू.. पी आय एल करायच.

गुड. हम तुम्हारे साथ है

आणि तुला ती वैदेही ठकार माहीत आहे का?

हो. इंग्लंडला गेलेली ना?

हो. तीच. ती आता परत आलीय. रवीची ती मैत्रीण आहे. ती ही मदत करीन म्हणाली. अर्थात तिने कोर्टात अर्ग्युमेंट केल नाही कधी..

काही बिघडत नाही. कधीतरी सुरुवात करायचीच असते. मी नाही का तुझ्याच केसने हायकोर्टातल्या प्रॅक्टीसची सुरुवात केली?

मग कधी बसायचं?

उद्या रात्री. आज मी जरा विचार करून मुद्दे काढून ठेवतो
. . . . .

३१ जुलै १९८७

रवी आणि वैदेही शिवदे सरांकडे गेले. ते ही मदत करीन म्हणाले. त्यानी सांगीतल, एक संघटना स्थापन करा.. पब्लीक इंटरेस्ट ग्रुप आणि त्या संघटने तर्फे केस लावा. म्हणजे केसला वजन येईल. शुभेच्छा आणि प्रसिध्द न्यायाधिशांचे एक जजमेंट दिलं .. ज्यात म्हटल होत.. हू विल वॉच द वॉचमन? श्रीवास्तवच्या केस मध्ये काहीच दम नाही अस त्यांचही मत पडल.

संध्याकाळी ७:३०

नंदूच्या घरी जमलो. संघटना स्थापन करायचं नक्की झालं. नाव ठरलं "मेडिकोज लीगल एड असोसिएशन". स्ट्रॅटेजी म्हणून संघटनेतर्फे वैदेही ठकार आणि डॉ राजीव जोशींतर्फे नंदू सातवळेकर अशी वकीलपत्र दाखल करण्याचं ठरल, कारण चीफ जस्टीसनी फक्त डॉ. राजीव जोशी यांना परवानगी दिली आहे असा मुद्दा आला तर संघटनेला बाहेर पडाव लागेल! तशी शक्यता कमी होती, पण होती!मग केसच्या मुद्यांवर चर्चा झाली, याचिकेचा मसुदा वैदेहीने तयार करून नंदूकडे द्यायचा आणि त्याच्याकडून मी घेऊन टायपिंग करायचं असं ठरल. मेडीकोज लीगल एड असोसिएशन या संघटनेचा मसुदा नंदूने सांगितला व मी लिहून घेतला. लगेच घरी येऊन तो टाईप केला.

रात्री १०.४५

लक्ष्मी क्रीडा मंदीरमधे पोचलो.

टेबलटेनीस खेळण्यासाठी जमलेल्या गॅंगची आवराआवर चालू होती.

आलात. छान! ही रॅकेट. हा बॉल. एकटा खेळत बस..

अरे जरा कामात होतो.. म्हटल निदान चहा तरी..

चायला बांबू लावायचा तर पुरता तरी लावायचा.हा आर ड्या म्हणजे. साडे आठला कसल काम होतरे? आला नसतास तर पुढच्यावेळचा चहा तरी काढता आला असता तुझ्या कडून..

पुढच्या वेळच पुढच्या वेळी. मागच्या वेळचा चहा वसूल करायचाय आत्ता. काय विठ्या.. मागच्या वेळचा बांबू लक्षाता आहे ना?

आम्ही कुठं चहाला नाही म्हणतोय? पण तुमची त्यातही चिकटगिरी!

बरं. पुढच्या वेळचा चहा माझा. चला. आज एक बेस्ट बातमी आहे.

काय लग्न बिग्न ठरलं का काय तुझ सुद्धा?

नाही.. आधी लगीन कोंढाण्याचं!

. . . . . . .

१ ऑगस्ट १९८७ ००:३० वाजता!
. . . . . .

सर्वांनी मनापासून पाठिंबा दिला.

मेडिकोज लीगल एड असोसिएशनची अधिकृत घोषणा शनिवारवाड्याजवळील शारदा हॉटेलमध्ये झाली

रात्री १२ वाजता म्हणजे १ ऑगस्ट रोजी!

पहिली सही मी केली.. सेक्रेटरी म्हणून

डॉ. राजीव जोशी.. कोर्टातून प्रवेश.. याचिका क्रमांक १६७७/८५
डॉ. धनंजय शिरोळकर.. कोर्टातून प्रवेश.. याचिका क्र. २२६८/८५
डॉ. अतुल देशपांडे..युनिव्हर्सिटीशी भांडून एम डी ला प्रवेश..
डॉ. राम साठे.. युनिव्हर्सिटीशी भांडून डिप्लोमाला प्रवेश....

सच्चा जिवलग मित्र..

आर डी.. मी सही करणार नाही.

व्हॉट.. तू.. मार खायचाय का?

सॉरी.

अरे पण का? अत्ता तर डीन विरुद्ध बोंबलत होतास ना..

होय. पण सॉरी. मी सही वगैरे करणार नाही.

राम्या..

हे बघ. मी आता ससून मधे लेक्चरर आहे. मला डीन विरुद्ध कागदोपत्री काहीही करणार नाही.

अरे पण तुमच्या बॅकिंगशिवाय मी कसं काय करणार?

मग तू ही करू नकोस. तस बघितलं तर तुला तरी काय घेणं आहे? आणि इतरांच्या सह्या मिळतील तुला. माझ्यावाचून काहीही अडत नाही.

अरे..पण काही प्रिन्सिपल्स वगैरे?

खड्यात घाल. किंवा काशी घाल. माझी नोकरी महत्वाची आहे या केस पेक्षा. मी सही करणार नाही.

ठीक आहे. तू इतर ४ जणांच्या सह्या आण.

नाही. मला कोणत्याही प्रकारची इनव्हॉलव्हमेंट नकोय.

घाबरट साला..

हे बघ. मला मान्य आहे की मी घाबरतोय. पण माझा इलाज नाही. लेट अस एग्री टु डिफर ऑन धिस इश्यु. मला शक्य होईल तशी आर्थिक मदत मी करीन, पण माझं नाव कुठेही येता कामा नये.

ओ. के. बॉस.

त्या दिवशीचा फुकटचा चहा आयुष्यातील कटु सत्य गळी उतरवून गेला.

१२ ऑगस्ट १९८७

नंदू, मी आणि वैदेही याचिकेचा मसुदा घेऊन बसलो.सर्व मुद्यांवर चर्चा झाली.याचिकेत दोन मुख्य दावे होते.

१. एकही जागा मोकळी नव्हती
२. जागा मोकळी झाल्याची नोटीस नव्हती.

या दोन्हींसाठी पुरावा म्हणून आमच्या कडे काहीच नव्हत.

नंदूच्या डोक्यात पुरावा तयार करायची आयडिया आली.

"आपण एफिडेव्हिट्स घेऊया त्या बॅच च्या मुलांची.."

काय म्हणून?

की त्यांनी राजीनामा दिलेला नाही आणि नोटीसही पाहिलेली नाही.

अवघड आहे. अशी प्रतिज्ञापत्रे कोण देणार?

पण मग दुसरा पुरावा काय. उद्या डीनच्या वकिलाने सांगीतले की एका मुलाने राजीनामा दिला आम्ही नोटीस लावली तर मग?
. . . . .

अवघड आहे. बघतो प्रयत्न करून. आधीच मॅडमना घाबरतात सगळे. त्यात प्रतिज्ञापत्र म्हणजे..

हे बघ. तू त्या बॅचच्या मुलांना मदत केलीस ना?

हो रे. मित्रच आहेत ते माझे. आणि करतील ते मदत आपल्याला. बघू.

सह्या किती लोकांच्या झाल्या.

८ झाल्या. अरे नुसत्या सह्या करायला घाबरतात माझ्या बरोबरचे. आणि ही मुले म्हणजे ३ वर्षांनी ज्युनिअर. पण पटवतो मी त्यांना.

ओ. के. हा मसुदा टाईप करुन घे. मग आपण एफिडेव्हिट वर सह्या घेऊ.

१५ ऑगस्ट १९८७

ध्वजवंदनानंतर बच्चेकंपनीला घेऊन कॅंटीनला गेलो.

जाड्या, कापरे, मीच डीन विरुद्ध केस करणार आहे. मला चीफ जस्टीसकडून परवानगीचं पत्र सुद्धा आलय.
हे बघा.

पण मॅडम?

त्यांची काहीतरी इन्व्हॉलव्हमेंट नक्की आहे या भानगडीत.

आर ड्या. त्या छळतील लेका तुला. फार खुनशी आहेत त्या. आम्ही आता डिपार्टमेंटमधे ऐकतोना सर्व गोष्टी.

बघू. मला नाही सहन होत असं प्रेशर खाली रहाणं.

बेस्ट लक. आम्ही मदत करू. वर्गणी काढू.

मदत वेगळीच लागणारे. कापरे तुम्ही ७ही जणांनी प्रतिज्ञापत्र करायचं की आम्ही राजीनामा दिलेला नाही आणि जाड्या तू, अनिता आणि संगीता ने प्रतिज्ञा पत्र करायचे की नोटीस लावली नव्हती.

कशाला?

जागा मोकळी नव्हती आणि नोटीस लावली नव्हती हे सिद्ध करायला.

अरे, आम्हाला कशाला इन्व्हॉलव्ह करतो?

मग केसच करता येणार नाही..

आरड्या.. प्लीज.. अरे आम्हाला कशाला लटकावतो?

लटकावतो?

बघा, तुम्हीच विचार करा की हा मुद्दा सिद्ध कसा करणार?

अरे, उगीच पुढे प्रॉब्लेम निर्माण होतील..

हे पहा, मी तुम्हाला विनंती करतोय. मला हा सगळा नालायकपणा थांबवायचाय. अरे किती मुलांना त्रास होतो. एकदाका बेकायदेशीर प्रवेश रद्द झाला की मग हे सगळे सरळ येतील. तुम्ही एव्हडच करायचंय..

अरे पण!

हे बघा, माझा स्वत:चा काहीच फायदा नाहीये यात. झाला तर तोटाच होईल. यापुढे असं होऊ नये म्हणून मी लढतोय. नाहीतर नुसतं झेंडावंदन करून काय उपयोग? षंढ आहोत काय आपण?

ठीक आहे, मी करीन एफिडेव्हिट. आणि कापरे तू ही कर. कोणी काही करत नाही आपल्याला.

गुड. दॅट्स द स्पिरिट. तुमच्या बॅचच्या सगळ्यांशी माझी ओळख नाहीये. तर तुम्ही बाकीच्या सगळ्यांना पटवा. आणि उद्या एफिडेव्हिट करायच म्हणून सांगा.

चालेल. हे बघ. आज ओपीडी लाइट असेल. आम्ही सगळ्यांना घेऊन १२ - १ पर्यंत पोस्टीरियर कॅंटीनला येतो. तिथे तू त्यांच्याशी बोल.

ओ. के. पण बाकी कुणालाही कळू देऊ नका. ...

जाड्या रड्यानं महत्वाचं काम केल.सर्वजण आले. अनिता आणि संगीता सुद्धा.जाड्यानं जोरदार भाषणचं ठोकलं.. अन्यायाविरुद्ध कोणीतरी भांडायलाच पाहिजे अस आपण सगळेच म्हणतो.. आज मदत करायची संधी आहे, तेंव्हा सगळे एक राहिलो तर मॅडम त्रास देणार नाहीत..

दुसर्‍या दिवशी सर्वजण पुण्याच्या कोर्टात गेलो.तेथील नोटरीसमोर सर्वांनी प्रतिज्ञापत्रांवर सह्या केल्याआणि आमचा सगळ्यात मोठा पुरावा तयार झाला.

कोर्टातल्या त्या दिवशीच्या चहात अन्यायाविरुद्ध लढण्याची तल्लफ होती.

. . . . . . . . .

श्रीवास्तवच्या केसच्या ऑर्डरची सर्टिफाईड कॉपी आणण्यासाठी मी मुंबईला गेलो. डिक्री सेक्शनमधे अर्ज आणि पैसे भरल्यानंतर रिट सेक्शनमधे गेलो.

काय डॉक्टर! काय म्हणताय?

अहो तुम्हाला थॅंक्स म्हणायला आलो. त्या दिवशी उशीर झाला.

हॅ. थॅंक्स कशाला?आणि आता परत तुमची थोडी मदत लागेल हां..

कशाला?

मी परत एक केस फाईल करतोय.

कशाबद्दल? तुमचं एम. डी. झालं ना?

एक पब्लीक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल करतोय.

लष्करच्या भाकर्‍या! अहो प्रॅक्टीस करा. कुठ कोर्टात येता राव! शहाण्यामाणसानं कोर्टाची पायरी चढू नये.

अहो. तुम्ही तर रोजचं..

कोण वकील?मागचेच. सातवळेकर.

बरंय. भेट होईलच आता अधून मधून.

. . . . .

माझी एडमिशनची केस नंदूची हायकोर्टातील पहिली केस होती. त्या वेळी नंदूला ज्यांनी मदत केली ते सिनियर वकील भेटले.

काय डॉक्टर! इकडे कुठे?

गुड आफ्टरनून सर. एक पी आय एल करायचं म्हणतोय..

सातवळेकर आलाय का?नाही. मीच आलो. सर्टिफाईड कॉपीज घ्यायच्या आहेत.

कशाबद्दल पी आय एल? आणि जेवण झालय का?

नाही..

चल मग जेवायला. आणि तिथे सांग मला सगळं.

.....

अच्छा! म्हणजे ही मंडळी आता कोर्टात येऊन मिसस्टेटमेंट करण्यापर्यंत येऊन पोचली तर. कोर्टाचा वापर करतात बॅक डोअर एडमिशनसाठी. गुड दॅट यू आर फायटिंग अगेंस्ट दॅट! आय लाईक इट. आणि सातवळेकरला माझा निरोप सांग. त्याला म्हणावं.. एज फार एज स्कॅन्डल्स आर कन्सर्नड,युजवली व्हॉट यू सी इज द टिप ऑफ द आईस बर्ग. या केसमधे कोर्टामधून बेकायदेशीर प्रवेश देण्यात पोरगा, बाप, त्यांचे वकील हे सगळे सरळसरळ इनव्हॉलव्हड आहेतच. पण अजून कोण आहे याच्यामागे हे कळणं अवघड आहे. तेंव्हा काळजी घ्या.

हो सर.

आणि दुसर.. ज्या बेंचने केस विड्रॉ करायला परवानगी दिली तेच बेंच आत्ता आहे. ते २८ तारखेला बदलेल. तेंव्हा तुम्ही त्यानंतर केस हियरिंगला काढा. या बेंच समोर नको.

का सर?

दुसरं कुठलही बेंच चालेल. पण मी सांगतो. दुसरं कुठलही बेंच ही केस दाखल करून घेईल. पण हे बेंच नाही. हे बेंच निश्चितपणे तुमची केस फेटाळून लावेल.

फेटाळून लावेल?

कारण हे बघ. नो वन लाईक्स टु एक्सेप्ट दॅट ही कुड बी चीटेड.. बरोबर आहे की नाही? आणि.. म्हणजे एक पॉसिबिलिटी आहे.. विच यू हॅव टु कन्सिडर.. की.. धिस बेंच इन्टेंन्शनली गॉट चीटेड..

म्हणजे?

येस माय बॉय.. तुला वाटतं तितकं कोर्ट सरळ नाही. माझे केस पांढरे झालेत इथे.. पण यू मस्ट फाईट. ऑल द बेस्ट. कधीही मदत लागली तर सांग.

पुढचे काही दिवस

याचिकेचा मसुदा पक्का झाला, माझ्या प्रतिज्ञापत्रावर सही झाली आणि २७ ऑगस्टला याचिका दाखल करायचं आम्ही ठरवल.

आता फक्त मेंबर्सची संख्या वाढायला हवी होती..

म्हणजेच बातमी फुटणार होती!आणि इतक्यात मला ते नको होतं

म्हणून मग अगदी जवळच्या मित्रांच्या सह्या घ्यायला सुरुवात केली.

२० ऑगस्ट २० मेंबर्स

२१ ऑगस्ट २५ मेंबर्स..

आर ड्या बघू तुझे कागद.. मी ही सही करणार.

करमरकर, मला वाटतं तू सही करू नकोस. तुझी आता परीक्षा आहे.

अरे.. भितो का काय मी त्या श्रीवास्तवला?

करमरकर, श्रीवास्तव तुमच्या परीक्षेचे चेअरमन आहेत. तू अडकशील.. मागून परत प्रॉब्लेम येईल.

अरे मी करतो सही.. कसला बॉस आहे मी.. चायला चेअरमन विरुद्ध सही करतोय.. हं.. लोंढे. . राणा.. करा रे सह्या.

२२ ऑगस्ट ३५ मेंबर्स

२३ ऑगस्ट ४० मेंबर्स
. . . . .

सगळीकडे चर्चा..डीनच्या मुलाचा प्रवेश बेकायदेशीरआपल्या कॉलेजमधील आर डी जोशी त्याविरुद्ध संघटना काढतोय.. हायकोर्टात केस करणार.

डीनला खुन्नस..
मानला.. बॉस!
हॅ.. त्यात काय?.. एम. डी. झाल्यावर कोणीही केस करील..
पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे
. . . . . .

राजू ~

येस मॅडम.

कम इन. काय चाललय तुझं?

मॅडम, आपला डाटा एनलाईज करतोय.. पण मॅडम, पुढच्या प्रॉजेक्टमधे एक कॉम्प्युटर घ्या बरंका.

अगदी माझ्या मनातलं बोललास. पण तू सध्या..

आणि मॅडम, ते फोटोग्राफ्स बघितलेत का?

होय रे.. खूपच सुंदर आलेत. काय केलस तू?

मॅडम, एक नवीन लेन्स वापरल. त्यामुळे क्लॅरिटी वाढली..

आणि तू म्हणे कसल्या तरी..

मॅडम गंभीर म्हणतो तुम्ही मला उद्याच्या सेमिनारमधे बोलायला सांगीतलय..

होय. तू ते सगळं नीट वाच.. आणि हे बघ.. आपलं प्रेझेंटेशन चांगल झालं पाहिजे..
ऑफ कोर्स तू करशीलच नीट.. मागच्या वेळसारखं..

पण मी असं ऐकल की तू कॉलेजात..

मॅडम, त्याच्यासाठी काही स्लाईडस करायला लागतील..

कर ना..

मग मी जाऊ तयारी करायला?

एक मिनीट.. तू सध्या..

हां. आणि तुम्ही कॅमेरा घ्यायचं म्हणत होतातना.. त्याचं हे कोटेशन.

ते बघू रे मग. पण संजय..

मॅडम मला रजा हवी होती २-३ दिवस. आमच्या गावाला उत्सव आहे..

ओ. के. टेक लीव्ह फॉर ४ डेज.. पण तू..

ट्रिंग. ट्रिंग... फोनची संधी साधून मी सटकलो.

माझ्या ध्यानात मॅडमना काय म्हणायचं ते आलं होत. आणि त्यांच्याशी या विषयाबद्दल बोलणं शक्यच नव्हतं. त्यांनी निश्चितच ब्रेन वॉश केला असता.

माझी रजा !!!

२५ ऑगस्ट १९८७ सेमिनारच्या आगोदर फक्त ५ मिनिट पोचलो.
मॅडम घाईत होत्या. त्यांच्या समोर रजेचा अर्ज सरकवला आणि सही घेतली.
सेमिनार फारच छान झाला.. अस मॅडम नंतर म्हणाल्या.. आणि जेवणानंतर भेटायला ये म्हणून सांगीतल.
मला काम काय ते माहीत होतंच. मी गेलोच नाही.

रजेचा अर्ज हसीनाकडे पाठवला.. गंभीर बरोबर.

माझी रजा सुरु झाली!

२६ ऑगस्ट.. झेरॉक्स काढल्या
२७ ऑगस्ट.. नंदू आणि वैदेही मुंबईला जाऊन केस दाखल करून आले.
तीन दिवसांनतरची तारीख घेतली.
त्यामुळे आधीची ऑर्डर देणार्‍या बेंचला आम्ही यशस्वीपणे टाळलं होत.
२८ ऑगस्ट.. सकाळी रजा संपली!

सही करायला डिपार्टमेंटला गेलो.

राजू ~

येस मॅडम.

तू म्हणे डीन विरुद्ध केस करणारेस?

. . . . .

अरे ज्याच्यावर अन्याय झाला असेल त्याला करुदे ना
. . . . .

तुला काय करायचंय? तुझा रिसर्च, आपलं डिपार्टमेंट

. . . . .

अरे डीन सर मला विचारत होते की काय प्रकार आहे म्हणून

मॅडम, तुम्ही तर म्हणाला होतात की मी काही लेखी दिल नाही..

मग नाहीच दिलं काही.. पण तुझा काय संबंध?

मॅडम मला हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिशांनी केस करायला..

अरे कशाला भानगडीत पडतोस या?

मॅडम, विद्यार्थीसंघटनेतर्फे सातवळेकरनी केस फाईल केलीय.. ऑलरेडी.....आता मला ही काहीही करता येणार नाही. सॉरी.

३१ ऑगस्ट १९८७ दुपारी कॅन्टीन मधे

आर ड्या अरे जरा काम होत तुझ्याकडे

काय रे करमरकर?

अरे डीन नी आज मला खोलीमधे बोलावल होत.

कशाला?

मला विचारलं की .. तू त्या जोशीचा मित्र आहेस का?

मग?

मी होय म्हणालो, तर ते म्हणाले की तो कसली संघटना काढतोय?

मग?

मी म्हणालो.. मला माहीत नाही.. तर त्यांनी विचारलं की तू सही कशी केलीस..

मग?

आर ड्या, लेका, ते एक्सामिनर आहेत आमचे.. चेअरमन.

हे तर मी तुला आधीच सांगीतले होते.

अरे पण ते डायरेक्ट म्हणाले रे मला.. नापास करीन.

चायला.. हे बघ, उद्या याचा सोक्षमोक्ष होईल.

नको, मी माझी सही काढून टाकतो.. अरे खोडून टाकू.

अरे.. आता हे सगळं कोर्टात आहे.. आता खाडाखोड करून कसं चालेल? तू उद्या पर्यंत धीर धर..

पण ते खुन्नस घेतील रे आर ड्या..

पण तू तर म्हणत होतास की तू बॉस आहेस..

हे बघ.. मला परीक्षा महत्वाची आहे..

अरे मग परवा कशाला केलीस सही.. मी सांगत होतो मागाहून शेपटी घालशील म्हणून.. अंगात दम नाही तर कशाला पुढं होऊन सही केलीस.. आता जरा दम खा.

अरे पण .. त्यांनी लोंढे आणि राणालाही बोलावलय!

. . . . . . . . . .

गिरीशने माझा हात धरून मला कॉलेजच्या बाहेर काढलं आणि कॉफी हाउसमधे नेलं. सारासार विचार करता आमच्या लक्षात आलं की..... डीन नं त्याची चाल खेळली हे आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही !

१ सप्टेंबर १९८७ सिंहगड एक्सप्रेस.

मी, नंदू, वैदेही आणि रवी..

नंदू तूच कर अर्ग्युमेंट.. मला टेन्शन आलंय.

अग कर ना. पहिल्या वेळी येतचं टेन्शन थोडस. सुदैवानं तुझ्याकडे स्ट्रॉंग वॉटरटाईट केस आहे. घाबरतेस काय. आणि मी आहेना बरोबर. तू गडबडतेस अस वाटल की मी इन्टरव्हीन करीन. फक्त मी बोलायला लागलो की मग तू गप्प बसायचं!

वैदेही.. तुला पहिली केस मिळवून दिली.. आय हॅव टेकन द हॉर्स टु द वॉटर..

रवी.. मी म्हणजे काय घोडा आहे का?

नाही. घोडी! काळी घोडी! अंगावर झूल पांघरल्यावर काय मस्त दिसेल ना घोडी?

यू..

मग अर्ग्युमेंट करणार का घोडी म्हणून मिरवणार?

उगाच.. हाती कोलीत दिल मी.

म्हण.. माकडाच्या म्हण.. घाबरू नकोस.

कोण घाबरतय?

तूच. आणि अर्ग्युमेंटच्या वेळी घाबरलीस तर घोडीचं गाढव होईल बरका!

बर बाबा. करीन मी अर्ग्युमेंट.. आता बास. मला खरचं खूप टेन्शन आलय
. . . . . .

मी सर्वांना करमरकरचा किस्सा सांगीतला. आणि मॅडमशी झालेला संवाद. डीन ने कशी गेम टाकली हे कळल्यावर वैदेही ला आश्चर्य वाटले पण नंदूच्या मते असे काहीतरी अपेक्षीत होतेच!
. . . . .

लॉ कॉलेजचे विद्यार्थी असले तरी वैदेही आणि रवीची हायकोर्टातली पहिलीच वेळ..
अर्ग्युमेंट साठी येण्याची. नंदूने आमची केस ५४ नंबरच्या खोलीत आहे असा शोध लावला. न्यायमूर्ती शहा आणि न्यायमूर्ती सुरेश यांच्या बेंच समोर आमच्या केसचा क्रमांक होता १२ आणि नंबर मिळाला होता ४२७७/८७. या वेळेपर्यंत १०:५० झाले होते. नंदू आणि वैदेही वकिलांच्या आरामगृहात जाऊन कपडे बदलून आले आणि वैदेहीकडे बघून रवीला हसूच यायला लागलं!

झूल पांघरल्यावर काय रुबाबदार दिसतेना..

गप रे.. मी दटावलं!
. . . . .

मग आम्ही रुम क्रमांक ५४ मधे पोचलो. वकिलांची ही प्रचंड गर्दी. न्यायाधिशद्वय येताच सर्व वकील मंडळी उभी राहिली आणि न्यायदेवतेला वंदन करून सर्वजण खाली बसले. एक एक करत पहिल्या ११ केसेस संपल्या आणि शिरस्तेदारानं आरोळी दिली..

रिट पिटिशन ४२७७/८७.. डी जी सातवळेकर एन्ड मिस ठकार फॉर पिटिशनर्स ...

वैदेही : इन माय मोस्ट रिस्पेक्टफुल सबमिशन्स लॉर्डशिप्स विल काइंडली सी दॅट द रिस्पॉन्डन्ट नंबर ३ हॅज बीन एडमिटेड बाय डिसिव्हींग धिस ऑनरेबल कोर्ट. द डीन्स सन हॅज बीन एडमिटेड ऑन सिक्रेटली क्रिएटेड इल्लीगल एडिशनल सीट. धिस इज अ स्कॅन्डल माय लॉर्डस. दे हॅव युस्ड कोर्ट फॉर बॅकडोअर एन्ट्री टु मेडिकल कॉलेज. टु प्रिव्हेन्ट सच करप्ट प्रॅक्टीसेस आय हॅव फाईल्ड धिस पब्लिक इन्टरेस्ट लिटिगेशन ऑन बिहाफ ऑफ द मेडिकोज लीगल एड असोसिएशन. माय लॉर्डस विल काइंडली सी पेज..

मि.जस्टीस सुरेश : हू इज एपिअरिंग फॉर द गव्हर्नमेंट?

मि. एम. एस. : माय लॉर्डस, आय एम..

मि. जस्टीस सुरेश : यू हॅव नॉट फाईल्ड एनी रिप्लाय.

मि. एम. एस. : माय लॉर्डस, आय हॅव नॉट रिसिव्हड एनी इन्स्ट्रक्शन्स.

मि. जस्टीस सुरेश : द एलिगेशन्स आर सिरीयस एन्ड इफ दे आर प्रूव्हड, द रिपरकेशन्स विल ऑल्सो बी सीरीयस. सो प्लीज टेक इन्स्ट्रक्शन्स एन्ड फाईल एफिडेव्हिट. वी शॅल हियर ऑन एट सप्टेंबर
. . . . . .

कॉन्ग्रॅट्स वैदेही.

अरे कसलं टेन्शन आलवतं. नंदू बरोबर बोलले ना रे?

अफलातून. आणि ते निश्चित वाचून आले असणार.

सरकारी वकीलाचं तोंड असं बारीक झालवतं..

शू.. तो बघ इकडेच येतोय. चला. कटूया.

२ सप्टेंबर १९८७

रात्री धावपळ केल्याचं सार्थक झालं

दुसर्‍या दिवशी सगळ्या वर्तमान पत्रांत बातम्या

पी आय एल केस अगेंस्ट बी जे डीन.. महाराष्ट्र हेराल्ड

एम. डी. अभ्यासक्रमासाठी बेकायदेशीर प्रवेश.. केसरी

अधिष्ठात्यांच्या मुलास बीजेत प्रवेश, प्रतिज्ञापत्रे दाखल करा .. न्यायालयाचा आदेश.. सकाळ
. . . . .

दुपारी कॉलेजच्या कॅन्टीनला गेलो..

आर ड्या. मानला.. चायला पेपरला नाव!
काय आर डी? पब्लिसिटी स्टंट का?
आर डी. बेस्ट ऑफ लक.. आय विल कॉन्ट्रीब्युट
व्ही पी सिंग तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ हैं!

६ सप्टेंबर १९८७ कॉलेज कॅन्टीन

आर डी जरा पटकन बाहेर ये. कॉमन रूम मधे चल...

काय झालं रे जाजू?

हे बघ. ते मार्ड सेक्रेटरी तुझ्याविरुद्ध सह्या गोळा करतायत.

माझ्या विरुद्ध? काय म्हणून?

की तुझी संघटना बेकायदेशीर आहे.. आणि तू गुंड आहेस.. तुला पब्लीक इंटरेस्ट वगैरे काही नाही.. तुला कॉलेजात कोणाचाही पाठिंबा नाही.. वगैरे.

अरे पण त्यांचा काय संबंध?

आम्ही त्यांना उद्या मार्ड ची जनरल बॉडी मीटिंग घ्यायला लावणारोत.. कशासाठी सह्या घेताय म्हणून..पण..हे बघ. तू आत्ता घरी जा. उगाच मारामार्‍या वगैरे व्हायला नकोत. मी तुला फोन करीन कधी यायचं ते कळवायला. मला किंवा संजय काळेला कॉलेजात भेटू नकोस. आता दोन तीन जणांना बरोबर घे आणि कॉलेजच्या बाहेर पड. वातावरण फार तापलय रेसिडेंट क्वार्टरमधे. सूट तू आता. ओ.के?
. . . . .

हॅलो आर डी काळे बोलतोय.बोल. काय ठरल?

तू उद्या ११ ला माझ्या रूम मधे येउन थांब. १२ ला मीटींग आहे. जी बी एम.

मी तुला माझ्या खोलीतून घेउन जाईन.

७ सप्टेंबर १९८७ दुपारी १२ वाजता

निवासी डॉक्टरांची कॉमन रूम.

मला घेउन काळे आणि जाजू..

"ही मार्ड ची मीटींग आहे. मला वाटत जे मार्ड चे मेंबर्स नाहीत त्यांनी बाहेर जावं. "

ठीक आहे. मी जातो. पण मला जे काही सांगायचय ते ऐकून घ्याव अशी विनंती आहे.

आर. डी. गेट आऊट.. दोन तीन माकडांनी आवाज केला.

नो. वी वॉंट टु लिसन टु हिम.. मागचे ५० उत्तरले.

जाजू व काळे यांनी रात्रीत त्यांची खेळी खेळली होती!

१/२ तास माझं भाषण झालं. आयुष्यातील पहिलं वहिलं पब्लीक स्पीच! आणि ते सुद्धा एव्ह्ड्या जबरदस्त विरोधकांसमोर!
. . . . .

आणि ठरलं.. मार्ड सपोर्ट्स मेडिकोज लीगल एड असोसिएशन!

८ सप्टेंबर १९८७, दुपारी १२:३०

मि. जस्टिस सुरेश : येस, हू इज एपिअरिंग फॉर द गव्हर्नमेंट?

मि. एम. एस. : आय एम एपिअरिंग ....

(या पुढील संभाषणचे मराठीत भाषांतर लिहीत आहे)

मि. जस्टिस सुरेश : तुमचे उत्तर काय आहे? तुम्ही प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही.

मि. एम. एस. : न्यायाधिशमहाराज.. मी एक छोटे प्रतिज्ञापत्र दाखल करत आहे. आम्हाला ह्या याचिकेची सुनावणी घेणारे बेंच बदलून घेण्यासाठी अर्ज करायचा आहे..

मि. जस्टिस सुरेश : कशासाठी?

मि. एम. एस. : न्यायाधिशमहाराज, ही याचिका म्हणजे आधीच्या याचिकेची पुन्हा सुनावणी करण्यासारखी आहे आणि ती सुनावणी ज्या बेंचने आधी सुनावणी केली त्याच बेंचने करावी असे आम्हाला वाटते.

मि. जस्टिस सुरेश : तुम्हाला असे वाटते का या याचिकेतील प्रतिपादन आम्हाला समजणार नाही?

मि. एम. एस. : न्यायाधिशमहाराजांनी कृपया मुख्य न्यायाधिशांकडे ही याचिका पाठवावी..

वैदेही : न्यायाधिशमहाराज, ही याचिका म्हणजे आधीच्या केसची पुन्हा सुनावणी नाही. हे आर्टिकल २२६ खाली केलेले नवीन रिट पिटिशन आहे. न्यायाधिशमहाराज हे वकील वेळ काढण्याचा प्रयत्न करतायत.

मि. जस्टिस सुरेश : मि. एम. एस. तुम्हाला असे वाटते का की ह्या यचिकेची सुनावणी आमच्या अधिकारकक्षेत येत नाही?

मि. जस्टिस शहा : तुम्ही अशी परवानगी मागण्याचे काय कारण आहे?

मि. एम. एस. : आम्हाला ह्या याचिकेची सुनावणी कोणी करायची याचा निर्णय चीफ जस्टीस यांच्याकडून हवा आहे.

मि. जस्टिस सुरेश : ठीक आहे, तुम्ही चीफ जस्टीसकडे जाऊ शकता.

मि. एम. एस. : न्यायाधिशमहाराजांनी कृपया तशी ऑर्डर द्यावी.

मि. जस्टिस शहा : तुमची इच्छा असल्यास तुम्ही तसेच जाऊ शकता..

मि. एम. एस. : धन्यवाद न्यायाधिश महाराज!
. . . .

नंदू, हे रे काय?

काही नाही. गप्प बसायच. ही यांची चालूगिरी आहे.

पण मुख्य न्यायाधीश यांच ऐकतील?

मला नाही वाटत. सरकारी वकीलांन २ वाजता मुख्य न्यायाधीशांच्या कार्यालयात बोलावलयं.. तिथे तो परवानगी मागणार आहे.

नंदू.. आपण स्ट्रॉंगली विरोध करायला पाहिजे

. . . . . .

१.४५ वाजता मी नंदू व वैदेहीला मार्ड च्या मीटींगचा वृत्तांत सांगत होतो तेव्हड्यात मार्डचे दोघे सेक्रेटरी आमच्या जवळ आले. त्यातल्या एकानं वैदेहीच्या हातात काही कागद दिले व सही घेतली. तिने कागद चटकन चाळले आणि पिशवीत ठेवले.

काय आहे ते वैदेही?

नॉन्सेन्स!

पण काय दिलय?

त्यांना म्हणे या केसमधे इंटरव्हीन व्हायचय.

कशाला?

मरूदेरे. चला. आपल्याला जायचंय.


२.१० वाजता मुख्य न्यायाधीशांच्या कार्यालयात
. . . . .
मुख्य न्यायाधीशांचे सचिव : मी साहेबांना सांगीतल.. पण त्यानी बेंचकडून तशी ऑर्डर आणायला सांगीतली आहे
. . . . .
२.४५ कोर्ट रूम ५४

मि. एम. एस. : न्यायाधिशमहाराज.. मुख्य न्यायाधिशांनी आपल्याकडून तशी लेखी संमती आणायला सांगीतले आहे.. आधीच्या बेंच समोर ठेवण्यासाठी..

वैदेही : न्यायाधिशमहाराज.. हे खोट विधान करीत आहेत.

मि. जस्टीस शहा : ठीक आहे.. आधीच्या बेंच समोर सुनावणीसाठी मुख्य न्यायाधिशांकडे वर्ग
. . . . . .

मि. एम. एसने नंदूला परत ४.४५ ला मुख्य न्यायाधिशांच्या कार्यालयात यायला सांगीतले. तोपर्यंत जेवण करायचे ठरले.हॉटेल मधे बसताच मार्डच्या कागदांची आठवण झाली.

वैदेही, बघू ते कागद.

घे. तुला कशाचाच धीर कसा नाही रे?

मला एक चना भटुरा आणि दही भात सांग.

कागद वाचता वाचता जेवण कधी आल आणि जेवायला सुरुवात कधी केली ते सुध्दा कळल नाही, पण एक कागद बघताच डोळेच फिरले आणि जोरदार ठसका लागला.

काय रे.. ठीक आहेस ना?

अग.. घात झाला. यांनी काय लिहिलय बघितलसं का?

कोणी?

अग त्या करमरकर नी..

माझा या संघटनेशी काहीही संबंध नाही..

आर डी जोशींनी मला फसवून एका कोर्‍या कागदावर सही घेतली..

चायला.. अरे.. लोंढे, राणा यांनीपण तसंच पत्र लिहिलय.

बघू..

अरे.. ही तर १०-१२ पत्र दिसतायत. आता?

नंदू..बघ रे जरा.

सोड रे.. अरे कोणीही काहीही फाईल करेल. कोर्‍या कागदावर सही करायला हे सगळे डॉक्टर्स मूर्ख आहेत का? ही सगळी त्या श्रीवास्तवची चाल आहे. मी सांगतो तू काय करायचं ते?
. . . . .

४.४५. मुख्य न्यायाधिशांचे कार्यालयाबाहेर आम्ही सर्व उभे.सचिवाने आमचं काही ऐकलंच नाही. तो कागद घेउन आत गेला आणि दहा मिनिटांनी बाहेर येउन ऑर्डर डिक्टेट केली.

पर सी.जे.
प्लेस बिफोर डिव्हिजन बेंच कन्सिस्टिंग ऑफ सी.जे एन्ड मि. जस्टिस शुगला
इन चेंबर्स आफ्टर सिक्स वीक्स.

५.१० धावत पळत गाठलेली डेक्कन क्वीन सुटली.

नंदू, कॅन चीफ जस्टीस पास ऑर्डर विदाऊट हिअरिंग अस?

टेक्निकली नाही, पण पॉवर्स आहेत.

पण एकदम २१ ऑक्टोबर?

त्यांच डिस्क्रीशन.

यार याला काय अर्थ आहे?

२१ ऑक्टोबरला दुपारी ४.५० ला कोर्टरूम नंबर ४२ मधे जायचं

४२? एस के देसाईंच चेंबर तर..

एस के देसाई सध्या एक्टींग गव्हर्नर आहेत. एक्टींग चीफ जस्टीस सध्या न्यायमूर्ती सी. डी. आहेत.

मग बरंच झाले. न्यायमूर्ती सी. डी. आणि न्या. शुग्लांना कळेल की आपल्याला यांनी फसवल. ते कडक एक्शन घेतील स्वत:ला फसवल्याचे कळल्यावर. इती वैदेही.

वैदेही.. मला वाटतं.. वी आर सिंकींग.. नाऊ आय कॅन सी द कम्प्लीट आईस बर्ग. न्या. सी. डी. यांना ही केस स्वत:कडे घ्यायची काय गरज होती?

राजू शट अप. धिस मे अमाउंट टु कंटेंम्पट ऑफ कोर्ट!

ठीक आहे. चायला. तोंड दाबून बुक्यांचा मार. आणि ते मार्ड चं काय करायचं आपण?

हे बघ. तू मेडिकोज लीगल एड असोसिएशनची एक जीबीएम घे. त्यात एक मॅनेजिंग कमीटी करा. त्या मेंबर्सनी एक करमरकर वगैरेंबद्दल एक निर्णय घ्यायचा की डीनने दबाव आणल्यामुळे घाबरून त्यानी तस पत्र लिहिल असेल तरी संघटना त्यांच्या विरुद्ध काहीही कारवाई करणार नाही. हे सगळ कागदावर लिहून खाली उपस्थीत मेंबर्सच्या सह्या घ्या, म्हणजे आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही. डरो मत. आम्हालाही थोडा कायदा कळतो म्हणावं..

येस आय थिंक दे आर ट्राईंग टु चॅलेंज अवर लोकस स्टॅन्डी एन्ड अवर पब्लीक इंटरेस्ट. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

आणि मला वाटत की आपल्या केसची जोरदार प्रसिद्धी झाली पाहीजे.. पेपरमधे. आणि अजून मेंबर्सच्या सह्या घेऊ. पहिले सगळे गळाले तरी संघटना कायम राहील.

पेपरमधे कशाला छापायचं? मी तुला सांगते ते ऐक. गप्प बस. काहीही छापून आणू नकोस. आणि न्यायाधिशांबद्दल मूर्खासारखं कुणाशीही बोलू नकोस.

तू काय सांगतेस मला? हे न्यायाधीश बाहेर जोरदार भाषणं करतात.. पब्लीसिटीच्या मागे लागतात.. दर आठ दिवसांनी पेपरात नाव आणि फोटो..मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमूक तमूक असं असं म्हणाले. असतं की नाही?

अरे हो. पण त्यांच्याबद्दल पब्लीक ओपिनियन सुद्धा चांगल तयार होत.

आम्ही कुठं नाही म्हणतोय? आपणही आपल्याबद्दल पब्लीक ओपिनियन तयार करू. आपण काही गुन्हा करत नाहीयोत.स्वत:चा फायदा नसताना लढतोय. कितीही नाही म्हटल तरी पब्लीसिटीच्या मागे लागलेल्या न्यायाधिशांवर पेपरातल्या बातम्यांमुळे प्रेशर येणारचं.

राजू.. सबज्युडिस मॅटर छापू नये अशा एथिक्स..


८ सप्टेंबर १९८७ रात्री ८.३०

पुण्यात पोचताच रेल्वे स्टेशनवर जाजू भेटला. तो मलाच भेटायला आला होता. त्याने त्या दिवशी केसरी या वर्तमान पत्रातील बातमी दाखवली. कुणाच्यातरी बदमाशीमुळे अदल्या दिवशीच्या मार्डच्या मीटींगबद्दल चुकीची बातमी छापून आली होती.

"मार्डच्या ५० सदस्यांनी सभासदत्व बदलले."

या बातमीमुळे कॉलेजात प्रचंड खळबळ झाली होती आणि माझे समर्थकसुद्धा माझ्या विरुद्ध आरडाओरडा करत मला शोधत होते. आणि मी तर मुंबईत. त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला होता. त्यामुळे ताबडतोब या बातमीचा खुलासा देणं भाग होतं. मी जाजूचे आभार मानून तसाच केसरीच्या कार्यालयात गेलो. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगीतली. लेखी खुलासा दिला आणि कोर्टातील घडामोडीसुद्धा सांगीतल्या. तसाच खुलासा इतर सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयांमधे जाऊन दिला. घरी पोचायला रात्रीचे १२ वाजले. तोपर्यंत
वडिलांनी ही केस वगैरे सर्व बंद झाले पाहिजे असा निर्णय घेऊन टाकला होता. त्यांची समजून काढेपर्यंत सकाळ झाली.

९ सप्टेंबर १९८७

सगळी वर्तमानपत्रे विकत घेऊन आलो.

केसरीने छापले होते..

बेकायदेशीर प्रकरणी सुनावणीस प्रारंभ
. . . . . .

"दरम्यान निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेतील काही सदस्यांनी मेडिकोज लीगल एड असोसिएशनचे सभासदत्व स्वीकारण्याची इच्छा प्रदर्शित केलेली असली तरी ते मार्ड संघटनेचे सभासद आहेतच असा खुलासा डॉ आर. डी. जोशी यांनी केला. "

आता कॉलेजला जायला हरकत नाही असे म्हणून तयार होतो तोच नंदूचा फोन आला. त्याने संध्याकाळी घरी यायला सांगीतले.

कॉलेजात पोचेस्तोपर्यंत वातवरण निवळलेलं होतं. सर्वांची सहानुभूती माझ्या बाजून होती, पण त्या बातमीने जरा गोंधळ झाला हे नक्की. मी सर्वांना मार्डच्या अर्जाबद्दल सांगीतले आणि सगळे मार्ड सेक्रेटरींविरुद्ध बोलायला लागले. त्याच दिवशी इंडियन एक्स्प्रेस मधे "डीन्स टॅक्टीक्स" अशी एक कॅम्पस नोट छापली होती म्हणजे मी काहीही न करता वर्तमानपत्रे आमच्या केसची दखल घेत होतीच. (त्याचा पडताळा पुढेही आला) संध्याकाळी नंदूने वैदेहीलासुद्धा बोलावले होते. त्याने केसरीतली बातमी दाखवली, आणि विचारले..

राजू, तुला सांगूनही हे का छापलेस तू?

अरे कॉलेजात फार गोंधळ झाला होता.

हे बघ.. सबज्युडीस मॅटर छापू नये अशा एथिक्स आहेत..

कोलला, जर डीन बेकायदा प्रवेश देऊ शकतो, चीफ जस्टीस आपले म्हणणे ऐकून न घेता ऑर्डर पास करू शकतात, स्वत:कडे केस घेऊ शकतात तर एथिक्स पाळायचा मक्ता काय आपणच घेतला आहे?

अरे, आपल्या केसमधे फुकट अडथळा येईल.

मला नाही वाटत..

हे बघ आर डी, छापायचं असेल तरे ते अशा पध्दतीने येउ दे की ते प्रेसने परस्पर छापले. लोकांच्या प्रतिक्रिया.. वार्ताहराला असं समजलं ..वगैरे..

ठीक आहे, आर. डी. जोशी म्हणाले.. असं नको.. बरोबर ना?

हो. आणि तुझं नाव त्यात आलं तर कोर्टात त्रास होईल हे लक्षात ठेव.

माझ्या कॉलेजातील हालचालींवर काही वार्ताहर नजर ठेवून होते हे मलाही पेपरांतूनच कळल. १४ तारखेला केसरीच्या असे आमुचे पुणे मधे एक स्फुट छापून आलं

शह आणि काटशह..

एका महाविद्यालयाचं कॅन्टीन..
नेहमीप्रमाणे खचाखच भरलेले..
सिगरेटच्या निळसर धुराने भरलेल्या वातावरणात गप्पांना रंग चढलेला..
इतक्यात हातात फाईल घेऊन एक युवक प्रवेश करतो...
क्षणभर सर्वांचे लक्ष वेधले जाते...
हाच तो.. हाच तो...
कोण रे?
"अरे प्रचार्यांविरुद्ध केस लावणारा..."
तो होय. सॉलीड डेअरिंगबाज दिसतोय..
मग काय खायच काम आहे का महाराज?
हॅ.. त्यात काय एवढं.. पास आउट झाल्यावर काय कोणीही केस लावेल.
तो मुलगा शांतपणे आपल्याला पाठिंबा देणार्‍यांच्या सह्या गोळा करतोय..
करणारे करतायत, शेपूट घालणारे मात्र बाजूला पळतायत..
तो मात्र हिरो बनलाय.. चर्चा चालूच!
स्वत:च्या मुलाला एक जागा तयार करून चाकोरी बाहेर जाऊन प्राचार्यांनी मुलाला प्रवेश मिळवून दिलेला.. त्या महाविद्यालयातल्या दोन विद्यार्थी संघटना.. एक राज्य पातळीवरची तर दुसरी या शहरापुरती.. शहरापुरत्या मर्यादित असलेल्या संघटनेतर्फे या विद्यार्थ्याने ही केस लावलेली.
दुसरी राज्य पातळीवरची संघटना प्राचार्यांच्या बाजूने प्रचार करतेय..
का म्हणे?
तर त्यांच्या संघटनेच्या एका पदाधिकार्याच्या भावालासुद्धा म्हणे प्राचार्यांनी अशाच मार्गाने प्रवेश मिळवून दिलाय म्हणे..
म्हणजे अशी आपली कुजबूज चालू आहे पोरांमधे..
दगडाखाली अडकलेले हात..
दुसरं काय?
प्राचार्यांच्या बाजूने प्रचार करतील नाही तर काय?
पण मुलं म्हणतायत, हा याचिका दाखल करणारा मुलगा असा तसा लेचापेचा नाही. तो प्रकरण धसालाच लावणार..
मागच्या मुख्य मंत्र्यांच्या प्रकरणापासून त्यानं स्फूर्ती घेतलीय ना?

१५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर १९८७

मार्ड च्या पदाधिकार्‍यांवरुद्ध विरुद्ध वातावरण छान तयर झालं ..

पण ते अजून सह्या गोळा करतचं होते. त्यांचा अडसर बाजूला व्हायलाचं हवा होता.

मग मी एक युक्ती केली. सरळ जाहीर केलं की करमरकर सारख्या विश्वासघातक्यांविरुद्ध मी अब्रूनुकसानीचा दीड लाख रुपयांचा दावा दाखल करणार की माझ्या विरुद्ध खोटे घाणेरडे आरोप केलेत म्हणून. त्यासाठी अनामत रक्कम म्हणून १५००० रुपये भरलेसुद्धा!

हे ऐकताच सर्व पत्रलेखकांची टरकली.

एक एक करून मला भेटला.

असं करू नको म्हणून विनवायला लागला.

मग त्यांच्या मदतीनं मी मार्डच्या पदाधिकार्‍यांचा काटा काढायचं ठरवलं!

त्याना सह्या मिळणं बंद झालंवत आणि मी छापील फॉर्मसवर सह्या घ्यायला सुरुवात केली. सुमारे १०० फॉर्मस भरल्यावर एक काडी फिरवली.

मार्डची जनरल बॉडी मीटींग बोलवायला करमरकर वगैरेंना उद्युक्त केलं आणि १ ऑक्टोबरच्या मीटींगमधे मार्ड पदाधिकार्‍यांवर अविश्वासाचा ठराव बहुमतानं संमत करायचा प्लॅन केला. यात जाजू काळे जोडीचा बहुमूल्य सहभाग होता.

दरम्यनच्या काळात इंडियन एक्सप्रेसचे मुंबाईचे निवासी संपादक श्री हरी जयसिंग यांना भेटलो. त्यांना सर्व सांगीतल आणि एकंदर सर्व बेकायदेशीर प्रवेशांवर एक मोठा लेख छापून आणण्याची विनंती केली. त्यांनी पुण्याला फोन लावला आणि श्री आनंद आगाशे यांना काही सूचना दिल्या. दुसर्‍या दिवशी मी आगाशांना भेटून एक टिपण दिलं आणि एक ऑक्टोबरलाच लेख छापून आणण्यासाठी विनवलं. त्यांनी तसं कबूल केलं आणि इकडे जाजू - काळे जोडीने १ ऑक्टोबरची मीटींग दुपारी ४ वाजता ठरवली!

१ ऑक्टोबर १९८७

इंडियन एक्सप्रेस मधे ४ कॉलम बॉटमस्प्रेड बातमी.
इर्रेग्युलॅरिटीज गॅलॉर इन मेडिकल एडमिशन्स .. आनंद आगाशे.

दुपारी १२-१ पर्यंत कॉलेजातील वातावरण गरम.

संध्याकाळी ४ मार्डची जनरल बॉडी मीटींग सुरु.

संध्याकाळी ५ मार्ड पदाधिकार्‍यांवर सर्वसहमतीन अविश्वासाचा ठराव मंजूर.

सेंट्रल सेक्रेटरी श्री संतोष यांना सर्वांच्या सहीचे पत्र की पदाधिकार्‍यांनी आधी झालेल्या जनरल बॉडी मिटींगच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केलयं त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. खाली ९५ जणांच्या सह्या.

लगेचच काही निवासी डॉक्टरांच शिष्टमंडळ मुंबईला रवाना! त्यांच्या बरोबर मी सुद्धा.

रात्री संतोष करमरकरला त्याच्या हॉस्टेलच्या रूम मधे भेटलो आणि त्याने पुण्यात येऊन मार्डच्या पदाधिकार्‍यांना कानपिचक्या देण्याचे आश्वासन दिले. तो पुण्यात आल्यावर नवीन पदाधिकार्‍यांची नेमणूक आणि नवीन इलेक्शन संबंधी कारवाई करायचे ठरले.

९ ऑक्टोबर १९८७

अनिता केस करायला तयार. शिवदे सरांना भेटून तिचे वकीलपत्र दाखल केले. म्हणजे आता किमान एक क्लेमंट कोर्टासमोर आली! शिवदे सरांनी अजून एका जजमेंटची कॉपी दिली..

Dharmadhikari and Sugla JJ
Real democracy cannot be worked by people sitting at the top. It has to be worked out from below by the people of every village and town. The sovereignity resides in and flows from the people, so said the father of nation in whoes name we swear. Therefore "Who will watch the watchman" is the vexed question before our democracy. For this, peoples participation at all the levels is a must"...

१७ ऑक्टोबर १९८७

चार दिवसांनी कोर्टात हिअरिंग. आता परत पेपरात काहीतरी जबरदस्त बातमी हवी, म्हणून महाराष्ट्र हेराल्ड च्या जो पिंटोला भेटलो. त्याला सर्व वृत्तांत सांगीतला. त्याने दोन दिवसांत मार्डच्या मीटींगचा वृत्तांत छापायचे कबूल केले.

१९ ऑक्टोबर १९८७

महाराष्ट्र हेराल्ड मधे बातमी : मार्ड ऑफिशिअल्स फेस नो ट्रस्ट.
त्यात अविश्वासाच्या ठरावासंबंधीच्या पत्रातील माहिती तपशीलाने होती.

२० ऑक्टोबर १९८७

एकंदरीत जोरदार लोकमत तयार झालं होतं. कॉलेजात हीच चर्चा चालू होती. काही प्राध्यापकांनीही बोलावून सांगीतलं की उघडपणे आम्ही तुला मदत करू शकत नसलो तरी आमचा तुला पाठिंबा आहे. प्रत्येकजण उद्याकडे .. केसच्या पुढच्या तारखेकडे डोळे लाऊन बसला होता.

२१ ऑक्टोबर १९८७ कोर्ट रूम नं ४२

सायंकाळी ४. ५० , न्यायमूर्ती सी. डी. यांचे चेंबर.
शिरस्तेदारानं खोलीत बोलावलं
टेबलाच्या एका बाजूला न्या. सी. डी आणि न्या एस यु.
समोर ५-६ खुर्च्यांवर सर्व वकील मंडळी, मागे आम्ही उभे.

न्या सी. डी. : येस मिस्टर एम. एस., यू हॅव नॉट फाईल्ड एनी रिप्लाय

मि. एम. एस.: वी शॅल फाईल.. बट मिलॉर्ड.. धिस पिटीशनर इज मेकिंग पब्लीसिटी ऑफ सबज्युडीस मॅटर.
मार्ड चे वकील: मिलॉर्ड द असोसिएशन इज इल्लीगल.. आय एम एपिअरिंग फॉर द अथोराइज्ड असोसिएशन.

मि. एम. एस.: काइंडली सी द प्रेस न्युज

मुलाचा वकील : ही हॅज नो लोकस स्टॅन्डी टु फाईल धिस पिटिशन. आय हॅव फाईल्ड माय एफिडेव्हिट बट दे हॅव नॉट गिव्हन रिप्लाय..

वैदेही : मिलॉर्ड ही हॅज नॉट गिव्हन अस कॉपी ऑफ हिज..

न्या सी. डी. : बट ही इज सेईंग..दॅट युवर क्लाएंट हॅज फॅब्रिकेटेड द डॉक्युमेंटस, यू आर कमिंग विथ ब्लॅक हॅन्डस..

वैदेही : विथ रिस्पेक्ट मिलॉर्ड.. ऑल दीज एलिगेशनस आर बेसलेस.. दे हॅव नथिंग टु डू विथ द मेरिट्स ऑफ द पिटिशन..

न्या सी. डी.: बट युअर क्लाएंट इज पब्लिशिंग.. वी हॅव रेड..

वैदेही : ही इज नॉट पब्लिशिंग.. दे आर ट्राईंग टु डायव्हर्ट अटेंशन ऑफ..

न्या. सी. डी.: बट ही इज रॅश.. ही इज डुइंग ट्रेड युनियन टाईप ऑफ एक्टीव्हीटी.. ही इज गिव्हिंग प्रेस इंटरव्ह्यू..

वैदेही : विथ रिस्पेक्ट..

न्या सी. डी. : नो. नो. ही इज मेकिंग रेकलेस एलिगेशन्स, ही इज नॉट इंटरेस्टेड इन मेडिकल प्रॅक्टीस.. आय विल कॅन्सल हिज डिग्री..

वैदेही : मिलॉर्ड, ही हॅज नॉट डन एनिथिंग इल्लीगल..

न्या सी. डी. :आय विल कॅन्सल एव्हरीथिंग, हिज डिग्री.. एम. डी. , एम. बी. बी. एस.., एव्हरीथिंग.. आय विल कॅन्सल..

वैदेही : मिलॉर्ड, आय हॅव फाईल्ड पब्लीक इंटरेस्ट लिटिगेशन सेइंग दॅट द डीन्स सन्स एडमिशन इज इल्लीगल.. देअर आर नो व्हेकंट सीट्स.. दे हॅव मिस रिप्रेझेंटेड टु धिस ऑनरेबल कोर्ट.. द चीफ जस्टीस हॅज डायरेक्टेड मी टु फाईल धिस पिटिशन..

न्या सी. डी. :येस मि. एम. एस., व्हेअर डिड यु गेट द व्हेकंट सीट फ़्रॉम?

मि. एम. एस. : मिलॉर्ड.. द हेड ऑफ पेडियाट्रिक डिपार्ट्मेंट टोल्ड अस दॅट देअर इज अ व्हेकन्सी.. आय विल आस्क हर टु फाईल एफिडेव्हिट
. . . . . . . . . . . .

न्या सी. डी. :ओ. के. सी ही इज फाइलिंग एफिडेव्हिट दॅट अ सीट वॉज व्हेकंट.. बट युअर क्लाएंट इज नॉट बिहिविंग प्रॉपरली..

नंदू : मिलॉर्ड, माय क्लाएंट..

न्या सी. डी. : मि. सातवळेकर, यू डोंट इन्टरफिअर.. शी इज एपिअरिंग फॉर द पिटिशनर..

नंदू: विथ रिस्पेक्ट.. आय एम ऑल्सो एपिअरिंग फॉर द पिटिशनर.. एन्ड आय वॉन्ट टु क्लॅरिफाय.. काइंडली डायरेक्ट देम टु प्रूव्ह द एलिगेशन्स.. एन्ड प्लीज आस्क द प्रेस अबाऊट न्यूज रिपोर्टस.

न्या सी. डी. : येस, आय विल कॉल द प्रेस, बट यू फाईल एफिडेव्हिट , एन्ड यू ऑल्सो फाईल एफिडेव्हिट, बट आय विल कॅन्सल एव्हरिथिंग.. एम. डी.. एम. बी. बी. एस.. ऑर यू विड्रॉ..

नंदू : आय विल नॉट विड्रॉ.. आय वॉंट इन्स्पेक्षन ऑफ डॉक्युमेंट्स..

न्या सी. डी. : ओ. के. दे विल गिव्ह यू.. वी शॅल हियर आफ़्टर ३ वीक्स ऑन ११ नोव्हेंबर १९८७.

२१ ऑक्टोबर १९८७ सायंकाळी ५.४० वाजता सह्याद्री एक्सप्रेस

गाडीत माणसांची आणि मनात विचारांची प्रचंड गर्दी!

भयंकर सुन्न डोकी.. लोणावळ्यापर्यंत कुणीही काहीही बोलल नाही.

तिथं उतरलो आणि पुढच्या लोकलने घरी जायचं ठरवल.

अरे, त्यांनी कोर्टाला फसवलं म्हणून मी केस फाईल केली.. आणि म्हणे माझीच डिग्री कॅन्सल करीन? हे काय भलतंच? गंमत आहे का?

रिलॅक्स यार.. असलं काहीही करु शकत नाहीत ते.

पण असं म्हणाले तरी का? आय विल कॅन्सल एव्हरीथिंग..

ते काहीही म्हणू शकतात.. त्यांना पॉवर्स आहेत.

पण सरळ "ऑर यू विड्रॉ?".. हे दबाव आणणं झालं नाही का?

तुला विड्रॉ करायचंय का?

हॅड.. करा म्हणावं माझी डिग्री कॅन्सल.. सुप्रीम कोर्टात जाईन मी.. यांना पॉवर्स आहेत का?

नाहीत.. पण तू कशाला घाबरतोयस.. त्यांना म्हणायचं ते म्हणू दे ना..

आणि मी तुला सांगत होते .. प्रेसमधे छापू नकोस.. आज बघितलस?

अग, छापलं म्हणून तर त्यांनी केस फेटाळली नाही आपली.

आता पब्लिक ओपिनियन तयार झालय ना.. त्याविरुद्ध जजमेंट द्यायला फार दम असायला लागतो..

राजू, शांत हो.. असं कुठेही बोलू नकोस.. आणि लक्षात ठेव.. नेव्हर स्कॅन्डलाईज अ जज.. मग आम्हीही तुला वाचवू शकणार नाही..त्यांनी काही ऑर्डर पास केलीय का?

पण तू ऐकूनच का घेतलस माझ्या डिग्री संबंधी? व्हॉट बिझिनेस ही हॅज गॉट टु स्पीक सच नॉन्सेन्स..
मला काय फुकट दिलीय का कोणी?

पण तुला काय फरक पडतो ते काहीही बोलले तर?

बट यू शुड हॅव अर्ग्युड..

प्लीज डोंट टीच मी व्हॉट टु अर्ग्यू.. मला कळतं

वैदेही, नेक्स्ट टाईम ही टॉक्स नॉन्सेन्स.. यू टेल हिम टु कॅन्सल माय डिग्री.. बघून घेतो मी..काय मोगलाई आहे का काय? डिग्री कॅन्सल करतो म्हणे.. स्वत:च्या पॉवर्स काय आहेत ते वाचा एकदा म्हणावं.. नंदू आय डोंट लाईक यू लिसनिंग टु सच नॉन्सेन्स..

आर डी, आम्हाला काय बोलायचं ते कळत..तू शांत रहा. मी बघीन काय ते. आज गरज पडली तेंव्हा मी इंटर्व्हीन केलं ना? आणि जास्ती शहाणपणा केलास तर मी माझं वकीलपत्र काढून घेईन.. रिलॅक्स.. डोंट ट्राय टु एक्ट स्मार्ट..

सॉरी.. मला तुम्हाला दुखवायचं नव्हत.. पण माझ्या डिग्रीबद्दल बोललेलं मी कसं सहन करू?

मला पटतंय... पण तरीही शांत रहायला शीक.. यू आर रिप्रेझेंटिंग व्हॉट स्टुडंटस आर सेईंग.. यू शुड बिहेव एज सेक्रेटरी.. नॉट डॉ राजीव जोशी.

पण ते नाहीका माझ्या वैयक्तीक डिग्रीविषयी बोलले?

त्यांना काहीही बोलूदे..दे आर जजेस.. त्यांच्या पॉवर्स प्रचंड आहेत. तुला एखादी गोष्ट पटली नाही तरी शांत रहा.आणि आता प्रेसमधे काहीही छापू नकोस..

मी बातम्या देणार.. एकशे एक टक्के..मला प्रेसची पॉवर कळलीय.. हे लेकाचे मला प्रेशराईज करतात काय.. मीच त्यांना प्रेशराईज करतो पेपरात छापून आणून..लेट हिम कॉल द प्रेस..

पण मागे सांगीतलेले लक्षात ठेव म्हणजे झालं

येस .. माझं नाव कुठेही येणार नाही.. बाय.. गुड नाईट!

२२ ऑक्टोबर १९८७

कॉलेजमधे प्रल्हाद भेटला. मॅडमचा एकदम विश्वासू.. त्याच्याबरोबर चहा प्यायला गेलो.

आर डी ती केस कुठपर्यंत आली?

अरे कालच हिअरिंग झालं..

पण आपल्या मॅडमना काही त्रास होणार नाही ना?

ते त्यांच्यावरच अवलंबून आहे.

म्हणजे?

काल सरकारी वकिलांनं त्यांचं नाव पुढे केलं.. व्हेकंट सीट संबंधी. मॅडमना एफिडेव्हिट करायला सांगतो असं त्या वकिलानी कोर्टाला सांगीतलं.

अरे पण मॅडमनीच वर्माची सीट व्हेकंट आहे असं कळवलवतं.. म्हणजे असं मला कळलय..

वर्मा? हा कोण आता?

होता एक ए. जी. वर्मा म्हणून.. कोणाला सांगू नकोस..मॅडम मलाच विचारत होत्या की तो कधी सोडून गेला म्हणून..

मग कधी गेला तो?

८२ साली.. बहुतेक .. मॅडमनी तसं पत्र लिहिलयं डीन ला..

पण मला तर त्या म्हणाल्या की मी लेखी काहीही दिलं नाहीये.

त्यांना तू पुढे असं काही करशील असं वाटलचं नाही..

आता? झाली की नाही गोची?

पण मॅडमनी चुकीचं काही लिहिलंच नाहीये त्या पत्रात.. वर्माची जागा मोकळी झाली असं काहीतरी लिहिलय..

अरे.. पण ८२ साली मोकळी झाली ना जागा? ती आता कशी देता येईल? ५ वर्षांनंतर?

ते ही खरचं आहे म्हणा.. आणि दिली तर डीनच्या मुलालाच का? इतर कोणी भेटले नाही का त्यांना? पण तू मॅडम विरुध्द..

हे बघ.. मी त्यांच्या विरुद्ध काहीच स्टेटमेंट केलेलं नाही.. आणि करणार ही नाही.. पण तू त्यांना सांग.. एफिडेव्हिट काळजीपूर्वक करा.. हे लोक उगाच मॅडमना लटकावतील.. शेवटी काय मुलासाठी ते काहीही करतील!


३ नोव्हेंबर १९८७

अजूनपर्यंत मला युनिव्हर्सिटीमधल्या पत्रव्यवहाराच्या प्रती मिळाल्या नव्हत्या. आणि वर्माचा शोधही लावायचा होता. मग मी ठरवलं सरळ रजिस्ट्रारकडे जायचं. तेथील पत्रव्यवहाराच्या प्रती मिळवण अशक्य होतं त्यामुळे वाचून लक्षात ठेवायला पाहिजे असं ठरवलं. कुशाग्र स्मरणशक्ती असणारा अरविंद माझा मित्र होता. एका वेळी ३० जणांशी बुध्दीबळ खेळून तो सर्वांना हरवत असे. त्याला आणि गिरीशला बरोबर येण्यासाठी विंनंती केली. त्यांना घेऊन युनिव्हर्सिटीमधील रजिस्ट्रार ऑफीसमधे गेलो.

येस..

नमस्कार.. मी डॉ. राजीव जोशी..

काय काम आहे.. आय एम बीझी..

मला श्रीवास्तव केसमधील कागदपत्र बघायची आहेत.

सॉरी.. मी दाखवू शकत नाही.. यू कॅन गो..

सर मी कोर्टात विनंती केली होती .. तेंव्हा कोर्टानं सरकारी वकीलाला सांगीतलय की कागदपत्र दाखवा..

पण आमच्याकडे काहीही डायरेक्शनस नाहीत.. यू कॅन गो..

तुम्ही वकीलच नाही दिला तर तुमच्याकडे डायरेक्शनस कशा येणार?

माझ्याशी वाद घालू नका.. गेट आऊट..

हे पहा.. हे पत्र घ्या.. कागदपत्र दाखवण्याची विनंती. याच्यावर सही द्या मिळाल्याची आणि जे काय गेट आऊट म्हणतायना ते लिहा त्याच्यावर..

हे पहा..

म्हणजे मी कोर्टाला जाऊन सांगतो की कोर्टाच्या आज्ञेचा अवमान करून तुम्ही कागदपत्र बघायला परवानगी दिली नाहीत म्हणून..

अहो पण..

ही काय तुमच्या घरची कागदपत्र आहेत? केसच लावतो तुमच्यावर..

तुम्ही मला कायदा शिकवताय?

ते तुम्ही ठरवा.. कागद दाखवता की नाही? का सही करता इथे?

मी व्ही सींकडे जाऊका तुमच्या विरुध्द तक्रार घेऊन?

अहो पण आमचा काय संबंध या भानगडीशी?

तुम्ही कागद दाखवता का उद्या पेपरला छापून आणू की यात युनिव्हर्सिटीचा आणि तुमचा हात आहे म्हणून.. मग बघा संबंध येतो की नाही ते..

अहो उगाच..

ठीक आहे, मी बघतो काय करायचे ते. बराय!

अहो.. एक मिनीट.. बघा तुम्हाला काय हवं ते पण गुपचुप..

तुम्ही कागदपत्र इथे मागवता का फोन करून सांगता?

पण कॉपी वगैरे करु नका हं काही.. हॅलो.. अहो ते डॉ जोशी येतील.. त्यांना ती श्रीवास्तवांची फाईल दाखवा..

धन्यवाद!

बाहेर गिरीश व अरविंद उभे होते. त्यांना घेऊन ऑफिसमधे गेलो..

नमस्कार.. मी डॉ जोशी..

या, आत्ताच साहेबांनी फोन केलावता..

हो..श्रीवास्तवांची फाईल दाखवताना..

ही घ्या फाईल, त्या टेबलावर बसा..

हे आमच्या कमिटीचे मेंबर्स.. आम्ही तिघेही बसतो तिकडे..

हो.. बसाना.. बसा...



एक एक कागद चाळायला सुरुवात केली..

मी हळू आवाजात वाचलं, गिरिशने प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर लिहिले आणि अरविंदने पाहिले, ऐकेले आणि लक्षात ठेवले!

आमचा शॉर्टफॉर्म..

प्रथम डीनचे पत्र लिहून घेतल, ज्यात लिहिल होत "द ऑनरेबल कोर्ट हॅज डायरेक्टेड टु एडमिट हिम टु द एम डी पेडिअयाट्रिक कोर्स!"

मग मुलाच्या वकिलाचे पत्र ज्यात कोर्टाची मूळची ऑर्डर बदलून चक्क स्वत:ला सोयीची पडेल अशी ऑर्डर लिहिली होती आणि पुढे लिहिलं होतं "कोर्टानं त्याला प्रवेश द्या असं सांगीतलयं!"

हे दोन पुरावे या दोघांमधला कट सिध्द करायला पुरेसे होते. मग बाकी कागद अरविंद कडे सोपवले.. गिरीशला लिहून घेतलेले कागद घेऊन सटकायला सांगीतलं आणि माझा मोर्चा वर्माकडे वळवला!

मला जरा ते एडमिशनचं रजिस्टर दाखवताका? ८२ सालचं?

हे घ्या..

८२ साली वर्माला प्रवेशच दिला नव्हता!

मग ८१ बघीतल.. त्यातही वर्मा नाही!

मग८२,८३,८४,८५,८६.. वर्मा नाही!

परत सगळी रजिस्टर्स बघितली..

८१ ते ८७ सालपर्यंत वर्मा नावाच्या मुलाला प्रवेशच दिला नव्हता! वर्मा नाहीच!

म्हणजे मॅडमनी सरासर खोटं सांगीतलं होतं.. की वर्माला ८२ साली प्रवेश दिला होता!

म्हणजे मॅडमनीच श्रीवास्तवांना खोटी व्हेकन्सी दाखवली? कशासाठी? ट्रान्स्फर कॅन्सल करून घेण्यासाठी.. का इतर काही कारणासाठी?

मग मी ८१ सालापासून एम. डी. पेडियाट्रिक्सला प्रवेश मिळालेल्या सगळ्यांची यादी तयार करायला घेतली..८१..८२..८३ ..

हे त्या क्लार्कच्या लक्षात आलं..

तो हळूच रजिस्ट्रारच्या खोलीत गेला..

मी अरविंदला खूण केली आणि तिथून पळालो! चक्क!!

८४ सालच्या पुढचे सगळे माझे मित्रच होते.. माझ्या बरोबर आणि नंतर प्रवेश घेतलेले..
आणि त्यात वर्मा नव्हता!

युनिव्हर्सिटीच्या कॅन्टीनमधे बसून पाईनॅपल ज्युस पिताना शॉर्टफॉर्मचा लॉंगफॉर्म केला..

सर्व कागद पुन्हापुन्हा वाचले आणि आज मिळालेल्या पुराव्यावर खूष होऊन एक एक पाइनॅपल ज्युस पुन्हा प्यायलो!

५ नोव्हेंबर १९८७

दुपारी कॉलेजात गेलो तर कळल की संजय श्रीवास्तव निवासी डॉक्टरांच्या रजिस्टरमधे सही करून पगार घेऊन गेला.

ही बातमी धक्कादायक होती कारण संजय श्रीवास्तव बालरोगशास्त्रविभागात निवासी डॉक्टर म्हणून कामच करत नव्हता!

तिथे ५ जागा होत्या आणि त्या आधीच्या ७ जणांपैकी ५ जणांना दिल्या होत्या.
तिथेही व्हेकन्सी नव्हती.. मग याला पगार कुठून दिला?

शोध लावायलाच हवा होता..

एव्हड्यात अतुल आणि संदीप दिसले.. आणि संदीपच्या गळ्यात कॅमेरा!

त्यानं माझा फोटो काढला आणि फिल्म पुढे सरकवायला जेव्हडा वेळ लागतो तेव्हड्यात माझ्या डोक्यात प्रचंड वेगाने चक्र फिरली..

आणि माझा प्लॅन सक्सेसफुल झाला..

अतुल निवासी डॉक्टरांच्या कचेरीत पगार घ्यायला गेला आणि रजिटर मधे स्वत:चे नाव शोधायच्या ऐवजी त्याने संजय श्रीवास्तवचं नाव शोधलं! ते सापडताच त्याने रजिस्टरवरचे हात काढले आणि तयारीत असलेल्या संदीपने त्या रजिस्टरचे फोटो काढले!

ऑफिसमधे एकच धावाधाव झाली.. फोटो काढले.. फोटो काढले..

आम्हीही धावतपळत कॅम्पातील फोटोफास्टच्या लॅबमधे गेलो.. आणि अर्जंट प्रिंटस काढायला दिले.

ते होण्यासाठी अर्धा तास लागणार होता.

तोपर्यंत कॉफी हाऊसमधे बसून कॉफी पितापिता संदीपला सर्व किस्सा सांगितला.

थोड्या वेळाने अतुल प्रिंट्स घेऊन आला ते पाहून आमच्या सर्वांचे डोळेच फिरले..

संजय श्रीवास्तव मनोरुग्णशास्त्राच्या विभागातून पगार घेत होता!

बेकायदेशीर कारभाराचा हा कळस होता!

आणि ही घटना सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही अजून एक एक कॉफी मागवली!

मग आम्ही हे सर्व पेपरात छापून आणायचं ठरवलं. याचा आमच्या केसमधे कुठेच उल्लेख नसल्यामुळे "सबज्युडिसची भानगड" सुद्धा नव्हती!

सगळे फोटो घेऊन महाराष्ट्र हेराल्डमधे गेलो आणि जो पिंटोला सगळं सांगीतलं.. त्याच्या बरोबर मुख्य संपादक वाघ यांना भेटलो. त्यांनी पिंटोला दुसर्‍या दिवशीच्या पेपरमधे स्टोरी लिहायला सांगीतली.. मग त्याच्या बरोबर बसून त्याला सगळे मुद्दे तपशीलवार सांगीतले.त्याने कच्चा मसुदा तयार केला आणि हॅरी डेव्हिडला पहायला दिला.

तो म्हणाला..राजू.. धिस इस अ स्कॅंडल.. फारच उत्तम काम केलसं तू..

आता आम्ही याचा फायनल ड्राफ्ट तयार करतो आणि उद्या फ्रंट पेजवर ही स्टोरी लावतो..
जा तू.. वाच उद्या सकाळी!

६ नोव्हेंबर १९८७

महाराष्ट्र हेराल्डच्या फ्रंट पेजवर ठळक मसुदा..

बी. जे. डीन इन मिस-रिप्रेझेंटेशन मडल!

मनोरुग्णशास्त्र विभागातून संजय श्रीवास्तवला पगार दिल्याच्या फोटोसकट युनिव्हर्सिटीला खोटी माहिती दिल्यासंबंधी तपशीलवार बातमी!

७ नोव्हेंबर १९८७

इंडियन एक्सप्रेसने तीच स्टोरी परत छापली. त्याचा मथळा..

प्रिव्हिलेजेस प्लेंटी फॉर द डीन्स सन..!

या बातम्यांमुळे कॉलेजात भयंकर खळबळ झाली..

मॅडमनाही टेंशन आलं असाव.. कारण त्या गंभीरला म्हणाल्या..
"अरे त्याला म्हणावं किमान पेपरला तरी छापून आणू नको!"

११ नोव्हेंबर १९८७ सिंहगड एक्सप्रेस.

नंदू आणि वैदेहीला श्रीवास्तवच्या पगाराबद्दलचे भानगड फोनवर सांगीतली होती पण फोटो आणि बातमी दाखवली नव्हती. वैदेहीने वर्तमान पत्र घेतली आणि नंदू फोटो बघून खोखो ह्सत सुटला.

काय मूर्ख आहेत तुमच्या कॉलेजातील लोक! अरे बेकायदेशीर गोष्टी करायच्या म्हणजे किती करायच्या? आणि तुमच ते मार्ड आता गप्प का बसल? आता या कोर्टात आणि सांगा म्हणाव बालरोगशासत्रातील मधल्या विद्यार्थ्याला मानसोपचार विभागात रेसिडेंट म्हणून कसे चिकटवले ते! आज मीच या पेपरच्या कॉपीज जजेसना देतो.. सबज्युडिस नसलेली भानगड! बघूया काय करतात ते!

१०.४५ उच्च न्यायालयात पोचताच सरकारी वकीलाने बालरोगशास्त्रविभागाच्या प्रमुखांचे म्हणजे मॅडमचे प्रतिज्ञा पत्र दिल. त्यात वर्माच्या सीट संबंधीचा सर्व इतिहास वर्णन केला होता. शेवटी स्वत:च्या पत्राची प्रत जोडली होती त्यामधे वर्माच्या प्रवेशाचे आधी लिहिलेले ८२ साल खोडून ८० करण्यात आले होते!
. . . . .

न्या सी डी.: येस मि. एम एस.

मि. एम. एस.. : मिलॉर्ड धिस पिटिशनर इज इंटरफिअरिंग इन द कोर्ट प्रोसीजर..मिलॉर्ड, ही थ्रेटन्ड द हेड ऑफ पेडिआट्रिक डिपार्टमेंट नॉट टु फाईल एफिडेव्हिट.. एन्ड ही इज पब्लिशिंग इन द न्युजपेपर्स समथिंग रिगार्डिंग द केस एव्हरी डे.. काइंडली

न्या सी डी.: व्हॉट..व्हेअर इज द पिटिशनर? येस.. यू.. कम फॉरवर्ड..

वैदेही : मिलॉर्ड, धिस इस अ टोटली फॉल्स एलिगशन.

न्या सी डी.:यू कीप क्वाएट..येस.. यू..यू आर थ्रेटनिंग अ लेडी?

मी : नो सर, आय हॅव नॉट डन एनिथिंग..

न्या सी डी.: यू.. आय विल कॅन्सल युवर डिग्री..यू डोंट डिसर्व्ह टु वर्क एज अ डॉक्टर.. आय विल डायरेक्ट..

नंदू : मिलॉर्ड.. काइंडली डायरेक्ट द हेड ऑफ पेडिआट्रिक डिपार्टमेंट टु से दॅट ऑन एफिडेव्हिट.. हर एफिडेव्हिट डज नॉट कंटेन एनी एलिगेशन्स अगेन्स्ट मी. माय लर्नेड फ्रेंड इज मेकिंग ओरल एलिगेशन्स.. ही शुड फाईल क्रिमिनल प्रोसिडिंग्ज अगेंस्ट मी इन लोअर कोर्ट.. हाय कोर्ट इज नॉट अ प्लेस फॉर दॅट.

न्या सी डी.: बट यू मस्ट सी दॅट युअर क्लाएंट बीहेव्ज प्रॉपरली..

नंदू : मिलॉर्ड.. दे आर ट्राइंग टु डायव्हर्ट अटेंशन ऑफ धिस कोर्ट फ्रॉम इल्लीगॅलिटीज इन द एडमिशन.. कॉल द हेड ऑफ पेडिआट्रिक डिपार्टमेंट टु कोर्ट.. आय वॉंट टु टेक क्रॉस..

न्या सी डी.: येस, शी विल फाईल एफिडेव्हिट ऑर मि. एम. एस. कॉल हर टु द कोर्ट.. बट मि. सातवळेकर, शी इज सेइंग दॅट देअर इज अ व्हेकन्सी फ़्रॉम १९८०. सो द स्टेटमेंट इज नॉट फॉल्स..

नंदू : मिलॉर्ड.. अ व्हेकन्सी फ्रॉम १९८० कॅन नॉट बी कन्सिडर्ड एज व्हेकन्सी इन १९८७.. एज पर हर ओन एफिडेव्हिट.. युनिव्हर्सिटी हॅज रिफ्युज्ड टु गिव्ह द सीट टु एनीवन.. काइंडली सी पेज..

न्या सी डी.: बट..

नंदू : एन्ड एकोर्डिंग टु जजमेंट ऑफ धिस हायकोर्ट, प्रीव्हिअस व्हेकन्सी कॅन नॉट बी कॅरीड फॉर्वर्ड..

न्या सी डी.: व्हेअर इज द जजमेंट?

नंदू : आय हॅव गॉट अ कॉपी फॉर यू.. एन्ड मिलॉर्ड..दे हॅव इन्फ़ॉर्मड द कोर्ट दॅट अ सीट हॅज बिकम व्हेकंट.. बट दॅट इज नॉट द केस..धिस वॉज देअर इन जानेवारी व्हेन सीट्स वेअर डिक्लेअर्ड.. व्हाय दे डिड नॉट नोटिफाय देन?

वैदेही : मिलॉर्ड धिस जजमेंट क्लिअरली स्टेट्स दॅट व्हेकन्सी कॅन नॉट बी कॅरीड फॉर्वर्ड..विच इज बाइंडिंग ऑन यू..

न्या सी. डी. : वुई विल हॅव टु रीड द जजमेंट नीटली.. एन्ड रीहिअर आफ्टर ३ वीक्स..

परत एकदा सह्याद्री एक्सप्रेस..

नंदू.. ते जजमेंट बघू.. मला काही बोललाच नाहीस तू..

तुला सांगीतल असत तर तो ते पेपरात छापून आणल असतस आणि त्याच्यावर विचार करायला त्यांना वेळ मिळाला असता.. म्हणून मी आणि वैदेहीनी ठरवल.. की तुला मुद्दाम सांगायचं नाही..

ठीक आहे.. आज त्यामुळे त्यांच तोंड बंद झालं.. पॉश!.. आता बघू काय करतात लेकाचे.. पण वैदेही.. आज तू परत माझ्या डिग्री बद्दल ऐकून घेतलस..

राजू.. तू गप्प बस ना! आम्ही बघू काय करायचं ते. आजच जजमेंट मला केसच्या सुरुवातीपासूनच माहीत होतं.. आणि आमचा अंदाज होताच की ते मागची कुठलीतरी सीट दाखवणार म्हणून.. आता बरोबर ट्रॅप झाले की नाही ते. म्हणून जरा सीक्रसीचं महत्व शीक. प्रत्येक गोष्टीची बोंबाबोंब करायची गरज नसते.

बर बाई.. मान्य आहे.. पण मॅडम.. मी म्हणे त्यांना दम दिला..

बघ तू.. सरकारी वकील त्यांचं एफिडेव्हिट आणेल पुढच्या वेळी..

मग?

आर. डी. त्याच्या आत आपण त्यांच्यावर गेम टाकायची. सरकारी वकीलाकडून कॉलेजच्या लोकांना काहीही कळायच्या आत!

गेम? म्हणजे? मॅडमची आणि माझी रिलेशन्स तर स्पॉईल होणार नाहीत ना?

हे बघ. आत्ता त्या आपल्या विरुध्द पक्षाला मदत करतायत. शत्रूचा मित्र तो आपला शत्रूच..

मग .. मी.. काय करू म्हणतोस?

तू उद्या त्यांना पत्र लिहायचं. की सरकारी वकिलाने असे असे खोटे आरोप केले.. तेंव्हा यापुढील सर्व ऑर्डर्स लेखीच द्या.. व मी सुद्धा लेखीच उत्तरं देईन..कृपया शाब्दिक देवाणघेवाण व त्यामुळे होणारी कॉम्प्लिकेशन्स टाळा इत्यादी.. आणि पत्र मिळाल्याची सही घ्यायचीस.. सकाळी लवकरात लवकर..उद्याच.

अरे.. पण माझी आणि त्यांची उगाच खुन्नस.. अरे त्या नाही करणार माझ्याबद्दल असे प्रतिज्ञापत्र.. मला खात्री आहे..

हे बघ.. असा इमोशनल होऊ नकोस.. त्यांना हवं तर तोंडी सांग.. की असं पत्र लिहायची माझी इच्छा नव्हती.. पण वकिलांचा सल्ला म्हणून..

मी ते पत्र इनवर्ड क्लार्ककडे दिलं तर चालेल? म्हणजे उगाच समोरासमोर येऊन भलतचं व्हायला नको!

तुझी आणि त्यांची एव्हडी एटॅचमेंट असेल तर तसं कर..

१२ नोव्हेंबर १९८७

दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी मॅडमना पत्र लिहिलं.

दोन तीन वेळा त्यात बदलाबदली करून शेवटी एकदाचा मसुदा तयार झाला.

मग कार्बन घालून दोन प्रती तयार केल्या. आणि ते घेऊन लवकरच ससूनला पोचलो.

हसीनाकडे पत्र देऊन कार्बनकॉपीवर मिळाल्याची सही घेतली आणि तिला ते मॅडमकडे द्यायला सांगीतल.

तिने ते पत्र आत नेऊन दिले तेंव्हा मी हळूच डोकाऊन बघितल.

मॅडमचा चेहरा गोरामोरा झाला. मलाही खूप वाईट वाटलं. मी पटकन माझ्या खोलीत जाऊन बसलो.

मॅडमनी हसीनाबरोबर निरोप पाठवून खोलीत बोलावलं..

तर मी लेखी काय ते सांगा असा उलटा निरोप पाठवला

. . . . . . .

दुपारी परत एकदा मॅडमचा निरोप आला.. माझा परत नकार
. . . . . .

मग त्याच उठून माझ्याकडे आल्या..

राजू .. काय चाललयं हे?

. . . . .

हे बघ माझ्या डिपार्टमेंट मधे असलं काहीही चालणार नाही
. . . . . . .

पण तू मला नीट काय ते सांग ना.. पत्रं कसली लिहितोस?
. . . . .

मी तुला त्या केस संबंधी कधी काही बोललेयका?

मॅडम कोर्टात काय झालं ते मी तुम्हाला लेखी काय ते कळवलं आहे. तुम्हीही जे काय म्हणायच असेल ते लेखी द्या.

अरे पण..

माझ्या डोळ्यांतले अश्रू थांबवणं मला अवघड जात होतं. यापुढे हे मला सहन होण्यासारखं नव्हतं. मी उठून सरळ चालायला लागलो.

राजू.. थांब..

मी थांबलो नाही..

यू कॅन नॉट डिसओबे माय ऑर्डर्स..

मला फिकीर नव्हती..

आय विल टेक एक्शन अगेंस्ट यू..

मी डिपार्टमेंटच्या बाहेर पोचलो होतो
. . . . . . .

मधे काही वेळ असाच गेला.. कोल्ड वॉर
. . . . . . .

मग त्यानी मला पत्र लिहिले. माझ्या डिपार्टमेंटमधे मी कशा पध्दतीने काम करावे यासंबंधी तुझ्याकडून सूचना नकोत
. . . . . .

मी ही त्यांना सांगीतलं की माझ्या इच्छेविरुध्द पण वकिलाच्या सल्यानुसार पत्र लिहिणं मला भाग होतं.
कोल्ड वॉर संपल
. . . . . . .

हे पत्र नंदूला नेऊन देताच तो खूष झाला.. त्याचा हेतू पूर्ण झाला होता.

२५ नोव्हेंबर १९८७

सरकारी वकिलाने वैदेहीच्या हातात कागद दिले. वैदेहीने ते नंदूला दाखवले.

ती माझ्याविरुद्ध सरकारतर्फे दाखल करण्यात आलेली केस होती.

कोर्टाचा अवमान केल्यासंबंधीची.

महाराष्ट्र सरकार आणि इतर विरुद्ध डॉ राजीव जोशी..
डॉ राजीव जोशींनी कोर्टाचा अवमान केलाय..
कोर्टानं त्यांना वारंवार एम. बी. बी. एस. डिग्री कॅन्सल करू अशी समज देऊनही ते वर्तणूक सुधारत नाहीत..
त्यांनी बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुखांवर पत्र लिहून दबाव आणला..
त्यांनी बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुखांना दम दिला..
त्यांनी न्यायदानाच्या कामात अडथळा आणला..
तेंव्हा त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याची नोटीस बजावावी..
त्या खाली माझ्या पत्राची प्रत आणि मॅडमच्या उत्तराची प्रत!

हा माझ्यावर सरळसरळ दबाव आणण्याचा प्रयत्न होता.

पण नंदू आणि वैदेही शांत होते.

नंदूच्या मते आमच्या दृष्टीने हे फारचं चांगल झालं होतं.

नंदूने वैदेहीला काही सूचना दिल्या आणी सांगीतलं की तू एव्हडचं म्हणायचं की जर डॉ जोशींनी दमदाटी केली असती तर त्यांनी शाब्दिक देवाणघेवाण व्हावी असा आग्रह धरलाच नसता. आणि त्यांनी पोलीस केस दाखल केली असती.

कोर्ट रूम मधे..

न्या सी. डी. : येस मि. एम. एस.

मि. एम. एस. : मिलॉर्ड डॉ जोशी इज अ मेंबर ऑफ पतित पावन. ही वॉज इन्व्हॉल्वड इन अ घेराओ टु द डीन रिगार्डिंग थेफ्ट ऑफ अ चाईल्ड फ्रॉम ससून हॉस्पिटल.. एन्ड वॉज इन्व्हॉल्वड इन दॅट थेफ्ट.. वी हॅव इव्हिडन्स..

वैदेही : माय लॉर्डस, दीज पीपल आर मेकिंग एलीगेशन्स आफ्टर एलीगेशन्स एन्ड ट्राईंग टू डायव्हर्ट अटेंशन ऑफ द कोर्ट.. माय लॉर्डस दे शुड प्रोड्युस एट लीस्ट वन इव्हिडन्स..

न्या सी. डी : बट युअर क्लाएंट इज मेंबर ऑफ पतीत पावन..

वैदेही : ही इज नॉट अ मेंबर ऑफ पतीत पावन.. एन्ड इव्हन इफ ही इज.. दॅट डज नॉट मेक एनी डिफरन्स इन द मेरिट्स ऑफ धिस केस. ही हॅज लोकस टु फाईल धिस पिटिशन.. एज अ मेंबर ऑफ पब्लीक ही कॅन फाईट अगेंस्ट द ब्रीच ऑफ पब्लीक ड्युटी एन्ड पब्लीक इन्ज्युरी.. काइंडली सी सुप्रीम कोर्ट जजमेंट इन वधावा व्हर्सेस स्टेट ऑफ बिहार..

न्या. सी. डी. : व्हॉट अबाऊट एलिगेशन्स रिगार्डिंग हेड ऑफ पेडियाट्रिक्स डिपार्ट्मेंट..

वैदेही : मिलॉर्ड.. हॅड डॉ जोशी थ्रेटन्ड हर..शी वुड नॉट हॅव इन्सिस्टेड ऑन व्हर्बल ट्रान्सॅक्शन. प्लीज सी हर लेटर इन द केस फाईल्ड बाय देम..

न्या. सी. डी. : बट व्हाय डिड यू राईट अ लेटर टु हर?

नंदू : बिकॉज आय वॉंटेड टु गेट द एलीगेशन्स ऑन रेकॉर्ड. एन्ड नाऊ दॅट दे हॅव फाईल्ड धिस कंटेंप्ट पीटिशन..इट क्लॅरिफाईज दॅट द स्टेट ऑफ महाराष्ट्र इज ट्राईंग टु हेल्प द डीन्स सन.. दे आर कॉन्स्पिरन्ट्स.. एन्ड दे आर सेईंग दॅट बाय स्पीकिंग रिगार्डिंग कॅन्सलेशन ऑफ हिज डीग्री धिस कोर्ट ट्राईड टु प्रेशराईज डॉ जोशी..

न्या. सी. डी. : बट देअर आर सेव्हरल एलीगेशन्स रिगार्डिंग युअर क्लाएंट..

वैदेही : हाऊ कॅन धिस कोर्ट एन्टरटेन क्रिमिनल एलीगेशन्स? लेट देम गो टु प्रॉपर कोर्ट फॉर दॅट..वी वॉंट टु ब्रिंग टु युअर नोटीस इंपॉर्टंट फॅक्टस इन धिस इल्लीगल एडमिशन.. काइंड्ली हियर अस..दे हॅव मिसरिप्रेझेंटेड टु धिस कोर्ट.. टु धिस बेंच..

न्या. सी. डी. : बट युअर क्लाएंट..

नंदू : इफ धिस कोर्ट डज नॉट वॉंट टु हिअर मी.. देन एट लिस्ट रिजेक्ट द पिटिशन.. आय विल गो टु सुप्रीम कोर्ट..धिस कोर्ट इज एन्टरटेनिंग बेसलेस एलीगेशन्स.. विदाऊट हिअरिंग अस.. एट लीस्ट माय लॉर्डस काइंडली कन्सिडर.. माय लॉर्डस नॉट ओन्ली माय राईट टुबी हर्ड इज बीइंग़ व्हायोलेटेड .. आय एम बीइंग प्रेशराईज्ड..

न्या. एस. यु. : मिस्टर सातवळेकर.. वी शॅल हियर यू
. . . . . . .

वैदेही : मिलॉर्ड.. आय हॅव फाईल्ड धिस पब्लिक इन्टरेस्ट लिटिगेशन विथ काइंड परमिशन गिव्हन बाय द ऑनरेबल चीफ जस्टीस ऑफ धिस हाय कोर्ट सो द क्वेश्चन ऑफ लोकस डज नॉट अराईज
......... अर्ग्युमेन्ट .......
सो वी हॅव प्रूव्हद बीयॉन्ड डाऊट दॅट द डीन्स सन हॅज बीन एडमिटेड ऑन सीक्रेटली क्रिएटेड इल्लीगल एक्स्ट्रॉ सीट विच शुड बी कॅन्सल्ड.

नंदू : मिलॉर्ड.. नन ऑफ द रिस्पॉंडन्टस हॅव इव्हन ट्राईड टु प्रूव्ह दॅट द एडमिशन इज लीगल.
....... अर्ग्युमेन्ट .......
इन्स्टेड दे चोज टु एडॉप्ट प्रेशरायझिंग टॅक्टीक्स बाय मेकिंग रेकलेस एलिगेशन्स अगेंस्ट माय क्लाएंट.

मि. एम. एस. : वी हॅव बीन इन्फॉर्मड बाय द हेड ऑफ पेडियाट्रिक डिपार्टमेंट दॅट अ सीट वॉज व्हेकंट. सो वी हॅव नॉट मेड एनी फॉल्स स्टेटमेंट
........ अर्ग्युमेन्ट .......

मि. बी.एच. :मिलॉर्ड.. संजय श्रीवास्तव हॅज नॉट डन एनी इल्लीगल थिंग इन गेटिंग धिस एडमिशन
....... अर्ग्युमेन्ट .......
इफ एट ऑल एनिथिंग इज इल्लीगल, द डीन इज रिस्पॉन्सिबल, नॉट मी.

वैदेही : मिलॉर्ड, द डीन हॅज मिसलेड द युनिव्हर्सिटी विच इज इव्हिडंट फॉम हिज लेटर अनेक्सड ऑन पेज..

न्या एस.यु, : येस, मि एम. एस. व्हाय डिड द डीन राईट इन्करेक्ट ऑर्डर टु द युनिव्हर्सिटी?

मि. एम. एस : मिलॉर्ड आय हॅड इन्फॉर्मड द डीन द करेक्ट ऑर्डर..

न्या एस. यु. : देन मि. भगालिया, यू मस्ट हॅव इन्फॉर्मड द डीन विथ इन्करेक्ट फॅक्ट्स..

मि. बी. एच. : नो मिलॉर्ड.. आय विल प्रोड्युस माय लेटर आफ्टर लंच ब्रेक
. . . . . . .

२ ते २.४५ या वेळात पटापट जेवण उरकलं
. . . . . . .

न्या सी. डी. : येस मि. बी. एच. हॅव यू गॉट द लेटर?

मि. बी. एच. : नो मिलॉर्ड.. आय कुड नॉट फाईंड इट..

नंदू : आय हॅव गॉट कॉपी ऑफ हिज लेटर मिलॉर्ड.. क्लीयर मॅनिप्युलेशन.. आय हॅव गॉट कॉपीज फॉर यू मिलॉर्ड..

न्या सी. डी. : व्हेअर डिड यू गेट धिस लेटर?

नंदू : युनिव्हर्सिटी ऑफीस.. आय टुक इन्स्पेक्शन
. . . . .

न्या. सी. डी. : मि. बी. एच... व्हॉट इज धिस? यू हॅव चेंज्ड ऑर्डर ऑफ द कोर्ट? हाऊ कॅन यू डू दॅट?

न्या. एस. यू : ऑल धिस इज इल्लीगल.. मॅटर इज एडजर्न्ड फॉर जजमेंट..!!

मि. बी.एच. : मिलॉर्ड.. माणुसकी म्हणून.. दया म्हणून.. माझ्या क्लाएंटला काढू नका. त्याचे ६ महिने पूर्ण झालेत.. त्याचं नुकसान होईल..

न्या. सी. डी. : मि. बी.एच... यू हॅड फाईल्ड द पिटिशन अगेंस्ट इन्स्टिट्युशनल प्रेफरन्स रुल..सो नाऊ यू एप्लाय फॉर रिस्टोअरिंग द पिटिशन फॉर फायनल हिअरिंग..वी विल हिअर यू ऑन मेरिट्स ऑफ युअर पिटिशन.. एन्ड अलाऊ यू टु कंटिन्यू टिल द डिसिजन इन दॅट केस.. यू कॅन अमेंड युअर पिटिशन..
नो मोअर अर्ग्युमेंटस..

ही मात्र कमालच झाली! ऑर्डर बदलल्याबद्दल त्याच्यावर ताशेरे झोडण्या ऐवजी मि. बी.एच. ला चक्क न्यायधिशांकडून सल्ला मिळाला होता..

आणि न्यायालयाला फसवलं म्हणून कोर्टात येणार्‍या आम्हाला डिग्री कॅन्सल करण्याची धमकी!

खर तर हे न्यायासनाच्या मर्यादेच्या बाहेरचं होतं..

पण आम्ही त्या विरुद्ध बोलू शकत नव्हतो..

कारण न्यायालयाचा अपमान झाला असता....

असं नंदू आणि वैदेहीचं मत होतं..

पण मला ते पटतच नव्हत..

काय समजतात हे न्यायाधिश स्वत:ला?

लोक त्यांना माय लॉर्डस म्हणून संबोधतात..

तर हे स्वत:ला देवाच्याही वर समजायला लागले..

यू आर नॉट गॉड माय लॉर्डस.. यू आर जस्ट अ हायकोर्ट जज..

मला त्यांना सांगावसं वाटत होतं..

पण मी बोलू शकत नव्हतो..

कारण मी वकील दिला होता..

आणि माझे वकील असं सांगणार नव्हते..

कारण त्यांना काय बोलायचं ते कळतं..

पण मला त्यांना सांगायचंय..यू आर नॉट गॉड..!

मग मि.बी.एच ने अर्ज केला की संजयच्या केसची सुनावणी परत घ्यावी.. आणि तोपर्यंत त्याला एम. डी. चा अभ्यास करू द्यावा..

न्यायाधिशांनी ११ जानेवारीला निकालपत्राची तारीख ठरवली!


११ जानेवारी १९८८ : निकालपत्र!

सर्व कागदपत्र पहाता डॉ जोशींचं म्हणणं एकंदरीत बरोबर असल्याबद्दल आमचं समाधान झालं आहे..
परंतू सरकारतर्फे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून डीन चे विधान संपूर्ण पणे खोटं आहे असं आम्हाला वाटत नाही..

परंतू जेंव्हा कॉलेजच्या प्राचार्यांच्या मुलाचा फायदा होणार होता.. आणि तो झाला.. तेंव्हा आम्ही नि:संदिग्ध खरं विधान अपेक्षित केलं असत..

शिष्टाचारासाठी मोठ्या माणसाबद्दल हा खोटं बोलला असं म्हणू नये म्हणू नये म्हणून आम्ही तसं म्हणत नाही..

पण असं विधान आमच्या समोर करायला नको होतं असं म्हटल्यावाचून आम्हाला रहावत नाही!
खटल्याचं कामकाज चालू असताना मि.बी.एच. यांनी अर्ज केला की त्यांच्या मूळच्या अर्जाची सुनावणी व्हावी..

ही विंनती योग्य आहे.. म्हणून आम्ही ही याचिका मान्य करतो आणि श्रीवास्तवांची याचिका सुनावणीसाठी घ्यावी अशी आज्ञा करतो.

श्रीवास्तवांना याचिकेत सुधारणा करण्यास परवानगी आहे आणि या याचिकेची सुनावणी लवकर व्हावी म्हणून अर्ज करण्यास डॉ. जोशींना परवानगी आहे..

दुसर्‍या दिवशी इंडियन एक्सप्रेसने बातमी दिली..

Nepotism charges against B J Dean

कॉलेजात भयंकर खळबळ..
आता श्रीवास्तव सरांची बदली होणार..
किंवा ते राजिनामा देणार..
आर डी. जोशी.. अभिनंदन!

पण माझ्या मते हा निकालचं नव्हता..

नुसतीच सारवासारव..

आणि षंढ ताशेरे..

तुमचही बरोबर आहे आणि त्यांच ही चूक नाही. .

नॉन्सेन्स!

एकंदरीत प्रकरणात आमचा भ्रमनिरास झाला होता!

शहाण्यामाणसाने कोर्टाची पायरी चढू नये!..

कोर्टाला फसवलं म्हणून भांडणारे आम्ही मूर्ख ठरलो होतो..

बेकायदेशीर प्रवेश मिळवणारा संजय शहाणा ठरला होता..

आणि त्यावर कळस म्हणजे कोर्टाची ऑर्डर बदलून लिहिणार्‍या त्याच्या वकिलास ज्युडिशियल एडव्हाईस मिळाला होता..

बेकायदेशीर प्रवेश कायदेशीर करण्याचा..

आणि आम्ही कायदेशीर मार्गाने मिळवलेली डिग्री हे रद्द करणार!

काय अधिकार आहे यांना? मला त्यांना विचारायचंय..

पण माझे वकील त्याविरुद्ध आवाज उठवणार नाहीत..

मला त्या न्यायाधिशांना सांगायचयं.. यू आर नॉट गॉड..

पण माझे वकील असं काही बोलणार नाहीत..

पण मग मीच केस लढवली तर?

मग नंदू आणि वैदेही... त्यांना सांगीन .. राग मानू नका!तुमच्या मर्यादेबाहेर जाऊन तुम्ही बोलू शकत नाही..पण मला ही मर्यादाच मान्य नाही..

म्हणून या पुढे माझी बाजू मीच मांडणार आहे.. निश्चित!

२० जानेवारी १९८८

....रात्री ११ वाजता

डिंग डॉंग!

अरे इतक्या रात्री कोण आलं?

असं म्हणत मी दार उघडलं!

दारात माझ्या वडिलांचे एक डॉक्टर मित्र!

काका! या! या ना! बसा! थांबा हं, मी दादांना उठवतो..

नको.. अरे तुझ्याकडेच काम होतं.. त्यांना नको डिस्टर्ब करूस..

माझ्याकडे?

हो. अरे हॉस्पिटलमधलं काम उशीरा संपल पण प्रत्यक्ष भेटूनच तुझं अभिनंदन करावं असं ठरवलं होतं!
अभिनंदन? कशाबद्दल?

अरे त्या श्रीवास्तव प्रकरणात.. फारच छान लढत दिलीस हं तू!

हॅ! काका.. त्या कोर्टात काहीही अर्थ नाही! काय जजमेंट दिलय.. बघितलत ना?

ते तर आहेच! पण तरी तू तुझं काम मात्र चोख केलंस!

नाही.. अजून तर काम तर अपूर्णच आहे! आम्ही या पुढची केसही लढवणार आहोत!

हे बघ.. राजू.. मी काय म्हणतो..की आता बास कर..तुझा ही तोटाच होतोय या सगळ्या भानगडीत..शिवाय प्रॅक्टीसमधे असं इर्रेग्युलर राहून चालत नाही..

काका.. पण आता अर्धवट कसं सोडणार हो.. हाती घ्याल ते तडीस न्यायलाच पाहिजे!

पण मी काय म्हणतो.. हे बघ.. मी श्रीवास्तवशीही बोललोय.. तू केस मधे पुढे काही करणार नसशील तर तो तुला काहीही द्यायला तयार आहे..

काय? मी उडालोच!

म्हणजे ससूनमधे ऑनररी पोस्ट.. किंवा तुझा आतापर्यंत झालेला खर्च.. तू म्हणशील तसं करू..

! ? ! ? !

काका.. खर म्हणजे दादांचा या सगळ्या केसला विरोधच होता. पण मला वाटतं मी आता त्यांना उठवतो.. कारण मला तर असल्या चर्चेत भाग घ्यायचाच नाही.. पण दादांना जर कळल की मी तुमच्याशी या गोष्टी बोललो.. तरी ते मला घराबाहेर काढतील.. बसा हं तुम्ही..

नको.. नको.. अरे मी निघतोच आहे.. फारच उशीर झाला रे!

बरयं मग.. गुडनाईट!

. . . . . . . .

त्या नंतर तीन महिन्यांत श्रीवास्तवने केसच्या सुनावणीसाठी काहीच हालचाल केली नाही. याचा अर्थ तो याचिकेची सुनावणी होऊच देणार नव्हता..

म्हणजे असंच परिक्षेला बसायचं आणि एम. डी व्हायचं. आणि आमची तडफड व्यर्थ!

मग इतरांना का नाही हव्या त्या विषयात एम. डी. ला प्रवेश?....

या अन्यायाला कोर्टच जबाबदार आहे..

माणुसकी दाखवतात हे न्यायाधीश..

ही अमानुष वागणूक नाही का इतर मुलांना?

किमान भ्रष्टाचार सिद्ध झाल्यावर तरी शासन करा..

पण सरकारी नोकरांविरुद्ध फक्त ताशेरे झोडतात ऑनरेबल्स
. . . . . .

पण मग कोर्टाचा काय उपयोग? विचारलंच पाहिजे त्या ऑनरेबल्सना!

एप्रील, मे, जून, जुलै १९८८

वैदेही आणि शिवदे सरांनी एकाआड एक अर्ज केले..

लवकर सुनावणी होण्यासाठी. पण न्यायालयाला वेळ नाही म्हणून अर्ज फेटाळण्यात आले.

पुन्हा पुन्हा पदरी निराशाच पडली.


१५ ऑगस्ट १९८८

ध्वजवंदनासाठी ७ वाजता कॉलेजात पोचलो..

करंबेळकर आणि गिरीश सुद्धा आले होते.

कॅन्टीन मधे परत विषय निघाला.. जखमेवरची खपली निघाली.. टाळकी सटकली!

आणि परत नव्या उमेदीने केस लढवायचं ठरलं!.. स्वत:!


मग रवी बरोबर लॉ कॉलेजच्या लायब्ररीत जायला लागलो. १९७१ सालापासून १९८७ सालापर्यंत वैद्यकीय प्रवेशासंबंधीच्या सर्व केसेसचा अभ्यास केला.. त्यातील आवश्यक त्या निकालांच्या झेरॉक्स प्रती काढल्या.. वेगवेगळ्या फाईल्स तयार झाल्या..

आर्टिकल १४ / २१, लॉ ऑफ रिट पिटिशन वगैरे सर्व गोष्टी मला समजू लागल्या! माझ्या जवळील सर्व कागदपत्रांच्या आधारे एक अर्ज तयार केला.. त्यात संजय श्रीवास्तवच्या प्रवेशातील सर्व बेकायदेशीर गोष्टी नमूद करून त्याच्या केसमधे माझं म्हणणं ऐकून घ्यावे अशी विनंती केली आणी अर्जाच्या दोन प्रती काढून नंदू आणि वैदेहीला दिल्या. त्यांना मीच केस लढवणार असल्याचं सांगीतल..

आणि न्यायाधिशांना मी काय सांगणार आहे त्याबद्दलच एक टिपणसुद्धा दिल! दोघांनीही मदतीचं आश्वासन दिलं! न्यायालयात असं काही बोलू नकोस असा प्रेमळ सल्ला दिला आणि असं बोलल्याशिवाय हवा तो निकाल लागणार नाही अशी कबुलीही दिली!

दरम्यान कापरे आणि करंबेळकरला संजय श्रीवास्तवच्या सुधारीत याचिकेची प्रत मिळाली.. त्यात लिहिलं होतं की दोघांपैकी एकाचा प्रवेश रद्द करून श्रीवास्तवला मिळावा!
झालं!

सगळे परत खवळले..

एक झाले..

करंबेळकरनेही स्वत: युक्तीवाद करायचं ठरवलं!

मग त्याचंही प्रतिज्ञापत्र तयार केलं!

नंदू आणी वैदेहीनं ते सुधारुन दिल.

ते घेऊन मुंबईला गेलो आणि अर्ज सुनावणीसाठी दाखल केला!

२२ ऑगस्टला सुनावणीची तारीख मिळाली!

कापरेकडून गगराट पैकी कोणीतरी येईल असं ठरलं!

आता सुनावणी पर्यंत उत्सुकता रहाणार होती!

२२ ऑगस्ट १९८८

न्या लेंटीन आणि पुराणिकांच्या बेंच समोर आमची केस आली..

डॉ जोशी इन पर्सन फॉर पिटिशनर..

मिलॉर्ड.. डीनचा मुलाला सिक्रेटली क्रिएटेड इल्लीगल एक्सट्रा सीटवर प्रवेश देताना या कोर्टाला फसवण्यात आले आहे! हा भ्रष्टाचार आमच्या सहनशक्तीबाहेर गेलाय.. अनेक मुलांवर अन्याय होतोय.. आणि त्यावर बेकायदेशीर प्रवेश रद करणं हाचं एक तोडगा आहे. तेंव्हा कृपया याचिकेची सुनावणी घ्या आणि तिच्यात तथ्य नाही असं वाटलं तर फेटाळून लावताना श्रीवास्तवचा प्रवेश रद्द करा..

त्यांनी शांतपणे ऐकून घेतल..

आम्ही सुनावणी घेऊ म्हणाले..

तोच सरकारी वकील पुढे सरकला..

मि. एम. एस. : मिलॉर्ड, धिस कोर्ट कॅन नॉट हियर द पिटिशन..

न्या. लेंटीन : व्हाय?

मि. एम. एस. : वी हॅव फाईल्ड एन अपील इन सुप्रीम कोर्ट अगेन्स्ट द जजमेंट इन पीआयएल फाईल्ड बाय डॉ जोशी..

मी : मिलॉर्ड.. दे हॅव नॉट फाईल्ड एनी अपील.. दे हॅव नॉट इन्फॉरम्ड मी.. दे आर लाईंग..

न्या. लेंटीन : मि. एम. एस. व्हाय हॅव यू नॉट इन्फॉर्म्ड हिम?

मी : मिलॉर्ड, दे आर ट्राईंग टु किल टाईम.

मि. एम. एस. : मिलॉर्ड.. आय थिंक वी हॅव सर्वड हिम..

मी : व्हॉट डू यू मीन बाय आय थिंक वी हॅव सर्वड हिम?

न्या. लेंटीन : डॉ जोशी.. कीप क्वाएट.. बिहेव प्रॉपरली ऑर गेट आउट!

मी : सॉरी माय लॉर्डस..बट ही हॅज नॉट सर्व्हड मी कॉपी ऑफ..

न्या. लेंटीन : मि. एम. एस. यू मस्ट सर्व्ह हिम इन वन वीक..

मि. एम. एस. : मिलॉर्ड..

न्या. लेंटीन : वी शॅल हियर आफ्टर टु वीक्स..

४ दिवसांनी पेडियाट्रिक डिपार्टमेंटमधल्या क्लार्क बरोबर अपीलाची प्रत आली. महाराष्ट्र सरकार तर्फे दाखल करण्यात आलेलं अपील होतं. वकिलांच्या मते त्यात फार दम नव्हता, नुसताच वेळकाढू पणा!

पुढच्या तारखेला न्या. प्रताप आणि न्या गुत्तल यांचं बेंच होतं.

परत त्यांच्या समोर युक्तीवाद केला..

त्यांना सांगीतलं की त्या अपीलाचा आणि श्रीवास्तवच्या केसचा काहीच संबंध नाही..

ही याचिका सुनावणीसाठी घेणं विद्यार्थ्यांच्या दृष्टीन अत्यावश्यक आहे..

त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे..

श्रीवास्तवच्या वकीलानं आमच्याविरुद्ध जोरदार युक्तीवाद केला..

त्यावर न्यायमूर्ती म्हणाले.. तुमच्या याचिकेची सुनावणी होण्याविरुद्ध तुम्ही कसा युक्तीवाद करता?

आणि सुनावणी घेण्यासंबंधी भराभरा ऑर्डर दिली..

श्रीवास्तवची याचिका बोर्डावर आली..

आणि दिवाळीची सुट्टी सुरु झाली!

डोक्यात एक विचार आला..

केस सुट्टीनंतर बोर्डावरच आली नाही तर?

मग मी आणि करंबेळकरने ठरवलं की सुट्टी संपायच्या आदल्या दिवशी मुंबईला जायचं आणि केस बोर्डावर येईल याची काळजी घ्यायची.

सकाळी ११ वाजता रिट सेक्शनला पोचलो.

आमचं मॅटर उद्याच्या बोर्डावर फायनल हिअरिंगला येणारे म्हणून चौकशी करायला आलो होतो..

अहो उद्याचा बोर्ड अजून तयार व्हायचाय..

पण आमचं मॅटर लागेल ना?

बघू.. तुमच मॅटर कोणत?

२५/८७ सुट्टीच्या आदल्या दिवशी न्या. प्रताप साहेबांनी ऑर्डर केली.. फायनल हिअरिंगला लवकर घ्या म्हणून..

अहो आता ते बेंच नाही.

मग?

आता दोन बेंच आहेत. एक चीफ आणि अगरवाल आणि दुसर सी. डी. आणि एस.यू.

दुसरं नाव ऐकताच पोटात गोळाच उभा राहिला!

त्यांना विचारलं.. चीफ म्हणजे?

अहो मुखर्जी साहेब.. चीफ जस्टीस!

मग आमचं त्यांच्या समोरच घ्या!

असं कसं करता येईल? आम्हाला ऑर्डर बघून काम करावं लागतं!

अहो तुम्हीच तर ठरवताना.. कुठे लावायचं मॅटर ते?

बरं बघू.. दुपारी या. साहेबांना विचारतो..

अहो साहेबांकडे कशाला जाताय? तुम्हीच..

बर बघतो.. या दुपारी.
. . . . . .

चटकन माझ्या ओळखीच्या मॅन ची आठवण झाली..

नमस्कार..या डॉक्टर.. काय म्हणताय?

जरा नाजुक काम होतं.

काय बुवा?

त्या खालच्या क्लार्क ला पटवायचंय..

कशाला?

आमची केस चीफ समोर लावायला..

एव्हडचं ना? करून टाकू.. पण तो साला बदमाष आहे.

बदमाश म्हणजे?

बादशहा मागेल..५० एक रुपये!

चालेल..

चालेल? डॉक्टर.. तुमची तत्व वगैरे?

घाला चुलीत.. बघा.. ट्राय करा.. आपली १००ची तयारी आहे! हवं तर अत्ताच देतो!

ठीक आहे. मी बघतो.. या दुपारी!

आणि केस अगदी वरती लावायला सांगा हं!

बादशहा काम करेल, निश्चित! तुम्ही एकदम सहा वाजता या!

. . . . .

स्वत:शीच लज्जित होऊन बसलोत.. खालमानेनं..

मी आणि कर्‍या..

मुंबई युनिव्हर्सिटीच्या बागेत!

कर्‍या.. काय करतोय आपण? लाच देतोय? आता केस जिंकली तरी.. शेवटी आपण हरलो कर्‍या!
. . . . .

साडेसहा वाजता याचिका बोर्डावर दुसरी लागली..

न्या. सी. डी आणि न्या एस. यू. च्या बोर्डावर..

सॉरी डॉक्टर.. मि. बी.एच. साहेबांना भेटले..

त्यांनी या बोर्डावरच लावायला सांगीतली.. आधीची काहीतरी ऑर्डर आहे म्हणे.. पण मी बोर्डावर मात्र वरती लावली आहे! हे घ्या तुमचे पैसे परत.. १०० रुपये!

अहो.. राहू द्या..

नाही.. काम झाले नाही तर कसले पैसे?

अहो केस तर वरती लागली ना?

ठेवा तुम्ही!
. . . . .

कोर्टाच्या पायर्‍या उतरताना मनात प्रचंड खळबळ!

कर्‍याच्या चेहर्‍यावरही आश्चर्ययुक्त भीतीचे भाव!

म्हणजे उद्या केसचा निकाल लागणार.. आणि तो सुद्धा आपल्याविरुद्ध!

मि.बी.एच. ने आपला डाव साधला होता.. आपल्याला हव्या त्या बेंच समोर केस आणली होती..

फक्त एकच चांगलं झालं.. आम्हाला हे एक दिवस आधी कळलं!

मी कर्‍याला म्हणालो.. मेलो की रे आपण..

होना .. चायला.. सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडणार तुझ्या..

नाही कर्‍या.. इतक्या लवकर आपण हार मानायची नाही..

पण काय करू शकतो आपण?

हे बघ.. मला अजूनही एक आशेचा किरण दिसतोय..

नाही आरडी.. आता काहीही होणार नाही.. उद्या खेळ खलास!

नाही.. मी जे काही वाचलय त्याप्रमाणे आपण मला अमुक अमुक न्यायाधिश हवेत असं म्हणू शकत नसलो तरी अमुक अमुक न्यायाधिश नकोत असं नक्की म्हणू शकतो ..

काय? असं करू शकतो? मला नाही वाटत.

आपण नंदूला फोन करून विचारुयात..

पण का नकोत हे न्यायाधिश असं विचारलं तर? त्यांनी तर तुझ्या बाजूने निकाल दिलाय तसं म्हटलं तर..

हं.. हा मुद्दा आहे.. आणि प्रोसिजर काय आहे ती सुद्धा विचारायला हवी..

आरडी.. आयडिया. . तुझ्या विरुद्धची ती सरकारची केस..

तिचं काय आता?..

त्यात म्हटलयना.. न्यायाधिशांनी डिग्री संबंधी..

तर? मग तू म्हणू शकतोसना की माझ्यावर दबाव आणला..

येस.. कर्‍या.. बॉस.. मानला.. धिस इज परफेक्ट..कागदोपत्री पुरावा आहे आपल्याकडे दबावाचा..

चल. नंदूला फोन करू
. . . . . . . .

आर. डी. ही फार मोठी स्टेप होईल.

पण पर्याय काय?

आणि जर तरीही केस त्याच बेंच समोर आली तर ५ मिनिटात तुम्हाला बाहेर काढतील..

आणि जर नाही अर्ज केला तर १० मिनिटात बाहेर पडणारचं आहे, त्यापेक्षा लढून मरु यार..

मग तू डायरेक्ट चीफ जस्टीस कडे अर्ज कर.. चेंज ऑफ बेंच साठी..

हे बघ नंदू.. आपल्याकडे वेळ फार थोडा आहे. आम्हाला पुण्यात पोचायलाच रात्रीचे साडेअकरा वाजतील.. आणि उद्या सकाळी सिंहगडने परत निघायला लागेल..

चायला.. मग?

एक रिक्वेस्ट आहे.. एक अर्ज ड्राफ्ट करून टाईप करून घेशील? आणि त्याला आपल्याविरुद्धच्या न्यायालयाचा अपमान केल्याच्या केसचे कागद जोडून त्याच्या ७ झेरॉक्स काढून तयार ठेवशील? मी आल्यावर तुझ्याकडून घेतो आणि जो काय खर्च झाला असेल तो तुला देतो..

बास का आर. डी.? खर्चाचा कुठे प्रश्न आला? डोंट वरी.. मी सगळ तयार ठेवतो. तू रात्री ये. किंवा मीच सकाळी घेऊन तुझ्या घरी येतो. मी पण येईनच तुज्याबरोबर मुंबईला...

फोन खाली ठेवला आणि कळलं की फोनचं बील ७० रुपये झालं!

खिशातले सगळे पैसे काढले ते भरले ५० रुपये.

करंबेळकरकडचे २० रुपये घेतले आणि बिल भागंवलं.

आता पुण्याला जाईपर्यंत उपास!

या केसला विरोध असला तरीही मुंबईला निघताना सकाळी वडील १०० रुपये हातात ठेवत असत.
संध्याकाळी परत गेल्यावर मी परत देत असे.

आज मात्र परत देणं सोडा, उद्यासाठी मागून घ्यायची पाळी आली होती!

बहुदा लाच दिल्याची शिक्षा ताबडतोब मिळाली.

गाडीत बसल्यावर मी आणि करंबेळकरने विचार केला..

आतापर्यंत खर्च किती झाला..

नंदू आणि वैदेहीने एक पैसा सुद्धा घेतला नव्हता,

तरीही रेल्वेचा पास, जेवणखाण, टायपिंग, व झेरॉक्स मिळून माझे ८००० तर करंबेळकरचे २००० खर्च झाले होते.

शिवाय दवाखान्यात न गेल्यामुळे झालेले नुकसान वेगळेच.

तरीही मी मुंबईला गेलो की करंबेळकर माझा दवाखाना सांभाळायचा, त्यामुळे त्यातल्यात्यात कमी नुकसान.

करंबेळकरला माझ्या घरीच घेऊन गेलो!

घरी पोचलो तर नंदूचा निरोप मिळाला की कागदपत्रं तयार आहेत आणि सकाळी ५.३० ला नक्की येतो.

मग जेवता जेवता घरच्यांना सगळी स्टोरी सांगीतली.

रवी पण दुसर्‍या दिवशी येतो म्हणाला.

वडिलांनी ५०० रुपये काढून हातात ठेवले आणि सांगीतले..

आता कुठल्याही कारणासाठी मागे बघू नकोस.. मी तुझ्या पाठीशी आहे!

पहाटे ५.३० ला नंदू आला. मग आम्ही चौघेजण स्टेशनला गेलो आणि सिंहगड एक्सप्रेस मधे बसलो.

बरोबर २ सुटकेस भरून कायद्याची पुस्तके होती फायनल हिअरिंग साठी!

नंदूने तयार केलेला अर्ज वाचला आणि त्याला म्हणालो..

हे फारच मस्त काम झालं बघ! तुला काय वाटत? चीफ जस्टीस मान्य करतील?

करायला पाहिजे. एव्हडा मोठा प्रेशरायझेशनचा पुरावा मान्य करायलाच पाहिजे. बेंच चेंज होईल बहुदा!

त्या अर्जात लिहिले होते..

"मी मुख्य न्यायाधिशांच्या परवानगीने केस दाखल करूनही न्यायाधिशांनी माझ्या वकिलांवर केस काढून घेण्यासाठी दबाव आणला. मी कोणताही गुन्हा केलेला नसताना माझी डिग्री कॅन्सल करु अशी धमकी दिली. विरुद्ध पक्षाने केलेले बिनबुडाचे आरोप ऐकून घेतले. हे सर्व सरकारने दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावरून सिध्द होते. त्यामुळे या न्यायाधिशांकडून निष्पक्ष न्याय मिळेल असे आम्हाला वाटत नाही. तेंव्हा हे प्रकरण कृपया दुसर्‍या कोणत्याही बेंच कडे सुपूर्त करावे ही नम्र विनंती!"

प्रवासाचा शीण आणि जागरण यांच्या प्रभावाने डोळा लागला.

व्हीटी स्टेशन कधी आले ते कळलेच नाही!



१०:४० ला कोर्टात पोचलो.

दरम्यानच्या काळात नंदूने मला प्रोसीजर सांगीतली.

आधी सगळ्या वकिलांना अर्जाची प्रत देऊन त्यांची सही घ्यायची आणि मग तो अर्ज मुख्य न्यायाधिशांच्या पी.ए. कडे द्यायचा.

आमची केस दुसरी असल्यामुळे मधे वेळ होता.

मी नंदूला विचारलं की इतर वकिलांना नाही दिलं तर काय होईल?

त्याने विचार करून सांगीतलं की पी.ए.सांगेल की इतर वकिलांना प्रती देऊन च्या सह्या घेऊन या.

मी म्हणालो चान्स तर घेऊ. नाहीतर देऊ प्रती वकिलांना.

नंदूने वकिलांच्या आरामगृहात थांबायचं, गरजच पडल्यास करंबेळकरने त्याला बोलवायचं आणि रवीने माझ्याबरोबर रहायचं असं ठरलं.

त्या प्रमाणे आम्ही मुख्य न्यायाधिशांच्या पी ए कडे गेलो.

येस..

सर.. आय वॉंट टु मेक धिस एप्लिकेशन फॉर चेंज ऑफ बेंच.

व्हॉट?

सर.. आय एम अ मेडिकल डॉक्टर एन्ड एपिअरिंग इन पर्सन इन अ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन.

यू कॅन नॉट चूज द जज हू विल हियर..

बट आय कॅन से दॅट आय डोंट वॉंट अ पर्टिक्युलर जज.. आय हॅव रेड..

बट व्हाय यू डोंट वॉंन्ट दॅट जज?

बिकॉज ही थ्रेटन्ड मी इन द कोर्ट.. आय हॅव डॉक्युमेंटरी एव्हिडन्स..

प्लीज शो मी द पेपर्स

. . . . . . .

प्लीज वेट, आय विल सीक ऑर्डस फ्रॉम ऑनरेबल चीफ जस्टीस
. . . . . . .

डॉ जोशी..ऑनरेबल चीफ जस्टीस हॅज आस्कड यू टू कम इन हिज चेंबर.. एन्ड प्लीज बी ब्रीफ.. ही हॅज टु अटेंड द कोर्ट इन फाईव्ह मिनिट्स.

थॅन्क यू व्हेरी मच सर..

असे म्हणून मी चीफ जस्टीस यांच्या चेंबरमधे गेलो.

मुख्य न्यायमूर्ती चित्ततोष मुखर्जी यांचे चेंबर

येस डॉक्टर जोशी..व्हॉट इज द प्रॉब्लेम..

सर आय फाईल्ड द पब्लीक इन्टरेस्ट लिटिगेशन एन्ड आह हॅव प्रूव्हड दॅट द पिटिशनर एन्ड द रिसपॉन्डन्ट गव्हर्नमेंट एजन्सीज आर हॅन्ड इन ग्लोव्ह इन द निपोटिस्टिक एक्टिव्हिटीज ऑफ डीन ऑफ मेडिकल कॉलेज..

बट व्हाय यू वॉन्ट चेंज ऑफ बेंच?

सर द लर्नेड जज थ्रेटन्ड मी दॅट ही विल कॅन्सल माय एम.बी.बी.एस डिग्री फॉर नन ऑफ माय फॉल्टस. ही वेंट टु द एक्स्टेंट ऑफ आस्किंग मी टु विड्रॉ द केस एन्ड ही हॅज गिव्हन ज्युडिशियल एडाव्हाईस टु द लॉयर हू हॅज टॅम्पर्ड ऑर्डर्स ऑफ धिस ऑनरेबल कॉर्ट..

डॉ जोशी, यू शुड नॉट मेक सच एलिगेशन्स अगेन्स्ट सच अ सीनियर जज..

बट इज ही एन्टायटल्ड टु पास सच कॉमेंट्स टु थ्रेटन मी?

आय विल लुक इन्टु धिस..

बट मिलॉर्ड, आय फील दॅट आय विल नॉट गेट जस्टीस इन हिज कोर्ट..

यू कॅन नॉट चूज अ जज..

बट आय हॅव रेड दॅट आय कॅन रिफ्युज..

ओके. आय रिक्वेस्ट यू टु टेक बॅक युवर एप्लीकेशन. आय डोंट वॉन्ट एनी रिटन कंप्लेंट रिगार्डिंग अ जज हू इज सिनियर टु मी बाय एज..

बट मिलॉर्ड..

आय विल डायरेक्ट टु प्लेस धिस मॅटर बिफोर माय बेंच..

थॅंक्यू व्हेरी मच सर! सॉरी.. मिलॉर्ड.. थॅंक्यू व्हेरी मच..

मुख्य न्यायाधिशांनी आपल्या पी. ए. ला बोलावून ऑर्डर सांगीतली आणि माझे कागद मला परत दिले.

ऑर्डर होती..

बिफोर सी.जे. एन्ड एस.सी. अगरवाल एस.ओ.पी.एच


मुख्य न्यायाधिशांच्या पी.ए. ने आमच्या कडून केसचे सर्व क्रमांक लिहून घेतले आणि शिरस्तेदाराबरोबर बोर्ड सेक्षनला ऑर्डर पाठवली.

ताबडतोब आम्ही वकिलांच्या विश्रामगृहात थांबलेल्या नंदूला ही बातमी द्यायला पळालो.

नंदू, काम फत्ते!

काय? काय म्हणाले सी.जे.

त्यांच्या बेंच कडे घेतो म्हणाले.. एस. ओ. पी. एच म्हणजे काय?

म्हणजे आधीचे अर्धवट राहिलेले मॅटर संपले की लगेच : सब्जेक्ट टु ओव्हरनाईट पार्ट हर्ड!

नंदूने सांगीतले की आता हे केसमधील इतर वकिलांना सांगायला हवे.

आम्ही ठरवलं की हे शिवदे सरांना सांगायचे, आणि मग ते इतरांना सांगतील!

तसेच पळत शिवदे सरांना (अनिताचे वकील) शोधून काढले आणि बेंच चेंज करून घेतल्याचे सांगीतले.

त्यांनी अभिनंदन केले आणि म्हणाले मी सांगतो मि.बी.एच आणि मि. एम.एस. यांना,
तुम्ही पळा सी.जेंच्या कोर्टात.

सी.जेंच्या कोर्टात अर्जंट एडमिशनच्या केसेस सुरु झाल्या त्या दुपारी जेवणाच्या सुट्टीच्या थोड्या आधी संपल्या.

पहिली फायनल हिअरिंगची सुनावणी सुरू झाली आणि अर्ध्या तासाने जेवणाची सुट्टी झाली.

आम्ही सगळेजण जेऊन परत आलो तोपर्यंत बोर्डावर दुरुस्ती झालेली होती.

न्या. सी. डी. आणि न्या एस. यु. यांच्या बोर्डावरील आमच्या केसचे नावावर काट मारण्यात आली होती आणि सी.जे. आणि न्या एस. सी. अगरवाल यांच्या बोर्डावर आमचे नाव लिहिण्यात आले होते..

त्या दिवशी सुरु झालेली फायनल हिअरिंगची केस संपली नाही, म्हणजे ती दुसर्‍या दिवशीही चालूच रहाणार.

असे सतत दोन आठवडे चालंलं होतं..

अर्जंट एडमिशन्स च्या केसेस संपायलाच वेळ लागायचा, त्यामुळे फायनल हिअरिंग झाले तर फारच थोडा वेळ चाले.

असे होता होता २९ नोव्हेंबर उजाडला, आणि ४:१५ ला आमचं मॅटर पुकारण्यात आले.

रिट पिटीशन २५/१९८७ विथ सिव्हिल एप्लिकेशन ४२७७/१९८८ विथ इंटरव्हेन्शन एप्लिकेशनस नंबर...

मि. बी. एच फॉर पिटिशनर
मि. एम. एस. फॉर स्टेट ऑफ महाराष्ट्र
मि. शिवदे फॉर इंटरव्हीनरर्स
डॉ करंबेळकर इन पर्सन एन्ड
डॉ राजीव जोशी इन पर्सन फॉर मेडिकोज लीगल एड असोसिएशन.

एकदाचा जीव भांड्यात पडला, पण छाती धडधडू लागली, भयंकर टेन्शन!
आता फायनल हिअरिंग्चं अर्ग्युमेंट आपल्याला करायचयं.
मि. बी.एच ने आपला युक्तीवाद चालू केला आणि दिवस संपला..
कोर्ट उठलं. मॅटर पार्ट हर्ड झालं ..

म्हणजे लाच न देता कायम बोर्डावर पहिलं. . . !

७ डिसेंबर १९८८

मग दुसर्‍या दिवशी न्या. अगरवाल आजारी पडले, ते चार दिवस आलेच नाहीत. त्यामुळे सुनावणीही नाही. शेवटी ७ डिसेंबरला सुनावणी सुरु झाली. रोज २ - २ तास मि. बी. एच. बोलतच होते. थांबायची लक्षणेच नाहीत. शेवटी न्यायमूर्तींनी विचारले,

"तुम्हाला अजून किती वेळ लागेल?"

त्यावर मि. बी.एच. उत्तरले, "दोन दिवस मिलॉर्ड."

फक्त आम्हीच खचलो नाही, कोर्ट सुद्धा खचलं, कारण तो बोलत होता त्यातल्या एका वाक्याचाही अर्थ कोणालाच कळत नव्हता!

पुढच्या दिवशी न्यायमूर्तींनी मि.बी.एच. ला चांगलंचं फैलावर घेतलं.

त्याच्या प्रत्येक विधानाला आक्षेप घेतला आणि शेवटी सांगीतलं,

"वी डोंट फील यू हॅव पुट उप एनी पॉईंट टु कन्व्हिन्स अस दॅट यू हॅव एनी लीगल राईट!"

त्यावर निर्लज्जपणे मि.बी.एच. म्हणाले,

"मिलॉर्ड, काइंडली अलाऊ मी टु कन्टिन्यु ऑन ह्युमॅनेटेरियन ग्राउंड्स!"

त्याला खाली बसवून न्यायाधिशानी विचारलं..

येस मि. एम. एस. व्हॉट डू यू वॉंट टु से?

मग मि. एम. एस. नी तोच पाढा वाचला.. डॉ राजीव जोशी मवाली, गुंड, लफंगा आणि चोर आहे!

पण कोर्टाने त्याला सांगीतले की त्याचा या केसशी काही संबंध नाही. कायदेशीर मुद्दे असतील तर मांडा.

मग सरकारी वकीलाने प्रवेश कसा कायदेशीर आहे हे सांगायला सुरुवात केली.

त्यावर कोर्टाने सरकारने प्रवेशाला विरोध करणारी प्रतिज्ञापत्रंच त्याला दाखवली आणि विचारलं,

"व्हाय आर यू चेंजिंग युअर स्टॅन्ड नाऊ?"

त्यावर मि. एम. एस. कडे उत्तरच नव्हतं.

आता शिवदे सर त्यांची बाजू मांडणार तोच कोर्ट उठंलं!

. . . . . . . .

एव्हडे सगळे दिवस अनिता रोज माझ्या बरोबर असायची.

पुणे मुंबई पुणे प्रवास आणि कोर्टातला सगळा वेळ आम्ही एकत्रच असायचो.

निरनिराळ्या विषयांवर आमच्या भरपूर गप्पा व्हायच्या.

पण त्या दिवशी मात्र ती गप्प गप्पच होती.

बहुतेक आता शिवदे सरांचे अर्ग्युमेन्ट होणार याचं तिला टेन्शन आलं असावं.

पण कोर्टात पोचलो आणि एका नवीनच प्रकरणाला सुरुवात झाली.

सरकारी वकीलाने आमच्या हातात एक पत्र ठेवलं.

त्यात लिहिलं होतं :संजय श्रीवास्तव यांना जानेवारी १९८७ मधे प्रवेश न देण्याची चूक आम्ही खालील प्रकारे दुरुस्त करु इच्छितो.

१. संजय श्रीवास्तव यांना आम्ही प्रवेश देऊ.
२. करंबेळकर किंवा कापरे यांना आम्ही काढणार नाही.
३. वर्मा यांची सीट आम्ही अनिता सेठ यांना देऊ
(अश्या रितीने सर्वमान्य तोडगा निघाल्याने हे प्रकरण संपुष्टात येईल!)

हा मि. एम. एस. यांचा नवीनच पवित्रा होता.

शिवदे सरांच तोंड बंद करण्याची चाल त्यांनी खेळली होती.

आमची आमची चर्चा चालू होती तोच ते मला भेटले.


गुड मॉर्निंग डॉ जोशी.. हाऊ आर यू?

हॅलो मि. एम. एस. सो यू वॉंट कॉम्प्रमाईज नाऊ?

सी डॉ जोशी, यू विल गेट व्हॉट यू वॉंट..

व्हॉट डू यू मीन?

वी हॅव ऑफर्ड हर अ सीट, एडिशनल सीट!

वी आर नॉट इंटरेस्टेड इन एडिशनल सीट..

सी डॉ जोशी, वी आर गिव्हिंग यू अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर युअर लाईफ!

मि. एम. एस. आय एम नॉट हियर फॉर समथिंग..

नो नो, बाय गिव्हिंग अ सीट टु हर! फायनली दॅट इज व्हॉट यू वॉंट इजंट इट?

व्हॉट?

सी. डोंट गेट एजिटेटेड, आय एम गिव्हिंग यू एन ऑफर! एक्सेप्ट इट फॉर यूअर ओन बेटरमेंट. इफ यू डोंट एक्सेप्ट, आय विल मेक यू डान्स इन माय हॅंड्स!

ओ.के. मि.एम. एस. आय विल गेट बॅक टु यू!!

अशी सरळ सरळ धमकीवजा लाचेची ऑफर देऊन मि. एम. एस निघून गेले.


मग मी शिवदे सरांशी आणि अनिताशी बोललो.

शिवदे सरांचे मत पडले की अनिताने ऑफर मान्य करणे शहाणपणाचे आहे.

करंबेळकर आणि माझे मत मात्र कोणत्याही तडजोडीविरूध्दच होते.

आम्ही पुण्याला गिरिश आणि चंद्रात्रेय यांना फोन केला आणि त्यांनीही सीट वाढवणे मान्य नसल्याला पाठिंबा दाखवला.

जेवताना अनिताशी सविस्तर चर्चा केली. ती म्हणाली..

"आर. डी. मला काही मेहेरबानीची सीट नकोय, कायद्यानुसार मिळत असेल तरच हवी. आणि तू इथे बेकायदेशीर सीट विरुद्ध भांडतोयस.. त्यामुळे तू माझ्यासाठी बेकायदेशीर सीट तयार करत असतील तर त्यालाही विरोधच कर. तत्वासाठी, तुझा काहीही फायदा नसताना तू केलेले कष्ट वाया जायला नकोत. त्यामुळे आपल्या मैत्रीत काहीही फरक पडणार नाही. तू तुझे काम कर, निर्णय कोर्टावर सोड.."

कर्मण्येवाधिका रस्ते मा फलेषु कदाचन

चा अर्थ अनिताने मला शिकवला!

मग शिवदे सरांनी हो म्हणायचं आणि मी नाही म्हणायचं असा मार्ग ठरला.

म्हणजेच मेडिकोज लीगल एड असोसिएशनचा बेकायदेशीर सीट ला विरोध आणि जागा वाढवायला तर पूर्णपणे विरोध.

कोर्टाला ठाम निर्णय द्यावाच लागेल अशी परिस्थिती तयार झाली!

जेंव्हा केस सुरु झाली तेंव्हा मि. एम. एस. नी ते पत्र न्यायाधिशांकडे दिले आणि सांगीतले, की शिवदे सर कॉम्प्रमाईजला तयार आहेत आणि आता गुंड, मवाली, लफंग्या अशा राजीव जोशींचाच विरोध आहे..
आणि त्यांचा या केसशी तसा काहीच संबंध नसल्यामुळे त्यांच्या विरोधाकडे लक्ष देण्याचं या कोर्टाला काहीच कारण नाही..

त्यावर न्यायमूर्ती मुखर्जींनी विचारले..

Yes, Dr Joshi, what do you want to say?

My lords, I can not enter such compromise..

But I don't think you can stand in the way of Dr Shrivastava now..

My lords, I am not standing in his way, my lords, high court and supreme court judgements are standing in his way!

But Dr Joshi, Dr Seth is getting additional seat..

My lords, I am appearing on behalf of association which does not want any additional seat..

Dr Joshi, do you feel that we do not have powers to increase a seat?

My lords, you may havee such powers, but do you have powers to legalise what is illegal?

But Dr Joshi, they are ready for compromise..

My lords, do I have a right to get patient hearing by this honourable court?..

Yes, you have, but..

My lords, I want to throw light on various illegalities in all this process, and finally you are going to decide.. please give me an opportunity to put my points in front of this bench..

Ok, we shall hear you on thursday, 21st January 1988

Thank you my lords for your kindness..

२१ जानेवारी १९८९, सकाळी ११ वाजता

मुंबई उच्च न्यायालय रूम नं ५४
न्यायमूर्ती चित्ततोष मुखर्जी आणि न्या. एस. सी. अगरवाल

येस डॉ. जोशी, व्हॉट डू यू वॉंट टु से?

My lords, I wish to start my argument with judgement reported in AIR 1983 SC 580. In this judgement, the honourable judge has said that the government officers are now emboldened to such an extent that it has come to mean that "Get yourself into a medical college by means fair or foul.. once you are in, no body will push you out." So the honourable judge has said that "Some day not distant, if admissions are proved to be illegally made by corrupt means, the courts will have to cancell the seat awarded to students by corrupt government officials". My lords, in this case this is exactly what is happening. The government officers and their lawyers have deceived the court, they have manipulated the orders of the court, they managed to kill time and they are now trying to capitalize on sympathetic attitude of the court. My lords, they are now using court as a way for backdoor admission. They are troubling students who do not have any corrupt means at their disposal.. and now they are requesting the court to take sympathetic view for them.. my lords, please do something for this, my lords, this attitude if affecting young medical graduates very seriously.

Mr Justice Agarwal : Dr Joshi, If you want to argue on law points, argue, or stop. Please do not play emotional drama here. We are here to decide legality of the admission and dont want to hear emotional outbursts from you..

असे म्हणाल्यावर मी करंबेळकरला खूण केली आणि त्याने जमिनीवर ठेवलेले पुस्तकांचे २ मोठे गठ्ठे उचलून टेबलावर ठेवले

Hon'ble Chief Justice : What is this Dr Joshi?

My lords, these are all the high court and supreme court judgements which are standing in the way of Dr Shrivastava. I have to discuss various points of law with you and I would start with judgement of Supreme court, reported in AIR 1985 SC 1065

Mr J Agarwal : Dr Joshi, where did you get all these references from?

From ILS Law College, Pune.

Hon'ble Chief Justice : Do you want to refer to all these judgements?

My lords, I will try to take as less time of the court as possible. So in AIR 1985 SC 1065 the Supreme Court has said that compairing marks obtained by students in two different universities is violative of article 14 of the constitution of India. Therefore marks of Dr Shrivastava can not be compared with marks of students in B J Medical College.

Hon'ble Chief Justice : Yes

Kindly see AIR 1986 SC 1877. The supreme court has clarified that the admissions for January 1987 should be given as if the judgement in Pradeep Jain's case is non existant..that means.. institutional preference rule was applicable for January 1987. So the action of college not admitting outsiders was correct..

Hon'ble Chief Justice : Yes

In my most respectful submissions, lorships will kindly see page 52.. the affidavit of the government says that because of this judgement they had formulated the GR dt 21.7.1986 and hence it can not be held bad in law..

Mr Justice Agarwal : Yes

This means that he was not eligible for admission in 1987 as per supreme court judgement and as per government affidavit.. now kindly see recent statement filed by the government pleader.. He says that he was eligible for admission in Jan 1987.. which is clearly contrary to earlier affidavit and supreme court judgement..

Mr Justice Agarwal : Yes Mr. M. S. can you tell me one reason why he has become eligible now when according to you he was not eligible in January 1987

Mr. M. S. : .....

My lords, therefore for all practical purposes he was not eligible for admission in January 1987 has been proved beyond any doubt.

Mr Justice Agarwal : Yes, this point is valid.

My lords, even then, in June 1987 they admitted him on a secretely created illegal extra seat.

Hon'ble C J : But Dr Joshi, that seat was vacant since 1980.. and no one had applied for it..

My lords, if you dont notify the seat on notice board, how can students apply for the seat?

Mr J A : What do you mean?

My lords, no one knew that the seat is vacant, except for the Dean's son!

Mr C J : How can you say that?

Now kindly see the modus operandi of creation of the seat. Please see letter of head of Paediatric Department informing the seat.. Kindly note that the date of the letter is 2nd June 1987.. and kindly see the order of the court is dated 10th of June 1987. Between 2nd June to 10th June there was no notice about the vacancy.. Lordships will kindly see the affidavits filed by 7 students on page nos..

Mr J A : Ok..

Mr M S : But My Lords, we had put up a notice in January..

Mr J A : How could put up a notice of vacancy in January 1987 when you yourself did not know about it till June 1987?

Exactly my lords, that is the point. What they put up on notice board in January was the order of the court asking for intervention.. please see page..please see that it does not convey any vacancy..kindly see.. does it convey a vacancy?

Mr J A : No.. but Dr Joshi, where did you get all this internal correspondece from? My lords, they themselves had filed affidavit of head of department of paediatrics..

Mr C J : Ok.. anything else?

Now my lords, assuming that Dr Verma's seat is vacant, how can they give it to Dr Shrivastava? A vacancy from 1980 is being carried forward to 1987 which is not allowed..

Mr J A : What do you mean?

Kindly see judgement of this court in 328/83..carry forward of a seat is held bad in law.. please see the last paragraph of the judgement..even the university has refused carry forward..

Mr C J : Yes, but then who should get the seat?

My lords, this question is to be decided by this court. However, in any case it has to go to student from B J Medical College, in view of the supreme court judgement.. I would say that it should go to the next student in the waiting list of B J Medical college, but I dont want to go into those details now

Mr J A : Alright, I got your point. We shall continue after lunch break..

Thank you My Lords..

कोर्टात जमलेल्या सर्व वकिल मंडळींनी अभिनंदन केले..

छान अर्ग्युमेंट केलसं असं प्रत्येकान सांगीतल..

नंदूचे सिनियर वकील ज्यांना मी आधी भेटलो होतो.. ते तर म्हणाले.. डॉक्टर.. लाईन चुकली तुमची.. वकील झाला असतात तर भल्या भल्यांची सुट्टी केली असतीत..

मी म्हणालो.. सर .. खरी लढाई तर पुढेच आहे..

तर त्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह!

म्हणालो.. दुपारी या.. आणि बघा इथे काय होईल ते..

नंदूने मला पकडून पटकन जेवायला नेले.

वैदेही, रवी, करंबेळकर सगळ्यांनी मनापासून कौतुक केले, न अडखळता, न घाबरता बोलल्याबद्दल..

शिवदे सरांनीही पाठ थोपटली!

पटापटा जेऊन आम्ही परत कोर्टात पोचलो.

हळूहळू कोर्टातील गर्दी वाढली आणि पावणेतीन वाजता न्यायाधिश महाराजांचे आगमन झाले..

Mr J A : Yes Dr Joshi, I am really wondering about the legal references you are putting forward..

My lords, I could gather them because of my lawyer friends who helped me since the begining of the case. Coming to the case, my lords will kindly see the letter sent by the dean to the university.. the father of the student has tampered with the order of this court while writing to the university..

Mr C J : Yes Mr M. S. What is your explanation

Mr M S : My lords I had sent the correct order to the dean

My lords, but the sons advocate communicated wrong order, tampered order, changed order, manipulated order.. and the dean acted on that order.. kindly see his letter on page..

Mr J A : Yes Mr B H

Mr B H : My lords, my client has already completed two years.. he should not be punished to suffer for none of his faults..

Mr C J : Yes Dr Joshi, why should we make him to suffer.. what is his fault? All this fraud has been played by his father and his advocates..

My lords, this is exactly what I was trying to argue at the begining of the case, and I was told by the honorable bench that I have to argue only on law points. How can they say that he has not made any fault.. he is a major.. he has signed false affidavits in the court..I can say that he has directed his advocate to tamper the order of the court.. even his advocate will not be able to counter that argument!

Mr C J : You can not make such an allegation!

My lords, I will give you another example. Suppose tomorrow I come to your house with a bag containing cash 1 lack rupees..

Mr C J : Dr Joshi, you can not bribe a judge and talk nonsense in the court room..

My lords, let me complete my argument..

Mr C J : What do you mean by bringing cash to my house..

My lords, I keep the bag in your house and then call the police to tell them that the judge has taken bribe from me..

Mr C J : Dr Joshi, mind your language..

Mr J A : Let him complete what he wants to say..

My lords in the mean time, you notice the bag containing the cash.. and you call the police saying that somebody left cash in your house.. Now consider both these situations.. If you call the police, then you will not be guilty, but if police finds cash in your house after my call, you will be charged with allegations..

Mr C J : How can you pass such remarks in the court?

My lords, this is just an example. If Dr Shrivastav was not entitled to the admission, he should have written to the university saying that the Dean is giving me illegal admission. But in this case he is filling writ petition, he is signing false affidavits and his lawyer is tampering the courts order. How can he say that I am not guilty?

Mr J A : I got your point Dr Joshi, I agree that he is not innocent. But as a judge, we shoul take sympathetic attitude. See, from humanatarian point of view..

My lords, showing humanity to such people is being unhuman to us.. to all the students who wish to get a legal seat. Then why there is restriction on number of seats and why to frame any rules? Lordships will see the strictures passed by earlier bench against the dean.. there is no punishment. And if you can not punish the dean because he is government servant and you dont want to punish the son on humanatarian grounds.. may I ask as to what this court can do? Just pass impotent strictures which are of no use?

Mr C J : Dr Joshi, you can not raise such voice in the court

Then My lords will kindly tell me that Dr Joshi, there is no place for people like you in the court..go to street and fight.. I will do that. I will raise my voice there.

Mr C J : We can not tell you what you should do.

My lords, I am adopting most legal manner to raise my protest by coming to court. If the judiciary does not like it, or does not want it..I can go to streets and fight. My association and college students can do rail roko and rasta roko andolan. But then please dont blame us for that.. because that is what the courts have been doing.

Mr C J : Dr Joshi, you should not pass such remarks on courts..

Then kindly put me behind bars for contempt of court..but please do something. I am sorry to say that because of this attitude of the courts..the students are suffering. Increasing a seat every time the case goes to court is the seed of shameful scenario in the field of medical education. Because of this will shall be producing only two types of doctors, undeserving doctors and frustrated doctors. And I say that the courts are responsible for this. Please..my lords..kindly do something to stop all this.

Mr C J : Dr Joshi, please calm down. You have to be polite while arguing before this court.

May I ask the court, what is the fault of other students? What is the use of rules? What is the use of Supreme court judgements?

Mr C J : Dr Joshi, don't force us with questions..

I ask you, what is the use of courts if you can not punish those who have deceived the court.. those who are using courts as way for backdoor admissions? If you dont want to punish the son, at least punish the father. But you can not condon their sins. You are not GOD My Lords, you are just a High Court Judge. It is your duty to punish them. Kindly cancel this admission on secretely created illegal extra seat my lords.

Mr C J : Not allowing a young graduate to continue is enough punishment to his father. Matter is adjourned for judgement. We shall let you know the date in two weeks..

9th March 1989 Bombay High Court

त्यानंतर ३ आठवड्यांनी कोर्टात जजमेंटची तारीख लागली. न्यायमूर्ती चित्ततोष मुखर्जींच्या चेंबरमधे आम्ही सगळे जमलो.
न्यायमूर्ती अगरवालसुद्धा होते.

Mr C J : We have decided to reject both the petitions.

Mr B H : But My Lords, my client..

Mr C J : He will have to discontinue the course

Mr B H : Kindly allow him to continue on humanatarian grounds

Mr C J : That we have been doing for all these years. Now this has to stop.

Mr B H : Lordships will kindly allow 6 weeks time to go to supreme court.. kindly grant leave to appeal

Mr C J : You can do that, but you may file special leave petition.

संजय श्रीवास्तवचा प्रवेश रद्द करण्यात येत आहे.
आपण सुप्रीम कोर्टात स्पेशल लीव्ह पीटीशन दाखल करू शकता.

एक लढाई जिंकली होती. पण दुसरा शत्रू पुढे उभा होता.

दिल्ली बहोत दूर है!

सुप्रीम कोर्टात जाणं अशक्य आहे!

तिथेच ठरवंलं!

आपली मर्यादा संपली!

आणि मन एकदम शांत झालं.

गेली २ वर्ष हिरहिरीनं लढवलेली केस मी जिंकली होती.

माझ्या कष्टांचं चीज झालं होतं.

बेकायदा सीट रद्द होऊ शकते असं शासनाला कळलं होतं.

आता यापुढे कॉलेजातील लोक मनमानी करणार नाहीत.

आता हे सगळं लोकांना कळायला पाहिजे, त्यासाठी निकालची प्रत १ आठवड्यात मिळणार होती.

जजमेंटची कॉपी घेण्यासाठी माझा मित्र डॉ. अतुल बिनीवाले माझ्या बरोबर आला होता.
त्याने केस जिंकल्याबद्दल माझे अभिनंदन केले आणि मला मुंबईच्या ताजमहाल हॉटलमधे जेवायला नेले.

जजमेंटची कॉपी आम्ही आळीपाळीने वाचल्या नंतर भरपेट स्वादिष्ट जेवण झाले.

त्याने विचारले.. आता पुढचा काय बेत?

मी म्हणालो.. अतुल.. हायकोर्टात तर जिंकलो. पण दिल्ली बहोत दूर है!

मला हे माहीत आहे की शेवटी सरड्याची धाव कुंपणापर्यंतच!

१६ मार्च १९८९

सकाळ :

अधिष्ठाता श्रीवास्तव यांच्या मुलाचा एम. डी. चा. प्रवेश रद्द

केसरी :

बी. जे. चे अधिष्ठाता श्रीवास्तव यांच्या मुलास दिलेला प्रवेश रद्द ठरवला..

Indian Express :

The judge further stated that Dr Sanjay could not be allowed to enjoy his unlawful gain of the seat which he had secured by flouting all rules and norms of propriety. To allow him to continue would be putting seal of approval upon the conduct, which, to say the least, was thoroughly improper and lacked in bonafides.

2 comments:

pradnya said...

प्रिय राजीव,
आपण चिवट आणि जिद्दी आहात. आपण जो लढा दिलात त्याचे सविस्तर वर्णन वाचून विस्मयचकित झाले. तसंच ज्या अलिप्तपणे तुम्ही या सार्यातुन बाहेर पडलात (सरड्याची धाव कुंपणापर्यंतच) तोही खास दाद देण्यासारखाच!
या केसशी संबंधित असलेली कागदपत्रे तुम्ही व्यवस्थित राखली असणार. तेंव्हा आणि आजही. (म्हणूनच इतक्या वर्षांनी तुम्ही ते सारे नीटपणे मांडू शकलात.) ज्या चिकाटीने तुम्ही ते कम्युनिटीवर इंग्रजीत व ब्लॉगवर मराठीत टाकलेत त्याचेही मला कौतुक वाटते. तुमचे रोजचे व्याप संभाळून हे उद्योग करायचे म्हणजे धन्यच आहे. 'वेळेचे व्यवस्थापन' तुमच्या कडून शिकायला हवे.

chandan said...

Dr.
Fantastic!!! I will not call it a story as these are true facts (as per you). My God! What all goes on in the admissions. I was aware of all this but what you have told is simply amazing.
And Hats of to you for such a spell binding narration !
I was planning to read this for a long time but could not get enough time to go through it all. Now I feel I did the right thing by waiting so that I could complete reading it at one stretch. I could not have put it down.
Great job Sir.

Chandan